Sunday , September 20 2026
Breaking News

कै. वरद किरण पाटील यांच्या स्मरणार्थ डेंगू लसीकरण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

 

बेळगाव : श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कपीलेश्वर चौक, बेळगाव यांच्या वतीने तसेच समाजसेवक कपिल भोसले यांच्या सहकार्याने कै. वरद किरण पाटील यांच्या स्मरणार्थ डेंगू लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष आकाश हुल्लीयार यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते संजय वालळकर, महादेव चौगुले, दौलत साळुंके, सचिन सुरुवे, महेश लागडे, संजय पाटील, विनायक जाधव, राकेश पोटे, श्रीधर देसाई, इंद्रजित जाधव, बाला नाईक, विवेक सावंत, महादेव कदम, दर्शन सावघवकर, जयशील मुरकुटे तसेच मंडळाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

याशिवाय परिसरातील पंच मंडळी, रोटरी क्लबचे पदाधिकारी आणि नागरिकांनीही शिबिरात सहभाग नोंदवत उपक्रमाचे कौतुक केले. सार्वजनिक आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामुळे नागरिकांना प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचा लाभ मिळाला. आयोजकांनी भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त केला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *