Monday , December 8 2025
Breaking News

खानापूर

आगामी निवडणुकीसाठी समितीच्या सर्व गटांनी एकत्र येऊन निवडणूक लढविणे गरजेचे

खानापूर (प्रतिनिधी) : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी समितीची स्थापना झाली आहे. या भागातील आपली मराठी अस्मिता दाखवण्यासाठी प्रत्येक निवडणुकीत समितीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मराठी माणसाने आजपर्यंत काम केलेले आहे. समितीत अनेक वेळा गटबाजी झाली असली तरी जि. पं. व ता. पं. निवडणूकीत सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली आहे. हाआजपर्यंतचा इतिहास आहे. आगामी जिल्हा …

Read More »

खानापूर घोडे गल्लीत कामाचा शुभारंभ

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील वार्ड ६ मधील घोडे गल्लीत सीसी गटारीच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.यावेळी नगरसेविका मिनाक्षी प्रकाश बैलूरकर यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मजहर खानापूरी, नगरसेवक प्रकाश बैलूरकर, स्थायी समिती अध्यक्ष लक्ष्मण मादार, नगरसेविका मेघा कुंदरगी, शोभा गावडे, डाॅ. सी. जी. पाटील, चंदू कुंभार, …

Read More »

खानापूर नगरपंचायतीच्या बैठकीत खोकीधारकांना न्याय

खानापूर (प्रतिनिधी) : सोमवारी पार पडलेल्या खानापूर नगरपंचायतीच्या मासीक बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी शहरातील जांबोटी क्राॅसवरील जवळपास ७० खोकीधारकांना जत-जांबोटी महामार्गाच्या रूंदीकरण व डांबरीकरणाचे कारण दाखवुन हलविले. तसेच तहसील कार्यालयासमोरील खोकीधारकांनाही हलविले. या सर्वांना जांबोटी क्राॅसवरील बसस्थानकाच्या भिंतीला लागुन असलेेल्या जागेवर गाळे बांधुन देण्याचा निर्णय नगरपंचायतीच्या बैठकीत …

Read More »

बुधवारी खानापूर म. ए. समितीची बैठक

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकरणीची बैठक बुधवारी दि. ७ रोजी सकाळी ११ वाजता शिवस्मारकातील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.बैठकीला तालुका पंचायत व जिल्हा पंचायत निवडणूकी संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. तरी बैठकीला आजी- माजी लोकप्रतिनिधीनी, कार्यकरणीच्या सदस्यानी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष देवाप्पा गुरव यांनी केले …

Read More »

रयत मोर्चाच्यावतीने देवलती येथे वृक्षारोपण

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील देवलती येथील गावच्या डोंगरावर रयत मोर्चाच्यावतीने वृक्षारोपण सोमवारी साजरा करण्यात आला.यावेळी तालुका भाजपा अध्यक्ष यांच्याहस्ते झाडे लावण्यात आली.कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रत्येकाच्या हस्ते रोप लागवड करण्यात आली.यावेळी जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, गुंडू तोपिनकट्टी, विठ्ठल हलगेकर, सुरेश देसाई, अशोक देसाई, सदानंद होसुरकर, रयत मोर्चा अध्यक्ष प्रकाश …

Read More »

खानापूर नगरपंचायतीच्या बैठकीत विविध विषयावर चर्चा

खानापूर (प्रतिनिधी) : सोमवारी पार पडलेल्या खानापूर नगरपंचायतीच्या मासीक बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मजहर खानापूरी होते.यावेळी तालुक्याच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यानी बैठकीला उपस्थित दर्शविली.प्रारंभी नगरपंचायतीच्या वतीने आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालुन सत्कार केला.यावेळी बैठकीत नगरपंचायतीच्या दुर्गानगर भागातील वाजपेयी काॅलनीत …

Read More »

राष्ट्रीय पक्षांकडून खानापूर-रामनगर रस्त्याचे श्रेय लाटल्याचा प्रयत्न

खानापूर म. ए. युवा समितीचा आरोप खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर-रामनगर रस्त्याचे काम रखडल्याने मे महिन्यातच या रस्त्याचे फोटो व छायाचित्रण करून खानापूर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांना या रस्त्यासंदर्भात निवेदन सादर केले. व त्याचे लक्ष वेधुन घेतले. लागलीच तालुक्यातील राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांनी याचे त्रेय …

Read More »

शेवटी गावकऱ्यांनीच पर्याय शोधला…….!!

खानापूर : घोटगाळी ग्राम पंचायत परिसरातून घोटगाळी ते शिवठाण, कोडगई, शेंदोळी केएच, शेंदोळी बीएच व इतर गावांना जोडणारा एकमेव रस्ता आहे. आणि याच रस्त्याला एक लहानशी नदी वाहाते पावसामध्ये जाण्या-येण्यासाठी वाट सुस्थितीत नसते, प्रवाश्याना जवळजवळ तीस किलो मीटर पल्ला गाठून घोटगाळीला यावे लागते. पावसाच्या अतिवृष्टीमुळे पायी चालत येणाऱ्या प्रवाशांसाठी पण …

Read More »

मंगळवारी खानापूरात म. ए. समितीची बैठक

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक मंगळवारी दि. ६ रोजी दुपारी २ वाजता येथील शिवस्मारकातील कै. माजी आमदार व्ही. वाय. चव्हाण सभागृहात बोलविण्यात आली आहे.बैठकीत येणाऱ्या जिल्हा पंचायत तसेच तालुका पंचायत निवडणुकीसंदर्भात तसेच इतर महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील आजी, माजी प्रतिनिधीनी, समितीच्या …

Read More »

खानापूरात प्रलंबित खटले काढण्यासाठी १४ ऑगस्टला लोकअदालत

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर न्यायालयात प्रलंबित खटले निकालात काढण्यासाठी १४ ऑगस्ट रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.कर्नाटक उच्च न्यायालय व राज्य कायदा सेवा प्राधिकरणाच्यावतीने तालुका स्तरावर अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले खटले आहेत यासाठी खानापूर न्यायालयात बृहत लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा वकीलांनी तसेच पक्षकारानी या लोक अदालतीचा लाभ …

Read More »