खानापूर : खानापुरात अवैधरित्या वाळूची तस्करी वाढली असून या व्यवसायासाठी विजेचीही बेकायदेशी वापर होत असल्याचे निदर्शनात आले आहे. याकडे हेस्कॉमसह प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी डोळेझाक करत असल्याची तक्रार येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे. खानापूर नदी पात्रातील, वनक्षेत्रातील, सर्व्हे क्रमांक जमिनीतील वाळूची तस्करी जोरात सुरु असून बेकायदेशीरपणे वीज देखील वापरली …
Read More »म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे सांस्कृतिक स्पर्धेमध्ये सुयश
खानापूर : मराठा मंडळ संस्था संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर, हे बेळगाव जिल्ह्यातील एक नामांकित पदवीपूर्व महाविद्यालय म्हणून ओळखले जाते. या महाविद्यालयातील विद्यार्थिनी अभ्यास, कला, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रस्थानी असतात. मराठा मंडळ संस्थेच्या सन्माननीय अध्यक्षा डॉक्टर राजश्रीताई नागराजू (हलगेकर) यांच्या कल्पक मार्गदर्शनाखाली या महाविद्यालयात अनेक लोकोपयोगी उपक्रम …
Read More »खानापूर पट्टन पंचायतसाठी तिघांची नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्ती
खानापूर : कर्नाटक सरकारने खानापूर पट्टन पंचायतसाठी तीन जणांना नामनियुक्त नगरसेवक म्हणून नियुक्त केले आहे. याबाबतचा अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. नामनियुक्त नगरसेवकांची नावे 1. अभिषेक होसमनी, 2. इसाक खान पठान, 3. रूपाली रवी नाईक सदर नियुक्ती बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी तसेच खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसीच्या सचिव …
Read More »“चौगुले पाटील ॲग्रो इंडस्ट्रीज” (गुऱ्हाळ)चा उद्या उद्घाटन सोहळा
खानापूर : खानापूर येथील तरुणांनी सध्या जगभरातून होत असलेली सेंद्रिय पदार्थांची मागणी लक्षात घेत गुऱ्हाळ व्यवसायाकडे पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. 10 ते 15 वर्षे आयटी क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावलेले सौ. स्मितल प्रदीप पाटील, प्रदीप यशवंतराव पाटील आणि त्यांचे सहकारी विशाल नारायणराव चौगुले यांनी खानापूर शहरालगत असलेल्या भोसगाळी कुटीन्हो …
Read More »रेणूका चिरमुरकर यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्कार बहाल
खानापूर : बेळगाव येथील राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळयात बेळगाव विभागातुन यळ्ळेबैल (ता. खानापूर) येथील प्राथमिक मराठी शाळेच्या शिक्षिका सौ. रेणूका नारायण चिरमुरकर यांची निवड झाली. त्यानिमित्त इंन्टीग्रेड सोशल वेलफेअर सोसायटी बेळगाव, नॅशनल रूरल डेव्हलमेंट फाऊंडेशन बेळगाव यांच्या कर्नाटक महाराष्ट्र, गोवा, गुजरात व दिल्ली राज्यातुन राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण केले जाते. …
Read More »हलगा ग्रामपंचायत अध्यक्षावरील अविश्वास ठरावाला उच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश
धारवाड : खानापूर तालुक्यातील हलगा ग्रामपंचायतचे अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांच्यावर शनिवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी अविश्वास ठराव आणण्यात येणार होता. पण कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाच्या न्यायाधीशांनी अविश्वास ठरावाला आज गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी स्थगिती आदेश दिला असून आता पुढील सुनावणी दि. 27 नोव्हेंबर रोजी होणार आहे. अविश्वास …
Read More »खानापूर ता. पं. कार्यकारी अधिकारी म्हणून दिनेशकुमार मीना यांनी स्वीकारला पदभार
खानापूर : खानापूर तालुका पंचायतीच्या कार्यकारी अधिकारी पदावर प्रबेशनरी आयएएस अधिकारी दिनेशकुमार मीना यांनी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर, दिनेशकुमार मीना यांनी तालुका पंचायत कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी खानापूर तालुक्यातील 51 ग्रामपंचायतींच्या कारभाराची आणि योजनांची माहिती संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून सखोलपणे जाणून घेतली. या बैठकीत तालुका पंचायतीचे …
Read More »बस वेळेत सोडण्यासंदर्भात गर्लगुंजी येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन
गर्लगुंजी : खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी येथे बस वेळेवर येत नसल्याने या गावातील शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते. शेवटी आज या गावातील विद्यार्थी – विद्यार्थिनींनी गर्लगुंजी येथे रास्ता रोको करून दोन बस अडविल्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. गर्लगुंजी या ठिकाणी सकाळी 9.30 वाजता येणारी बस 10.30 …
Read More »हलशी ता. खानापूर येथे गोळी लागल्याने तरुणाचा मृत्यू
खानापूर : बंदुकीची गोळी लागल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी मध्यरात्री 3 च्या सुमारास खानापूर तालुक्यातील हलसी हलशी या ठिकाणी घडली आहे. अल्ताफ मकानदार (वय 35) असे मृत तरूणाचे नाव आहे. मृतदेह घटनास्थळावरून त्याच्या घराकडे हलवण्यात आल्याने पोलिसांचा संशय बळावला आहे. पोलिसांनी अल्ताफ सोबत गेलेल्या त्याच्या सहकाऱ्यांना ताब्यात …
Read More »मणतुर्गे येथे रवळनाथ मंदिराचा स्लॅब भरणी समारंभ
खानापूर : मणतुर्गे येथे रवळनाथ मंदिराचा स्लॅब भरणी समारंभ गावकऱ्यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील ज्येष्ठ नागरिक वतनदार वासुदेव पाटील हे होते. सुरुवातीला आबासाहेब दळवी यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर बाळासाहेब शेलार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. गावकर्यांनी मंदिर उभारणीसाठी स्वयंस्फूर्तीने देणगी दिली. …
Read More »