Monday , August 24 2026
Breaking News

बसच्या खिडकीतून थुंकण्यासाठी डोके बाहेर काढणे जीवावर बेतले; लॉरीची धडक लागून आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू

Spread the love

 

हुबळी : धावत्या बसच्या खिडकीतून थुंकण्यासाठी डोके बाहेर काढलेल्या १७ वर्षीय आयटीआय विद्यार्थ्याचा बाजूने जाणाऱ्या लॉरीला धडक लागून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना धारवाड जिल्ह्यातील कुंदगोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सायंकाळी घडली.

मृत विद्यार्थ्याची ओळख फक्कीरेश चन्नय्या मुत्तळीमठ (वय १७, रा. शिरूर) अशी झाली असून, तो आयटीआयचे शिक्षण घेत होता.

बुधवारी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास लक्ष्मेश्वर डेपोची केए-26 एफ-1039 क्रमांकाची केएसआरटीसी बस प्रवाशांना घेऊन जात असताना हा अपघात झाला.

प्राथमिक माहितीनुसार, केए-04 एडी-7218 क्रमांकाची एम-सँड वाहतूक करणारी लॉरी बसला ओव्हरटेक करत होती. त्याचवेळी फक्कीरेशने बसच्या खिडकीतून थुंकण्यासाठी डोके बाहेर काढले. याच क्षणी त्याच्या डोक्याला लॉरीची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच कुंदगोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला तसेच वाहतूक सुरळीत केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

या प्रकरणी कुंदगोळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

महिला पोलिस अधिकाऱ्याचा अर्धनग्न व्हिडिओ व्हायरल; दोघांविरुद्ध तक्रार, कब्बन पार्क पोलिसांकडून एनसीआर दाखल

Spread the love  बेंगळुरू : कारागृहातील कैद्यांसोबत महिला पोलिस अधिकाऱ्याने अर्धनग्न अवस्थेत व्हिडिओ कॉल केल्याचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *