निपाणी (वार्ता) : बेनाडी मल्लिकार्जुन नगरातील लोकवस्ती वाढली आहे. पण या ठिकाणी स्मशानभूमी, बस स्थानक निवारा शेड आणि उद्या नसल्याने परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे तात्काळ वरील गोष्टींची पूर्तता करावी या मागणीचे निवेदन मल्लिकार्जुन नगरातील नागरिकातर्फे हसीलदार कार्यालयाला दिले. निवेदनातील माहिती अशी, गेल्या पंचवीस वर्षापासून मल्लिकार्जुन नगरात आणि …
Read More »पारदर्शी कारभारामुळे ‘भाग्यलक्ष्मी संस्था’ नावारूपास; सहकाररत्न उत्तम पाटील
बोरगाव भाग्यलक्ष्मी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा निपाणी (वार्ता) : स्पर्धेच्या युगात नियोजना अभावी अनेक संस्था अडचणीत येत आहेत. युवा उद्योजक माणिक कुंभार आणि संचालक मंडळाच्या पारदर्शक कारभारामुळे बोरगांव भाग्यलक्ष्मी क्रेडिट सौहार्द सहकारी संस्था सहकार क्षेत्रात नावारूपास आली. आहे. सहकारी संस्था टिकवण्यासाठी तारेवरची कसरत आहे, असल्याचे मत सहकाररत्न उत्तम पाटील …
Read More »जी. आय. बागेवाडी महाविद्यालयाच्या एनएसएस विभागातर्फे एक दिवसीय विशेष शिबिर
निपाणी (वार्ता) : स्वच्छता, पर्यावरण निर्माण करणे जनतेमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासह सामाजिक जबाबदारीची भावना रुजवणे या उद्देशाने येथील जी. आय. बागेवाडी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) युनिटतर्फे ‘स्वच्छता अभियान-२०२६’ चा भाग म्हणून रविवारी (ता.९) आडी गावातील श्री मल्लिकार्जुन मंदिरात एक दिवसीय स्वच्छता शिबिर घेण्यात आले.महाविद्यालयाच्या …
Read More »‘महात्मा बसवेश्वर’ संस्थेला १०.७२ कोटीवर नफा
अध्यक्ष किशोर बाली; ६४.५१ कोटी रुपयांची गुंतवणूक निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेला यावर्षी ८ १०.७२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. मल्टीस्टेट संस्थेमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संस्थातर्फे इतर ठिकाणी ६४.५१ लाखावर सुरक्षित गुंतवणूक केली आहे. याशिवाय सभासदांना विविध सुविधा उपलब्ध करून …
Read More »मराठा मंडळ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा वर्षा सहलीत निसर्गसौंदर्याची अनुभूती
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मराठा मंडळ हायस्कूलच्या निपाणी ते रामलिंग पायी प्रवास करून मंदिर परिसर स्वच्छता, वृक्षारोपण करून वर्षा सहलीत निसर्ग सौंदर्याची अनुभूती घेतली. शिवाय पावसाळ्याच्या हिरव्यागार निसर्गरम्य वातावरणात वर्षा सहलीचा मनमुराद आनंद लुटत, पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून वृक्षारोपण केले. विद्यार्थ्यांनी शिस्त, संयम आणि …
Read More »रयत संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त ढोणेवाडीत नेत्र, रक्तदान शिबिर
निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या ढोणेवाडी येथील शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्याला परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार व मान्यवरांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवल्याबद्दल पोवार यांचा शाखेतर्फे सत्कार …
Read More »राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत निपाणी सद्गुरु तायक्वांदो अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे यश
निपाणी (वार्ता) : बंगलोर येथील कोरमंडल स्टेडियममध्ये ४३ वी राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा पार पडल्या. कर्नाटका तायक्वांदो, कर्नाटक ऑलिम्पिक असोसिएशन, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ कर्नाटका, इंडिया तायक्वांदो यांच्या अंतर्गत या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेमध्ये फाईट, पुमसे, अशा स्वरूपात आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये निपाणी येथील सद्गुरू तायक्वांदो स्पोर्ट्स …
Read More »साखरवाडीमधील एस आय आर प्रक्रिया पूर्ण
निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यामध्ये एस आय आर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जनतेला कोणत्याही प्रकारच्या अडचणी उद्भवू नयेत, यासाठी कर्नाटक सरकारच्या निर्देशानुसार इन्कम व कास्ट सर्टिफिकेट प्रत्येक नागरिकाच्या घरी जाऊन वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या अनुषंगाने गुरुवारी (ता.६) निपाणी शहरातील साखरवाडी परिसरामध्ये नागरिकांच्या घरोघरी जाऊन इन्कम व …
Read More »‘जवाहर’ तलाव ओव्हर फ्लोसाठी ४ फुटाची आवश्यकता
पाणी पातळी ४२.१ फुटावर : शिरगुप्पी ओढ्यातून येणाऱ्या पाण्याचा परिणाम निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे निपाणीची जीवनदायिनी असणाऱ्या जवाहर तलावाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. शनिवारी (ता.८) पाणी पातळी ४२.१ फुट इतकी झाली आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात मान्सून असाच राहिल्यास आठवडाभरात तलाव भरून ओव्हरफ्लो …
Read More »सीमाभागातील शैक्षणिक समस्याबाबत रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मंत्री मुश्रीफ यांची भेट
निपाणी (वार्ता) : सीमावादामुळे कर्नाटक भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यांना स्वतःच्या मातृभाषेतून दर्जेदार शिक्षण मिळवण्यासाठी आणि पुढील उच्च शिक्षणासाठी दोन्ही राज्यांच्या प्रशासकीय पातळीवर संघर्ष करावा लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी महाराष्ट्राचे वैद्यकीय व शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची कागल येथे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta