Sunday , September 20 2026
Breaking News

दलित समाजाच्या विकासात पाटील कुटुंबीयांचे मोठे योगदान

Spread the love

 

नगराध्यक्ष दिगंबर कांबळे :बोरगावमध्ये कुपनलिका खोदाईचा प्रारंभ

निपाणी (वार्ता) : दिवंगत सहकार रत्न रावसाहेब पाटील यांनी बोरगावच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले. विकासात्मक दृष्टिकोन ठेवून कोणत्याही प्रकारचे जात-पात न करता शाश्वत विकास कामे राबविली. दलित समाजाच्या गल्ली बोळात रस्ते डांबरीकरण, गटार, विज, पाणी, पेव्हर ब्लॉक, शुद्ध पाणी घटक अशी विकास कामे राबवून दलित समाजाच्या सर्वांगीण विकास साधला. सहकाररत्न उत्तम पाटील व युवा उद्योजक अभिनंदन पाटील यांनीही समाजाच्या आडीअडचणीत मदत केली आहे. समाजाच्या विकासात पाटील कुटुंबीयांचे मोठे योगदान महत्त्वाचे असल्याचे मत नगराध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी व्यक्त केले.
बोरगाव येथे अरिहंत उद्योग समूहातर्फे आंबेडकर नगरमधील थळोबा मंदिर येथे कुपनलिका खुदाईचा प्रारंभ सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. त्यावेळी कांबळे बोलत होते.
कार्यक्रमास उपनगराध्यक्षा रुक्साना अपराज, नगरसेवक अभयकुमार मगदूम, पिंटू कांबळे, रमेश कुरळे, राजू गजरे, विलास कांबळे, अण्णासाहेब हिरेमनी, तानाजी मधाळे, मुकुंद कांबळे, सागर मधाळे, भैय्या अपराज, बबलू मधाळे, अनिल कांबळे, पूजा हिरेमनी, संग्राम हिरेमनी, अमोल हिरेमणी, रावसाहेब कांबळे, तात्यासाहेब बसन्नावर, बाबासाहेब वसवाडे, सोनू अपराज, राजू अफराज, सुरेश गोसावी यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *