Sunday , September 20 2026
Breaking News

कर्नाटक

पदवीपूर्व विद्यार्थ्यांनाही मोफत गणवेशाची ‘भेट’!

  मोफत पाठ्यपुस्तकांनंतर गणवेश वाटपाचा सरकारचा विचार; शिक्षणाचा आर्थिक भार कमी करण्यावर भर बेळगाव : राज्यातील सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात येणार आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिल्यानंतर आता मोफत गणवेश देण्याच्या निर्णयावरही सरकारकडून गांभीर्याने विचार सुरू आहे. …

Read More »

बिदर जिल्हा महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या

  बिदर : बिदर जिल्हा महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता औराद (ब.) तालुक्यातील बोंठी येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला बिदर जिल्ह्यातील मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष रामराव राठोड, सचिव पृथ्वीराज पाटील आणि सदस्य प्रा. …

Read More »

म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयात राखीच्या धाग्यातून स्वयंरोजगार अन् सृजनशीलतेचा सुंदर फुलला संगम

  खानापूर : भावा-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे, विश्वासाचे आणि रक्षणाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण हा केवळ परंपरेचे जतन करणारा नसून आपुलकी, संस्कृती आणि सामाजिक सलोखा वाढवणारा सण आहे. या सणाचे औचित्य साधून, मराठा मंडळाच्या शिक्षण संस्थेच्या प्रेरणादायी अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कॉलेजचे प्राचार्य अरविंद पाटील यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून …

Read More »

ज्येष्ठ ग्रामीण मराठी साहित्यिक महादेव मोरे यांच्या द्वितीय स्मृतिदिनी अभिवादन

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती ग्रंथालय व निपाणी येथील साहित्यिक रसिक मंडळातर्फे ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक महादेव मोरे यांच्या द्वितीय स्मृतिदिनी अभिवादन करण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महादेव मोरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. प्रा. शिवाजी मोरे यांनी, महादेव मोरे यांची …

Read More »

नगरपालिका प्रशासनाचे पीओपीबाबत वराती मागून घोडे

  ७० टक्के मूर्ती तयार ; नगरपालिका अलर्ट मोडवर निपाणी (वार्ता) : गणेशोत्सव २१ दिवसावर आला असताना नगरपालिका यंदा प्लास्टर ऑफ पारस (पीओपी) मूर्तीच्या आयाती संदर्भात अलर्ट झाली आहे. पीओपी मूर्ती शहरात येणार नाहीत, याबाबत उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे शहरामध्ये दाखल होणाऱ्या मूर्तीची संख्या यंदा घटण्याची शक्यता आहे. शिवाय …

Read More »

कर्नाटकात कृत्रिम पनीरवर एक वर्षासाठी बंदी; अन्न सुरक्षा विभागाचा आदेश

  बेळगाव : सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने कर्नाटकात कृत्रिम पनीर अर्थात ‘अनालॉग पनीर’च्या वापरावर एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. राज्य अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाने यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केला आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर खाद्यसंस्थांमध्ये कमी खर्चात पनीर तयार करून अधिक नफा मिळवण्यासाठी दुधाऐवजी वनस्पतीजन्य तेल, स्टार्च तसेच इतर …

Read More »

खानापूर तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर : डॉ. अंजलीताई निंबाळकर

  खानापूर तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना विधानसभेच्या पटलावर प्रभावीपणे मांडणाऱ्या आणि जनतेच्या हक्कासाठी खंबीरपणे आवाज उठविणाऱ्या खानापूर तालुक्याच्या माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात खानापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले. तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या असोत, ग्रामीण …

Read More »

ममदापूर मराठी शाळा एसडीएमसी अध्यक्षपदी सुनील पाटील यांची निवड

  निपाणी (वार्ता) : ममदापुर (के. एल.) येथील सरकारी मराठी मुलांची शाळेच्या शाळा व्यवस्थापन व सुधारणा समितीची मुदत संपली होती. त्यामुळे पुढील तीन वर्षासाठी नवीन एसडीएमसी अध्यक्षपदी सुनील पाटील यांची निवड करण्यात आली. मुख्याध्यापक. ए ए. मोरे यांनी स्वागत केले. त्यानंतर सदस्यासाठी १८नावे बिनविरोध निश्चीत करून एसडीएमसी ची रचना करण्यात …

Read More »

ज्येष्ठ नागरिक संघातर्फे देवचंद कॉलेज परिसरात बाकडी

  निपाणी (वार्ता) : सामाजिक बांधिलकीची विचारधारा जपत जेष्ठ नागरिक सेवा संघा तर्फे निपाणी- मुरगूड रोडवर देवचंद काॅलेज मुख्य गेट लगत असणाऱ्या फुटपाथवर सर्वांचे वापरासाठी सिमेंटचे बाक बसवण्यात आले आहेत. एकूण बारा बाक बसवले जाणार असून सर्व बाकांवर छत करण्यात येणार आहे. यावेळी जेष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष विठ्ठल घोरपडे, …

Read More »

नूतन मराठी विद्यालयातील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार

  निपाणी (वार्ता) : स्काऊट गाईड मध्ये राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त महेक जगदाळे व पवन सतीश चौगुले विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले, तहसीलदार सुरेश मुंजे, गट शिक्षणाधिकारी. महादेवी नाईक, नगरपालिका आयुक्त गणपती पाटील, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी प्रवीण कट्टी, मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार …

Read More »