Sunday , September 20 2026
Breaking News

कर्नाटक

मध्यान्ह आहारात कर्नाटक आघाडीवर; ९२ टक्के विद्यार्थी योजनेचा लाभ घेतात

  दररोज ५४.४ कोटींचा खर्च; रागी मुद्दे, दूध, अंडी, केळींसह पौष्टिक आहारावर भर बेळगाव : शाळेतील विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नव्हे, तर सकस आहारही मिळावा, यासाठी राबविण्यात येणाऱ्या मध्यान्ह आहार योजनेला कर्नाटकात मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील तब्बल ९२ टक्के विद्यार्थी शाळेत दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह आहाराचा लाभ घेत असल्याचे अहवालातील आकडेवारीवरून …

Read More »

केसरेकर कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत द्या

  महाराष्ट्र एकीकरण समितीचे तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन खानापूर : कुपवाड (जि. सांगली) येथे १५ ऑगस्ट रोजी घडलेल्या हिंसक घटनेत मृत्यू झालेल्या हेब्बाळ (ता. खानापूर) येथील मोहन नागाप्पा केसरेकर आणि त्यांच्या पत्नी मनीषा केसरेकर यांच्या कुटुंबीयांना शासनाने तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, तसेच मोफत कायदेशीर सहाय्य उपलब्ध करून द्यावे, अशी …

Read More »

कुपवाड हल्ला प्रकरण : उद्या खानापुरात म. ए. समितीची तातडीची बैठक

  खानापूर : कुपवाड (सांगली) येथे गत १५ ऑगस्ट २०२६ रोजी खानापूर तालुक्यातील केसरेकर दांपत्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याने संपूर्ण परिसर हादरला होता. या थरारक घटनेत गंभीर जखमी झालेल्या मनीषा केसरेकर यांचा त्याच दिवशी दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर त्यांचे पती मोहन केसरेकर यांच्यावर गंभीर अवस्थेत अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू …

Read More »

माजी मंत्री बी. सी. नागेश यांचे निधन; ६७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

  तुमकूर : माजी शिक्षणमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बी. सी. नागेश (६७) यांचे मंगळवारी बंगळुरू येथील त्यांच्या मुलीच्या निवासस्थानी आजारपणामुळे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बी. सी. नागेश हे व्यवसायाने बी.ई. इंजिनिअर होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा दीर्घकाळ संबंध होता. तिपटूर …

Read More »

केपीएससी अध्यक्ष शिवशंकरप्पांना हायकोर्टाचा दिलासा; राज्यपालांचा निलंबन आदेश रद्द

  बंगळूर : मुलीला सरकारी नोकरी मिळवून देण्यासाठी पदाचा गैरवापर आणि घराणेशाही केल्याच्या आरोपावरून कर्नाटक लोकसेवा आयोगाचे (केपीएससी) अध्यक्ष शिवशंकरप्पा साहुकार यांना निलंबित करण्याचा राज्यपाल थावरचंद गेहलोत यांचा आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी रद्द केला. तसेच, आदेशाची प्रत मिळाल्यानंतर सात दिवसांत शिवशंकरप्पा यांची केपीएससी अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. …

Read More »

नवीन बंधारा निर्मितीसह जुन्या बांधाराच्या दुरुस्तीसाठी बोरगावमध्ये शेतकऱ्यांची बैठक

  निपाणी (वार्ता) : बोरगाव-घोसरवाड दरम्यान असलेल्या दूधगंगा नदीवर कायमस्वरूपी बंधाऱ्याची निर्मिती करण्यासह जुन्या बंधाऱ्याची दुरुस्ती करून बोरगाव परिसरातील पिण्याच्या आणि शेती पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी बैठकीत केली. उन्हाळ्यात दूधगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्यासह शेती पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर होत आहे. तात्यासाहेब बसन्नावर म्हणाले, बोरगावच्या …

Read More »

लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासाठी सतीश जारकीहोळी यांची बॅटिंग

  बेळगाव : राज्य मंत्रिमंडळातील रिक्त असलेल्या महिला कोट्यातील एका मंत्रीपदावरून पुन्हा राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे. माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि उमाश्री यांच्या नावांची चर्चा सुरू असतानाच मंत्री सतीश जारकीहोळी यांनी हेब्बाळकर यांच्या बाजूने भूमिका मांडल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष या घडामोडीकडे लागले आहे. मंत्रिमंडळ पुनर्रचनेदरम्यान महिलांना अपेक्षित प्रतिनिधित्व मिळाले …

Read More »

गळतगा स्मशानभूमी हिरवीगार करण्यासह बुद्धविहारात शांततेसोबत पक्ष्यांचा अधिवास

  निपाणी (वार्ता) : भूमी वात्सल्य फाऊंडेशनतर्फे गळतगा येथील स्मशानभूमी परिसरात ५१ देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. स्मशानभूमी परिसर हरित व पर्यावरणपूरक करण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला तक्षशिला बुद्ध विहार सेवा संघ गळतगा यांचे सहकार्य लाभले. भूमी वात्सल्य फाऊंडेशनचे संस्थापक पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांनी पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक प्रबोधनाचा संदेश …

Read More »

कुपवाड हल्ल्यातील जखमी मोहन केसरेकर यांचाही मृत्यू

  खानापूर : सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे 15 ऑगस्ट रोजी खानापूर तालुक्यातील केसरेकर दाम्पत्यावर झालेल्या हल्ल्याची धक्कादायक परिणती झाली आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनीषा केसरेकर यांचा घटनादिवशीच मृत्यू झाला होता. त्यानंतर आयसीयूमध्ये उपचार सुरू असलेले त्यांचे पती मोहन केसरेकर यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे केसरेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर …

Read More »

अत्याधुनिक नंबर प्लेट, हेल्मेट सक्तीबाबत निपाणी पोलिसांची धडक कारवाई; दिवसभरात ३९ जणावर कारवाईचा बडगा

  निपाणी (वार्ता) : श्रावण सोमवारची संधी साधून शहरासह ग्रामीण भागातील नागरिक बाजार आणि इतर कामानिमित्त आले असताना अचानकच निपाणी शहर, बसवेश्वर पोलीस ठाण्यातर्फे उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ यांनी अत्याधुनिक नंबर प्लेट, अल्पवयीन दुचाकीस्वार, विना हेल्मेट दुचाकी स्वारावर येथील साखरवाडी परिसरात दिवसभर कारवाईची मोहीम उघडली. यावेळी पोलिसांनी दंडात्मक कारवाई स्वीकारा अन्यथा …

Read More »