Sunday , September 20 2026
Breaking News

राममंदिर दानपेटी गैरव्यवहार प्रकरणावरून खानापूर काँग्रेसचा भाजप-आरएसएसवर सवाल

Spread the love

 

खानापूर : अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील दानपेटीतील कथित गैरव्यवहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर खानापूर काँग्रेसने भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि संबंधित हिंदुत्ववादी संघटनांवर टीका करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

प्रसिद्धीपत्रकाद्वारे खानापूर काँग्रेसने विचारले आहे की, राममंदिर दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ खानापूरमध्ये भाजप, आरएसएस, बजरंग दल किंवा विश्व हिंदू परिषद यांच्याकडून निषेध मोर्चा अथवा जनजागृती आंदोलन कधी आयोजित केले जाणार? तसेच, या प्रकरणात स्थानिक आमदार आणि खासदारांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

प्रसिद्धीपत्रकात भाजप आणि आरएसएसवर धार्मिक भावना राजकारणासाठी वापरत असल्याचा आरोप करण्यात आला असून, कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणात संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तसेच शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केलेल्या कथित वक्तव्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.

दरम्यान, राममंदिर दानपेटीतील कथित अनियमिततेप्रकरणी तपास सुरू असून विविध राजकीय पक्षांकडून निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *