विधानसभेत, विधान परिषदेतही गदारोळ बंगळूर : वाल्मीकी विकास महामंडळातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून मंत्री बी. नागेंद्र यांच्या राजीनाम्याची मागणी करत भाजप आणि जनता दल (एस)च्या सदस्यांनी सोमवारी विधानसभेसह विधान परिषदेत जोरदार आंदोलन केले. नागेंद्र यांना मंत्रिमंडळातून तातडीने हटवावे, अन्यथा सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा विरोधकांनी दिला. त्यामुळे दोन्ही …
Read More »पहिल्या श्रावण सोमवारी शिवालये गजबजली
दर्शनासाठी दिवसभर गर्दी : विविध ठिकाणी शाबू खिचडीचे वाटप निपाणी (वार्ता) : व्रत- वैकल्यांचा, सण-उत्सवांचा व हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या हिंदू-मराठी पंचांगातील श्रावण महिन्यास सुरवात झाली आहे. आता महिनाभर सण-उत्सवांची रेलचेल राहणार आहे. पहिल्या श्रावण सोमवारी (ता.१७) शिवालये भाविकांनी फुलून गेली होती. यावर्षी चार श्रावणी सोमवार आले आहेत. …
Read More »अक्कोळ रोडवर शिवशंभो ग्रुपच्या नामफलकाचे अनावरण
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील निपाणी -इचलकरंजी मार्गावरील अक्कोळ रोडवर शिव शंभो ग्रुपच्या नाम फलकाच्या अनावरण सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी सोमनाथ उर्फ पप्पू शिंदे यांनी स्वागत केले. विजय वरुटे यांनी प्रास्ताविकात ग्रुपच्या स्थापनेचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर उत्तम पाटील यांचा ग्रुपतर्फे सत्कार झाला. उत्तम पाटील …
Read More »बोरगाव अरिहंत दूध उत्पादक सहकारी संघाला ४.५९ लाखांचा निव्वळ नफा
निपाणी (वार्ता) : दूध उत्पादक शेतकरी आणि संचालक मंडळांच्या सहकार्याने येथील अरिहंत दूध उत्पादक सहकारी संघाची प्रगती कडे वाटचाल सुरू आहे.अहवाल साल अखेर सभासदांची संख्या ४१३ असल्याचे संघाचे व्यवस्थापक बाहुबली कवटे यांनी सांगितले. भागभांडवल एकूण एक १ लाख ८० हजार रूपये, निधी १९ लाख २६ हजार, ठेवी ३४.९९ लाख …
Read More »हेब्बाळ प्रकरण : खानापूर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जखमी मोहन केसरेकरांच्या प्रकृतीची विचारपूस
खानापूर : हेब्बाळ येथील दुर्दैवी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांच्या सूचनेनुसार खानापूर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रविवारी मिरज येथील शासकीय रुग्णालयाला भेट देऊन जखमी मोहन नागो केसरेकर यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. मोहन केसरेकर हे मिरज शासकीय रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार घेत असून सध्या लाईफ …
Read More »नागपंचमी यात्रेनिमित्त भाविकांची दर्शनासाठी निपाणी नागोबा मंदिरात दिवसभर गर्दी
निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरात सोमवारी (ता.१७) नागपंचमी सण साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी (ता.१६) नागोबा मंदिरात होमहवन व भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला. सोमवारी (ता.१७) सकाळी नागोबा गल्लीतील नागरिक आणि श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर -सरकार यांनी कुंभार गल्ली येथे जाऊन चिखलापासून …
Read More »निपाणी शहरात वळूंची थरारक झुंज
दुचाकींचे नुकसान ; दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली निपाणी (वार्ता) : निपाणी शहरात वारंवार मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला असून येथील नगरपालिका परिसरात वर्दळीच्या ठिकाणी दोन मोकाट वळुंच्या झालेल्या झुंजीत रस्त्याकडेला लावून ठेवलेल्या अनेक दुचाकींचे नुकसान झाले. या जीवघेण्या लढतीमुळे बाजारपेठेत पळापळ झाली होती. मोकाट जनावरांच्या या वाढत्या त्रासामुळे निपाणीकर …
Read More »मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या पादचाऱ्याला अज्ञात वाहनाची धडक बसून मृत्यू
निपाणी (वार्ता) : मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या पादचाऱ्याला अज्ञात वाहनाची धडक बसून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.१६) सकाळी शाहूनगर वळणावर हा अपघात झाला. त्यामध्ये अशोक बाळू कांबळे (५८, रा. जुने संभाजीनगर, निपाणी) यांचा जागीच मृत्यू झाला. अशोक कांबळे हे दररोज मुरगुड व कोडणी रोड परिसरात मॉर्निंग वॉकसाठी जात होते. रविवारी …
Read More »बोरगाव विविधोद्देशीय संघाला १.६३ कोटींचा नफा
अध्यक्ष उत्तम पाटील : जिल्ह्यात संस्था पहिल्या क्रमांकावर निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील बोरगाव विविधोद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाला सहकारत्न दिवंगत रावसाहेब पाटील यांच्यासह संचालक व सभासदांच्या प्रयत्नाने उर्जितावस्था मिळाली. टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. ही संस्था बेळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असून आर्थिक वर्षात १.६३ कोटी रुपये …
Read More »अरिहंत सौहार्द संस्थेला १८.३२ कोटीचा नफा; अध्यक्ष अभिनंदन पाटील
बोरगाव अरिहंतची ३६ वी वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी १९९० साली ज्या उद्देशाने संस्था स्थापना केली. हा उद्देश सफल झाला आहे. सहकार क्षेत्रात काम करताना राजकारण विरहित संस्था चालविल्याने अरिहंत संस्था राज्यात नावलौकिक मिळवली आहे. यंदा संस्थेला १८.३२ कोटी रुपयांचा नफा झाल्याची माहिती संस्थेचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta