Monday , December 8 2025
Breaking News

खानापूर

नंदगड संगोळी रायण्णा समाधीस्थळी माजी सैनिकांचा सत्कार

खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) येथील वीर संगोळी रायण्णा समाधीस्थळी भाजप युवा मोर्चा खानापूर यांच्यावतीने तालुक्यातील माजी सैनिकांचा सत्कार नुकताच करण्यात आला. यावेळी बोलताना भाजपचे नेते व माजी आमदार अरविंद पाटील म्हणाले की, आपल्या भाजप पक्षाच्या अध्यक्षाच्या आदेशानुसार माजी सैनिकांचा आदर व्हावा. ज्यांनी आपले आयुष्य देशाच्या संरक्षणासाठी खर्ची घातले. …

Read More »

हलशी येथील सरकारी मराठी शाळेचा अमृत महोत्सवी सोहळा रविवारी

बेळगाव : हलशी येथील सरकारी मराठी शाळेचा अमृत महोत्सवी सोहळा रविवारी (ता. 24) रोजी आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त शोभायात्रेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात हलशी येथे मराठी शाळेची स्थापना करण्यात आली होती. तेंव्हापासून आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी शाळेत शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे …

Read More »

खानापुरमध्ये दिव्यांगांना मोफत कृत्रीम अवयव व तपासणी शिबीर

खानापुर (प्रतिनिधी) : वाहन अपघात किंवा युद्धात कोणत्यातरी कारणांनी नैसर्गिक अवयव गमाविणाऱ्या व्यक्तींना कृत्रिम अवयवांची गरज भासते. तसेच कर्करोग, संसर्ग आणि अभिसरण रोग इत्यादींमुळे नैसर्गिक अवयव कापावे लागून त्याना कृत्रिम अवयाची गरज निर्माण होते. अशा शिबीरातून ही गरज पूर्ण होते, असे मत खानापुर नगर पंचायतचे अध्यक्ष, मजहर खानापूरी यांनी कार्यक्रमाच्या …

Read More »

हलशी मॅरेथॉन स्पर्धेत १०० जणांचा सहभाग

खानापूर (प्रतिनिधी) : हलशी (ता. खानापूर) येथील मराठी शाळेच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याचे औचित्य साधुन गुरूवारी दि. २१ रोजी आयोजीत करण्यात आलेल्या मुला, मुलीच्या मॅरेथॉन स्पर्धेत १०० धावपटूनी सहभाग घेतला होता. मॅरेथॉन स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय कब्बडीपटू मारूती देवापा देसाई होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून तोपिनकट्टी श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठलराव …

Read More »

खानापूरात सकल योजनाची वर्षपूर्ती फेरी

खानापूर (प्रतिनिधी) : सरकारी योजनेच्या सकल योजनेला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त खानापूर तहसील कार्यालयाच्यावतीने बुधवारी दि. २० रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयाच्या आवारातून सकल योजनेची प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी तहसीलदार प्रविण जैन यांच्याहस्ते सकल योजनेच्या प्रचार फेरीची सुरुवात करण्यात आली. यावेळी तहसील कार्यालयापासून फेरीची सुरूवात झाली. शिवस्मारकातून बाजार …

Read More »

खानापूर शहराजवळील महामार्गाची दुरावस्था

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर-पणजी महामार्गावरील शहरापासून जवळील मलप्रभा नदीच्या नविन पुलापासून ते गोवा क्रॉसपर्यंतच्या महामार्गावरील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. गेल्या कित्येक दिवसापासून या रस्त्याची दुरूस्ती झाली नाही. याकडे संबंधित खात्याचे व तालुका प्रतिनिधीचे साफ दुर्लक्ष होत आहे. मागील वर्षी लायन्स क्लब व करंबळ गावच्या युवा कार्यकर्त्यांनी श्रमदानातून खड्डे बुडविले होते. …

Read More »

कबनाळी गावासाठी निवेदनाव्दारे बसची मागणी

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील कबनाळी गावाला खानापूर-कबनाळी अशी बससेवा सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन तालुका विकास आघाडीतर्फे बस आगार व्यवस्थापक महेश यांना निवेदन देण्यात आले. यावेळी खानापुर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील व इतर निवेदनात म्हटले आहे की, खानापूर ते निलावडे मार्गे कबनाळी गावासाठी बस सुविधा व्हावी. कारण …

Read More »

जत-जांबोटी महामार्गावरील रामगुरवाडीजवळ डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील जत-जांबोटी महामार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरणासाठी २० कोटी रूपयाचे अनुदान मंजुर करून कामाला सुरूवात झाली. मात्र खानापूर जांबोटी रस्त्यापासून रामगुरवाडी गावापर्यंत साधारण एक किलोमीटर रस्त्यावर एक महिन्यांपूर्वी जे डांबरीकरण करण्यात आले आहे ते निकृष्ट दर्जाचे झाले असून काही ठिकाणी खड्डे पडले असून याच्यात डांबराचे प्रमाणही कमी …

Read More »

खानापूरच्या जंगलातील चिगुळे गावात रॉकेलची सोय करा

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याचा पश्चिम भाग हा घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. पावसाळ्यात उन्हाळ्यात या भागात या-ना त्या कारणाने वीज पुरवठा खंडीत होत असतो. त्यातच अतिपावसाचा परिसर असल्याने सतत पाऊस पडत असतो. अशावेळी आग पेटून शेकोटीशिवाय जगताच येत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना रॉकेलची नितांत गरज आहे. रॉकेलवीना पावसाळ्यात दिवस …

Read More »

खानापूर हेस्कॉमच्या ग्राहक मेळाव्यात विविध समस्यावर चर्चा

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर हेस्कॉमच्या कार्यालयात नुकताच ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक कार्यकारी अभियंता रंगनाथ सी. एस. होते. मेळाव्यात तक्रार मांडताना मोदेकोप गावचे शेतकरी श्रीकांत बाळापा कांबळे म्हणाले की, सर्व्हे नंबर 122/16 मधील शेतात एक वर्ष झाले. टी सी बंद आहे. त्यामुळे वीजपुरवठा होत नाही. …

Read More »