Friday , October 23 2026
Breaking News

हंचिनाळमध्ये २४ तास विजेच्या आंदोलनाला कर्नाटक राज्य रयत संघाचा पाठिंबा

Spread the love

 

 

निपाणी (वार्ता) : हंचिनाळ येथे निरंतर ज्योती योजनेअंतर्गत २४ तास वीजपुरवठा मिळावा, या मागणीसाठी चौगुले आणि कुरणे वस्ती येथील नागरिक आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला मार्गदर्शन व पाठिंबा देण्यासाठी कर्नाटक राज्य रयत संघाचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी शनिवारी (ता‌.१०) आंदोलनस्थळी भेट देऊन उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करण्यासह आंदोलनाला पाठिंबा दिला.

राजू पोवार यांनी, चौगुले आणि कुरणे वस्तीतील अनेक कुटुंबे बऱ्याच वर्षापासून विजेपासून वंचित आहेत. अनेकवेळा मागणी करूनही वीज पुरवठ्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याचे दखल घेऊन तात्काळ वीज पुरवठा करण्याची मागणी केली. वीज पुरवठा न केल्यास आंदोलन तीवर करण्याचा इशारा दिला. यावेळी आडी येथील रयत संघटनेचे शाखाध्यक्ष बाबासाहेब पाटील, हंचिनाळ शाखाध्यक्ष सागर पाटील, सचिव सचिन कांबळे, रमेश कोळी, रामचंद्र मगदूम, संतोष सकपाळ, दादासो चौगुले, गजानन पवार तसेच गावातील अनिल कुरणे, नितीन कुरणे, तायगोंडा पाटील, विकास कुरणे, नागेश चौगुले, अनिल पाटील, संतोष चौगुले, नवनाथ चौगुले, काशिनाथ चौगुले, काकासो चौगुले, संदीप चौगुले, संदीप कोंडेकर, शंकर पाटील, दीपक पाटील, बाजीराव चौगुले यांच्यासह नागरिक उपस्थि होते.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव परिसरात दसऱ्यानिमित्त आयुध पूजनासह सीमोल्लंघन सोहळा

Spread the love  निपाणी (वार्ता) : विजयादशमी निमित्त बोरगाव शहर आणि परिसरात विविध कार्यक्रमासह आयुध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *