निपाणी (वार्ता) : निपाणी शहराबाहेरील रोहिदासनगर मधील संत गजानन महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा कार्यक्रम पार पडला. पौर्णिमेनिमित मंदिरातील मूर्तीची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. यावेळी दिवसभर भाविकांनी दर्शनासह महाप्रसादासाठी गर्दी केली होती. काकड आरती, सकाळी माऊलींच्या मूळ मूर्तीस अभ्यंगस्नान, अभिषेक घालून आरती झाली. त्यानंतर ५१ महिलांच्या उपस्थितीत पारायण झाले. …
Read More »अक्कोळ येथील पार्श्वभूमी विद्यालयात गणवेश, शैक्षणिक साहित्याचे वितरण
निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथील श्री पार्श्वमती विद्यालयात शालेय गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी अक्कोळ गावचे गावकामगार पाटील राजू पाटील होते. प्रारंभी आचार्य श्री १०८ गुरुदेव समंतभद्र महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याध्यापक डॉ. राकेश तावदारे यांनी शालेय गणवेश आणि शैक्षणिक …
Read More »निपाणी, ममदापूर येथे सिद्धोजीराजे पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील जोल्ले शिक्षण संस्था संचलित श्रीमंत सिद्धोजीराजे पदवीपूर्व कॉलेजमध्ये सिद्धोजीराजे राजे यांची पुण्यतिथी झाली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत दादाराजे निपाणकर -सरकार उपस्थित होते. यावेळी दादाराजे यांनी सिद्धोजीराजे यांच्या कार्याला उजळा देत विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याचे माहिती दिली. कार्यक्रमास …
Read More »विद्यार्थ्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करावा
प्राचार्य एम. एम. हुरळी; बागेवाडी महाविद्यालयात एकदिवसीय कार्यशाळा निपाणी (वार्ता) : विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान, कौशल्ये आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर केला पाहिजे. त्यासाठी आता सर्व ठिकाणी विविध प्रकारच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आपल्या आवडीनिवडीनुसार तर त्यामध्ये काम करावे, असे आवाहन प्राचार्य एम. एम. हुरळी यांनी …
Read More »बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी दिला गरीब कुटुंबातील विद्यार्थिनीला लॅपटॉप
निपाणी (वार्ता) : मिरापुरहट्टी (ता. चिकोडी) येथील गरीब कुटुंबातील विद्यार्थिनी बेळगाव येथील जैन इंजीनियरींग महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. परिस्थितीने गरीब पण हुशार असलेली मुलगी तेजस्वीनी लकाप्पा कजज्जीडोने हिला लॅपटॉपची गरज होती. त्यामुळे तिने आपल्या वडिलांसह चिक्कोडीतील जिल्हा काँग्रेस कार्यालयात बुडा व चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांना …
Read More »महामार्गावरील उड्डाणपूलासह भराव काम दर्जेदार करण्याची रोहन साळवे यांची सूचना
निपाणी (वार्ता) : पुणे–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील महात्मा गांधी रुग्णालयाच्या भुयारी मार्गालगत नव्याने निर्माण केलेला भराव पावसामुळे कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या आवताडे कंपनीचे कंत्राटदार विजय दाईगडे यांच्याकडून भराव खचण्यामागील कारणांची सविस्तर …
Read More »प्रतिभा पोषक परीक्षेत अक्कोळ हायस्कूलच्या तीन विद्यार्थ्यांची निवड
निपाणी (वार्ता) : राजलक्ष्मी चिल्ड्रन फाउंडेशनतर्फे आर्थिकदृष्ट्या दुर्बल व हुशार विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून शैक्षणिक मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने निवड चाचणी घेण्यात आली होती. या निवड चाचणीमध्ये अक्कोळ येथील भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अक्कोळ हायस्कूलचे श्लोक, चिमगावे, स्नेहल, रेंदाळे, चैत्राली किल्लेदार या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. प्रतिभा पोषक परीक्षेत …
Read More »पावसामुळे चिखलातून विद्यार्थी, शिक्षकांचा प्रवास
भीमनगर भागातील परिस्थिती; म्युनिसिपल हायस्कूल मधील विद्यार्थ्यांची तारेवरची कसरत निपाणी (वार्ता) : निपाणी येथील शहराबाहेरील भीमनगर परिसरात असलेल्या म्युनिसिपल हायस्कूल आणि प्राथमिक शाळेच्या परिसरातील सततच्या पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यातून ये -जा करताना विद्यार्थी आणि शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शिवाय गढूळ पाणी साठल्याने विद्यार्थ्यांच्या …
Read More »निपाणीत पोलीस भरती परीक्षेसाठी जिल्हा पोलीस प्रमुखांकडून पाहणी
निपाणी (वार्ता) : राज्य शासनातर्फे रविवारी (ता.२ ऑगस्टला) पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी पात्रता परीक्षा घेतली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुखांनी निपाणीला भेट देऊन परीक्षा केंद्रांची पाहणी केली. शहरात तीन केंद्रांवर ही परीक्षा होणार असून कोल्हापूर वेसवरील केएलई महाविद्यालय, शिंत्रे कॉलनीतील व्हीएसएम जी. आ. बागेवाडी महाविद्यालय आणि जत्राट …
Read More »निपाणी मतदारसंघातील एसआयआर कामकाज समाधानकारक असल्याची सुप्रिया पाटील यांची माहिती
निपाणी (वार्ता) : निपाणी मतदार संघातील यादीची सखोल फेरतपासणी म्हणून एसआयआरचे कामकाज सुरू होते. शासनाने दिलेल्या मुदतीपूर्वीच हे काम अंतिम टप्प्यात आल्याची बाब समाधानकारक असल्याची माहिती कर्नाटक प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस सुप्रिया पाटील यांनी दिली. पुढील काळातील निवडणुकीच्या दृष्टीने एस आय आर चे कार्य महत्वपूर्ण आहे. शहर आणि ग्रामीण भागात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta