Friday , July 3 2026
Breaking News

सीसीबीची कारवाई : ४.९६ लाखांचे हेरॉईन जप्त; एकाला अटक, एक फरार

Spread the love

 

बेळगाव : शहर गुन्हे शाखेच्या (सीसीबी) पथकाने एपीएमसी फळबाजार परिसरात छापा टाकून हेरॉईनची वाहतूक करणाऱ्या टोळीवर कारवाई करत एका आरोपीला अटक केली असून, दुसरा आरोपी फरार झाला आहे. या कारवाईत सुमारे ५.०१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव गजानन पाटील (२८, रा. पाटील गल्ली, महाद्वार रोड, कंग्राळी के.एच.) आणि विनायक बाळू खंडाळे (२५, रा. रामदेव गल्ली, कंग्राळी के.एच.) हे दोघे एपीएमसी फळबाजार संकुलाच्या पायऱ्यांजवळ सार्वजनिक ठिकाणी हेरॉईनची वाहतूक करत असल्याची माहिती सीसीबीला मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ भजन्त्री व त्यांच्या पथकाने छापा टाकला. कारवाईदरम्यान २४.८० ग्रॅम हेरॉईन (किंमत ४ लाख ९६ हजार रुपये) आणि सॅमसंग गॅलेक्सी मोबाईल (किंमत ५ हजार रुपये) असा एकूण ५ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी आरोपींना हेरॉईन पुरविणाऱ्या मुंबईतील ‘अम्मा’ नावाच्या महिलेचाही तपासात समावेश करण्यात आला असून, तिच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२०/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(सी) आणि २१(ब) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, ही यशस्वी कारवाई करणारे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक, पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ भजन्त्री आणि सीसीबी पथकाचे पोलीस आयुक्त व उपायुक्त यांनी कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

येळ्ळूर हणमंतगौड नगर येथील वीज समस्या कायमस्वरूपी दूर

Spread the love  बेळगाव : येळ्ळूर हणमंतगौड नगर येथील नागरिकांनी माजी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *