Friday , July 3 2026
Breaking News

अरिहंत संस्थेने उंचावले सर्वसामान्यांचे जीवन

Spread the love

 

सहकाररत्न उत्तम पाटील; निपाणी शाखेचा २३ वा वर्धापन दिन

निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, व्यवसायिक, उद्योजकांना केंद्रबिंदू म्हणून बोरगाव येथे दिवंगत रावसाहेब पाटील यांनी अरिहंत को-ऑप संस्थेची स्थापना केली. त्याच्या माध्यमातून पत पुरवठा करून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावले आहे. सध्या संस्थेच्या कर्नाटक आणि महाराष्ट्रात विविध शाखाद्वारे कार्य सुरू आहे. यंदा पुन्हा नवीन शाखा सुरू करण्यात येणार आहेत. संस्थेचे मल्टीस्टेट मध्ये रूपांतर झाले असून महाराष्ट्रातही शाखा सुरू करून पत पुरवठा केला जात असल्याचे मत सहकाररत्न उत्तम पाटील त्यांनी व्यक्त केले.
बोरगाव येथीलअरिहंत को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या (मल्टीस्टेट) निपाणी शाखेचा २३ वा वर्धापन दिन गुरुवारी (ता.२) झाला. त्यावेळी आयोजित महापूजा कार्यक्रमात ते बोलत होते.
अरिहंत संस्थेकडे ठेवींचा ओघ वाढत आहे. उद्योग, व्यवसाय, व्यापार शेतीसह इतर कारणासाठी कर्ज वितरण करण्यात आले आहे. ठेवीदार, कर्जदार, संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांच्या विश्वासावर संस्थेची दिवसेंदिवस संस्थेच्या शाखा वाढत असल्याचे सांगितले. प्रारंभी अनिलकुमार कलाजे यांच्या पौरोहित्याखाली सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते महासरस्वती आणि महालक्ष्मीची पूजा पार पडली.
यावेळी, मुख्य शाखेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, चंद्रकांत कोठीवाले, सुजय पाटील, राजू पाटील -अक्कोळकर, संजय शिंत्रे, टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील, सतीश शहा, वीर पाटील, शिरीष कमते, संचालक शशीकुमार गोरवाडे, नगरसेवक रवींद्र शिंदे, दिलीप पठाडे, निरंजन पाटील-सरकार, गजानन कावडकर, सुंदर पाटील, अभियंते सुनील बल्लोळ, इम्रान मकानदार, महेश पाटील, संस्थेचे सीईओ अशोक बंकापुरे यांच्यासह निपाणी व परिसरातील विविध शाखांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शाखा व्यवस्थापक राजेंद्र बन्ने यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये ‘डॉक्टर्स डे’ दिनानिमित्त वैद्यकीय क्षेत्राबाबत मार्गदर्शन

Spread the love  निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश मिडीयम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *