Monday , December 8 2025
Breaking News

निपाणी

रेल्वे मार्ग न बदलल्यास आंदोलन : राजू पोवार

रयत संघटनेतर्फे निवेदन निपाणी (वार्ता) : बेळगाव – कित्तूर-धारवाड नवीन रेल्वे मार्गासाठी  अर्थसंकल्पामध्ये ९२७ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. यामध्ये बेळगाव परिसरातील विविध ठिकाणची सुपिक जमीन संपादित केली जात आहे. यामुळे शेतकरी कंगाल होऊन भूमिहीन होण्याची भीती आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गासाठी सुपिक जमीन संपादित करण्याचा प्रस्ताव मागे घ्यावा …

Read More »

कुर्ली येथील जवानाचा मृत्यू

कोगनोळी : कुर्ली तालुका निपाणी येथील जवान नवनाथ आप्पा दिवटे यांचा सेवा बजावत असताना अल्पशा आजाराने निधन झाले. जवान नवनाथ यांच्या निधनाची बातमी समजताच गावावर शोककळा पसरली. जवान नवनाथ हे प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपले शिक्षण पूर्ण करून सैन्यदलात भरती झाले होते. नवनाथ हे कायम हसतमुख असल्याने त्यांचा गावांमध्ये मोठा मित्रपरिवार देखील …

Read More »

कोगनोळी फाट्यावर होणारा ब्रिज रद्द

ग्रामपंचायत सदस्य सुनिल माने : शेतकऱ्यांच्या मागणीला यश कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण होणार असून याठिकाणी कोगनोळी फाट्यावर उड्डाणपूल होणार होते. यामुळे येथील शेतकऱ्यांची सुपीक जमीन यामध्ये जाणार होती. यासाठी येथील शेतकऱ्यांनी अनेक वेळा अधिकारी यांच्यासह लोकप्रतिनिधी यांना निवेदन देऊन ब्रिज रद्द करण्यात यावा अशी मागणी केली होती. येथील …

Read More »

राष्ट्रीय महामार्गावरील ब्रिज रद्द झालेल्याचा जबाबदार व्यक्तीने खुलासा करावा

पंकज पाटील : राष्ट्रीय महामार्गावरील जादा जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण होणार असून या ठिकाणी असणाऱ्या प्रसाद नर्सरी पासून दूधगंगा नदी पर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या शेत जमिनी या प्रकल्पामध्ये जात आहे. यामुळे शेतकरी भूमिहीन होणार आहे. आतापर्यंत प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून या ठिकाणी होणारा ब्रिज रद्द करण्यात आला …

Read More »

मुलांना संस्कारमय शिक्षण देण्याची गरज

प्रा. डॉ. अच्युत माने :लिटल अँजलस्कूलचे स्नेहसंमेलन निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात सर्वत्र शिक्षणाचे बाजारीकरण होत आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. संस्कारमय शिक्षणाची उणीव भासत आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रसन्नकुमार गुजर यांनी विविध शाळेच्या माध्यमातून त्यांचे काम सुरू आहे. याही शाळेची जबाबदारी त्यांनी घेतल्याने शाळेचा नावलौकीक वाढत आहे. मुलांना …

Read More »

मनःशांतीसाठी सत्संग सोहळ्यांची गरज

सचिनदादा पवार : निपाणीत एक दिवशीय कीर्तन सोहळा निपाणी (वार्ता) : सध्याच्या युगात मनुष्य क्षणिक सुखाच्या मागे धावत सुटला आहे. सत्ता संपत्ती गोळा केल्याशिवाय चैन पडेनासे झाले आहे. मात्र आपला देह शाश्वत नसून तो अल्पावधीतच आहे. त्यामुळे गोळा केलेले धन हे कुबेराची आहे. मनशांतीसाठी सत्संग सोहळ्याची गरज असून त्यामध्ये प्रत्येकाने …

Read More »

सोयाबीनला अच्छे दिन…

संकेश्वर (प्रतिनिधी) : यंदा शेतकऱ्यांना सोयाबीन पिकांने मालामाल केलेले दिसताहे. गेल्या आठवड्यात सोयाबीनचा दर प्रति किलो ८० रुपयांपर्यंत पोचला होता. आता दरात थोडीशी घसरण होऊन सोयाबीनला ७४-७५ रुपये दर मिळू लागला आहे. युक्रेन-रशिया युद्धामुळे तेल दरात मोठी वाढ होऊ लागल्याने सोयाबीन दरात वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. पंधरवड्यापूर्वी सोयाबीनचा दर …

Read More »

संकेश्वरात स्त्रीत्वाच्या उत्सवाला उदंड प्रतिसाद

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री शंकरलिंग समुदाय भवन येथे रविवारी महिला दिनाचे औचित्य साधून स्त्रीत्वाचा उत्सव ‘स्वयंसिद्धा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते‌. उत्सवात महिलांची तोबा गर्दी पहावयास मिळाली. स्वयंसिध्दा उत्सवात महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तुंचे, खाद्यपदार्थांचे पन्नास स्टाॅल आकर्षकरित्या थाटण्यात आले होते. महिलांनी तयार केलेला चाट मसाला शेंगदाणे लाडू, विविध …

Read More »

एअरमन पदी निवड झाल्याबद्दल प्रथमेश आजरेकर यांचा  माजी विद्यार्थी मंडळातर्फे सत्कार

निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालय, शाळेचा माजी विद्यार्थी प्रथमेश भास्कर आजरेकर याची भारतीय हवाई दलात एअरमन पदी निवड झाली आहे त्यानिमित्त मोहनलाल दोशी विद्यालयातील माजी विद्यार्थी मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्द, चिकाटी आणि कष्ट या जोरावर प्रथमेशने शाळा व महाविद्यालयीन स्तरावर व्हाॅलीबॉल …

Read More »

महाशिवरात्री सोहळ्याची महाप्रसादाने सांगता

निपाणी (वार्ता): येथील महादेव गल्ली येथील महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आठवडाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर गुरुवारी (ता.३) रथोत्सव साजरा करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत निघालेला हा उत्सव पाहण्यासाठी निपाणी शहर परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती. रविवारी (ता.६) दुपारी महाप्रसाद वाटपाने महाशिवरात्री सोहळ्याची सांगता करण्यात आली. प्रारंभी राजू ननदीमठ …

Read More »