Sunday , September 20 2026
Breaking News

निपाणीत पालकमंत्र्यासमोर तक्रारींचा ‘पाऊस’

Spread the love

 

निवेदन देण्यासाठी गर्दीचा उच्चांक; निवेदन देण्यासाठी नागरिकांची रिघ

निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरात दिवसेंदिवस विविध समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत शासकीय कार्यालयात समस्या बाबत तहसीलदारासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन ही देऊन ही समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. याची दखल घेऊन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी रविवारी (ता.१२) येथील शासकीय विश्रामगृहात नागरिकांच्या तक्रारींचे निवेदन स्वीकारले. विविध प्रकारच्या समस्या बाबत शेकडो नागरिकांनी निवेदन देण्यासाठी गर्दीच केल्याने केल्याने परिसर नागरिकांनी फुलून गेला होता.
बस स्टँडपासून इदगाह मैदानापर्यंत रस्त्याच्या दुभाजकाची उंची वाढवून त्यावर शोभेची झाडे लावावीत.
लाफायेट हॉस्पिटलजवळ आणि म्युनिसिपल हायस्कूलच्या आवारात असलेल्या हाय-टेक सार्वजनिक शौचालयांची देखभाल करावी.राजा शिवछत्रपती सांस्कृतिक सभागृहाची प्रलंबित कामे पूर्णत्वास न्यावीत. लोकमान्य टिळक, गायत्री, संभाजी महाराज, बाळुमामा उद्यानांचा विकास करून नागरिकांना तीखुली करावीत.
नगरपालिकेच्या मालकीच्या जागावर नामफलकांची व्यवस्था करावी.
दत्त खुले नाट्यगृहाची योग्य ती डागडुजी करावी. जवाहर तलावाजवळ उद्यानाचे बांधकाम करावे. स्मशान मारुती मंदिराजवळ बांधलेली नवीन स्मशानभूमी सुरू करून जागा सार्वजनिक वापरासाठी खुली करणे. गायकवाडी गावातील खाणीत भरलेले पाणी जवाहर तलावात पंपाने सोडण्याची सोय करावी. याशिवाय शासकीय कार्यालयात होणारा भ्रष्टाचार थांबवावा. याशिवाय विविध तक्रारी पालकमंत्र्याकडे नागरिकांनी केली. यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, सहकाररत्न उत्तम पाटील, पंकज पाटील, सुजय पाटील, सुप्रिया पाटील, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, बेडकीहाळ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद, विजय शेटके, राजेंद्र चव्हाण, माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, किरण कोकरे, अल्लाबक्ष बागवान, ॲड. संजय चव्हाण मान्यवरासह नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *