Friday , October 23 2026
Breaking News

कार-कँटरची समोरासमोर भीषण धडक; चार जणांचा जागीच मृत्यू

Spread the love

 

मृत चौघेही विजयपूर जिल्ह्यातील

धारवाड : कार आणि कँटर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना धारवाड जिल्ह्यातील नवलगुंद तालुक्यातील अमरगोळ गावाजवळ घडली.

या अपघातात अजीत, राकेश, संदीप आणि श्रुती यांचा मृत्यू झाला असून, हे चौघेही विजयपूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कारमधून हुबळीहून विजयपूरकडे जात असताना कारची कँटरशी समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच नवलगुंद पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

गृहज्योती योजनेतून १.३ लाख ग्राहक बाहेर; वैयक्तिक कागदपत्रे देण्यास नकार

Spread the love  बेळगाव : कर्नाटक सरकारच्या महत्त्वाकांक्षी गृहज्योती योजनेला मोठा धक्का बसला असून, सुमारे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *