Sunday , December 7 2025
Breaking News

निपाणी

शासनाच्या सोयी, सुविधा मिळविण्यासाठी धार पवार बांधवांचा लवकरात निपाणीत मेळावा

  निपाणी (वार्ता) : धार, पवार बांधवांना एकत्र आणण्यासाठी निपाणी लवकरच बेळगाव जिल्ह्यासह सीमाभागातील धार पवार समाजबांधवांची व्यापक मेळावा घेण्यात येणार आहे. त्यामुळे समाज बांधवांनी संपर्क साधण्याचे आवाहन समाजाचे ज्येष्ठ नागरिक गोविंद पवार निपाणी (रामपूरकर) यांनी केले आहे. पवार म्हणाले, समाजाचा इतिहास सीमा भागातील पवार बांधवांना समजणे आवश्यक आहे. याशिवाय …

Read More »

सेवानिवृत्ती निमित्त मुख्याध्यापक एम. डी. मुल्ला यांचा विविध ठिकाणी सत्कार

  निपाणी (वार्ता) : येथील सरकारी कन्नड उच्च प्राथमिक शाळा क्र.१ चे मुख्याध्यापक एम. डी. मुल्ला हे सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विविध शाळा, संघटना व समित्यांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. एसडीएमसी समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष सत्याप्पा चिंगळे होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन झाले. …

Read More »

विज्ञान स्पर्धामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना; गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक

  कुर्ली हायस्कूलमध्ये विज्ञान वाचन गोष्टी स्पर्धा निपाणी (वार्ता) : विद्यार्थ्यांमधील जिज्ञासू वृत्ती जोपासण्यासाठी व त्यांच्यातील कल्पकतेला वाव देण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम आवश्यक आहेत. विज्ञान स्पर्धा व कृतियुक्त शिक्षणामुळे विज्ञानाबद्दल गोडी निर्माण होवून कल्पकतेला चालना मिळते, असे मत गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांनी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात …

Read More »

गाळेधारकांच्या नोटीसा मागे न घेतल्यास आंदोलन; नगरपालिका गाळेधारकांचा इशारा

  नगरपालिकेच्या नोटीसीमुळे गाळेधारकांमध्ये भीतीचे वातावरण निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेतर्फे शहरातील गाळेधारकांना नोटीस बजावण्यात आल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राप्त आदेशानुसार गाळे रिकामी करून नगरपालिकेच्या ताब्यात देण्याचे निर्देश देण्यात आले असून त्यानंतर या गाळ्यांचा फेरलिलाव केला जाणार असल्याचे नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.गाळेधारकांनी प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त …

Read More »

वाळकीतील शर्यतीत पाचगावची बैलगाडी प्रथम

  महादेव यात्रेनिमित्त भव्य आयोजन निपाणी (वार्ता) : वाळकी येथील ग्रामदैवत महादेव यात्रेनिमित्त मंगळवारी (ता.९) सकाळी पार पडलेल्या भव्य बैलगाडी, घोडागाडी व घोडेस्वार शर्यतीत पाचगाव येथील सागर पाटील यांच्या गाडीने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्यांना रोख रक्कम व आकर्षक बक्षिसांनी गौरविण्यात आले. जनरल बैलगाडी शर्यतीत सागर पाटील-पाचगाव यांनी ३० हजार रुपये …

Read More »

दत्त खुले नाट्यगृहसमोरील तलावातील पाण्यामुळे होणाऱ्या समस्याबाबत आयुक्तांना निवेदन

  निपाणी (वार्ता) : नगरपालिका मालकीच्या दत्त खुले नाट्यगृहासमोरील तलावातील दूषित पाण्यामुळे परिसरात आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी वारंवार केली असली तरी नगरपालिकेकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. याबाबत शासननियुक्त नगरसेवक अरुण आवळेकर यांच्या हस्ते मंगळवारी (ता.९) नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे …

Read More »

श्री संत बाळूमामा दूध संस्था मुमेवाडी यांच्या मार्फत नॉनस्टिक कढई व शालेय साहित्य वाटप

  श्री संत बाळूमामा दूध संस्था मुमेवाडी यांच्यामार्फत दूध उत्पादकांना नॉनस्टिक कढई वाटप त्याचबरोबर दहावी व बारावी तसेच आठवी शिष्यवृत्ती अबॅकस मध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे चेअरमन यांनी संस्थेची स्थापना केव्हा झाली. त्याचबरोबर संस्थेची स्थापना वेळेची संकलन आत्ताचे संकलन त्याचबरोबर …

Read More »

बोरगावमधील होम मिनिस्टर स्पर्धेला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील शरद जंगटे पुरस्कृत ज्ञानज्योती गणेश मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त आयोजित होम मिनिस्टर स्पर्धेत रूपाली हेगळे या विजेत्या ठरल्या. त्यांना नगरसेवक शरद जंगटे व मान्यवरांच्या हस्ते फ्रिज व मानाची पैठणी प्रदान करण्यात आली. या स्पर्धेत अश्विनी डकरे, सपना चौगुले, सीमा महाजन व रोशनी माने यांना वॉशिंग मशीन, …

Read More »

जिल्हा बँक निवडणुक पाठिंब्याचे लक्ष्मण चिंंगळे यांना सर्वाधिकार

  मेंढी व लोकर उत्पादक संघ पदाधिकाऱ्यांचा निर्णय निपाणी (वार्ता) : सध्या होऊ घातलेल्या बेळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निपाणी तालुका लोकर उत्पादक सहकारी संघ व मेंढी संगोपन सहकारी संघाच्या पदाधिकाऱ्यांची येथील शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. त्यामध्ये सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंब्याचे सर्वाधिकार बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय एकमुखाने …

Read More »

‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात निपाणीत सार्वजनिक गणेशांचे विसर्जन

  निपाणी (वार्ता) : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही क्षमा असावी, अशी प्रार्थना करत सार्वजनिक गणेश मंडळासह गणेशभक्तांनी शनिवारी (ता. ६) गणरायांना पारंपारिक वाद्यांच्या गजरात “पुढच्या वर्षी लवकर या”च्या घोषणात निरोप दिला. दहा दिवसांच्या कालावधीत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. विसर्जनाच्या दिवशी जल्लोष शिगेला पोहचला असला …

Read More »