Monday , December 8 2025
Breaking News

खानापूर

खानापूर कदंबा फाऊंडेशनकडून बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील मलप्रभा नदीच्या जॅकवेल जवळ बाजूच्या बेटात अडकलेल्या बेवारस मृतदेहावर खानापूर कदंबा फाऊंडेशन संस्थेच्यावतीने अंत्यसंस्कार नुकताच करण्यात आले. याबाबत मिळालेली माहिती अशी की, खानापूर शहारा जवळून मलप्रभा नदी वाहते. या मलप्रभा नदीच्या पात्राजवळ असलेल्या शहराच्या जॅक वेल जवळ असलेल्या बांबूच्या बेटात एक बेवारस मृतदेह असल्याची …

Read More »

खानापूरात भाजपसह तालुक्यात कनकदास जयंती उत्साहात साजरी

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील विविध कार्यालयात तसेच तालुक्यात आणि खानापूर तालुका भाजप कार्यालयात शुक्रवारी दि. ११ रोजी कनकदास जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी येथील भाजपच्या तालुका कार्यालयात कनकदास जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष संजय कुबल होते. तर कार्यक्रमाला बेळगांव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप युवा नेते …

Read More »

खानापूरात काँग्रेस नेते सतीश जारकीहोळी यांचा भाजपकडून निषेध

  खानापूर (प्रतिनिधी) : काँग्रेस नेते आमदार सतीश जारकीहोळी यांनी हिंदू शब्दाबाबत केलेले वादग्रस्त विधान संपूर्ण हिंदूच्या भावना दुखावल्या गेल्या. अशा वादग्रस्त विधानाचा खानापूरात शुक्रवारी निषेध करण्यात आला. यावेळी खानापूरातील लक्ष्मी मंदिरापासुन निषेध मोर्चा काढण्यात आला. खानापूर तालुका भाजप कार्यालयाच्या समोर निषेध मोर्चाने घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर पणजी बेळगांव महामार्गावरील …

Read More »

खानापूरात जागर लोक संस्कृतीचा कार्यक्रम शनिवारी

  खानापूर (प्रतिनिधी) : लोक संस्कृती नाट्य कला संस्था प्रस्तुत शाहिर अभिजीत कालेकर लिखीत खानापूर तालुक्यातील कलाकारांनी एकत्रीत येऊन तयार केलेल्या लोकसंस्कृतीची ओळख करून देणाऱ्या जागर लोकसंस्कृतीचा कार्यक्रम शनिवारी दि. १२ रोजी सायंकाळी ६ वाजता खानापूर येथील अर्बन बँक समोर आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला संस्कृतीचे संस्थापक दादासाहेब …

Read More »

खानापूर नगरपंचायतीच्या स्थायी समिती बैठकीत विविध विषयांवर चर्चा

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील पाणी पुरवठा, गटारी, मोक्ष धाम दुरूस्ती, अतिक्रमण घर बांधणी आदी विषयांवर खानापूर नगरपंचायतीच्या स्थायी समितीच्या गुरूवारी पार पडलेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थायी समिती चेअरमन प्रकाश बैलूरकर होते. तर व्यासपीठावर उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलिपी, चीफ ऑफिसर बाबासाहेब माने आदी उपस्थित होते. यावेळी प्रेमानंद …

Read More »

खेमेवाडीत वीज पुरवठा सुरळीत करा; ग्रामस्थांची मागणी

  खानापूर (प्रतिनिधी) : खेमेवाडी (ता. खानापूर) हे गाव इदलहोंड ग्राम पंचायतीच्या हद्दीत येते. या गावाला गेल्या काही दिवसापासून वीज पुरवठा सुरळीत नाही. त्यामुळे खेमेवाडी ग्रामस्थांना अंधाराशी सामना करावा लागत आहे. या वैतागलेल्या खेमेवाडी नागरिकांनी हेस्काॅम खात्याला वारंवार टी सी बदलुन वीजपुरवठा सुरळीत करा, अशा मागणीचे निवेदन हेस्काॅमच्या अभियंत्या कल्पना …

Read More »

खानापूरात एकीची वज्रमूठ!

  खानापूर : दोन गटात विखुरलेली खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीत अखेर मध्यवर्तीच्या पुढाकाराने एकी झाली. आगामी विधानसभा निवडणुकीत मराठी भाषिकांनी एकत्र येऊन मराठीची ताकद दाखवून देण्यासाठी मध्यवर्तीने खानापूर समितीमध्ये एकी करण्याचा निर्धार केला. त्याअनुषंगाने आज खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत एकीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. शिवस्मारक येथे दोन्ही गटात …

Read More »

माजी आमदारांकडून शक्तिप्रदर्शनाचा अयशस्वी प्रयत्न!

  खानापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नावावर आमदारकी भूषविलेल्या खानापूर तालुक्यातील एका माजी आमदारांचा उद्या मुख्यमंत्री बोम्माई यांच्यासमोर शक्तिप्रदर्शनाचा केविलवाणा प्रयत्न अपयशी ठरला आहे. सध्या भाजपवासीय असलेल्या माजी आमदारांनी खानापूर तालुक्यातील मणतुर्गे येथील कट्टर समितीच्या कार्यकर्त्यांसमवेत काढलेला एक फोटो सध्या समाजमाध्यमाद्वारे सर्वत्र फिरत आहे. त्यांच्यासोबत मणतुर्गे येथील समितीनिष्ठ कार्यकर्त्यांचा भाजपात …

Read More »

खानापूरात मुख्यमंत्र्याच्या होणाऱ्या आगमनाने जांबोटी क्राॅसवरील रस्त्याचे काम मार्गी

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील जांबोटी क्राॅसवरील अग्रीकल्चर कार्यालयासमोर रस्त्याची दुरावस्था झाली होती. या रस्त्यावर सीडीचे अर्धवट काम झाले होते. त्यामुळे जांबोटी क्राॅसवरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना तसेच प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. मात्र प्रथमच कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई हे बुधवारी दि. ९ रोजी खानापूर दौऱ्यावर येत असल्याने …

Read More »

खानापूरात जनस्पंदन सभेला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती; ३० हजारहून अधिक उपस्थिती

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील जांबोटी क्राॅसवरील मलप्रभा क्रिडांगणावर उद्या बुधवारी दि. ९ रोजी सायंकाळी चार वाजता कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई जनस्पंदन सभेला उपस्थित राहाणार आहेत, अशी माहिती खानापूर तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल यांनी तालुका भाजपच्या कार्यालयात बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, राज्याचे …

Read More »