Tuesday , August 25 2026
Breaking News

डॉक्टर्स डे निमित्त खानापूर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा सत्कार

Spread the love

 

खानापूर : राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त खानापूर तालुका डॉक्टर्स असोसिएशनतर्फे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमात असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. डी. ई. नाडगौडा यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ, शाल व हार देऊन सन्मानित केले. यावेळी तालुक्यात आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्यसेवा व जनहिताच्या उपक्रमांचे कौतुक करण्यात आले.

डॉक्टरांचे समाजाच्या आरोग्य संवर्धनातील योगदान अनमोल असून, रुग्णसेवेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या सर्व वैद्यकीय अधिकारी व डॉक्टरांप्रती यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

या प्रसंगी डॉ. सुदर्शन सुळकर, असोसिएशनचे सचिव डॉ. सागर नार्वेकर तसेच अन्य डॉक्टर उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि स्नेहपूर्ण वातावरणात पार पडला.

About Belgaum Varta

Check Also

शिक्षक भरतीत मराठी माध्यमाच्या १९५ जागांचा तातडीने समावेश करा : आमदार विठ्ठल हलगेकर यांची मागणी

Spread the love    खानापूर : कर्नाटकातील सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत रिक्त असलेल्या मराठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *