


सर्वपित्री अमावास्येपासून नवरात्र, दसरा, कोजागरी, करवा चौथ
निपाणी (वार्ता) : ऑक्टोबर महिन्यात विविधव्रत-वैकल्ये आणि सणांची पर्वणी आहे. पितृपक्षातील सर्वपित्री अमावास्या, त्यानंतर सुरू होणारी शारदीय नवरात्र, विजयादशमी (दसरा), कोजागरी पौर्णिमा, करवा चौथ यांसारखे प्रमुख सण याच महिन्यात आले आहेत. त्यामुळे मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम, पूजाविधीसह विविध उपक्रमांची लगबग पाहायला मिळणार आहे.
१० पितृपक्षाच्या अखेरीस ऑक्टोबरला सर्वपित्री अमावास्या आहे. पूर्वजांच्या स्मरणार्थ या दिवशी श्राद्धविधी करण्याची परंपरा पार पडणार आहे. त्यानंतर ११ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला प्रारंभ होणार आहे. नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची आराधना
केली जाणार आहे. शहरासह ग्रामीण भागातही घटस्थापना, देवीच्या पूजेचे आयोजन केले जाणार आहे. २० ऑक्टोबरला दसरा असून या दिवशी महानवमीची पूजा, विजयादशमीचे विधी होतील. दसऱ्यानिमित्त शस्त्रपूजन, वाहनपूजन, सीमोल्लंघन होणार आहे.
महिन्याच्या उत्तरार्धात २५ ऑक्टोबरला कोजागरी पौर्णिमा आहे. रात्री चंद्रप्रकाशात लक्ष्मीपूजन करण्याची परंपरा आहे. २९ ऑक्टोबरला करवा चौथ आणि संकष्टी चतुर्थी येत आहे. याच दिवशी वक्रतुंड संकष्टी चतुर्थी असल्याने गणेशभक्तांसाठीही हा दिवस महत्त्वाचा आहे.

Belgaum Varta Belgaum Varta