बसवप्रसाद जोल्ले; ‘शांतीसागर’च्या शाखेचे माणकापुर उद्घाटन निपाणी (वार्ता) : भारत हा कृषिप्रधान देश असून ७० टक्के नागरिक शेती करतात. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रगती झाल्यास देशाची प्रगती होणार आहे. तो आर्थिक दृष्ट्या प्रबळ तो पुढे जाण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून शेतकरी बांधवांना त्यांचे शेती उत्पन्न वाढवण्यास आर्थिक हातभार लावण्याच्या उद्देशाने संस्थापक अध्यक्ष …
Read More »कर्जबाजारी युवा शेतकऱ्याची बेनाडीत झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
निपाणी (वार्ता) : भाजीपाला आणि फुलशेती करणाऱ्या कर्जबाजारी युवकाने शेतकऱ्याने झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता.२६) सकाळी आत्महत्या केल्याची घटना बेनाडी (ता.निपणी) येथे उघडकीस आली आहे. कल्लाप्पा आप्पासाहेब चौगुले (वय ४५) असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेची नोंद निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात झाले आहे. …
Read More »अवकाळीच्या भीतीने आलेला घास हिरावण्याची चिंता
ताडपत्रीचा आधार घेत शेतकऱ्यांची धडपड; गहू, ज्वारी, हरभरा काढणीला वेग निपाणी (वार्ता) : निपाणी शहर व परिसरातील शिवारात सोन्यासारखं पीक डोलतंय, विहिरीला पाणी असून कष्टाचे फळ पदरात पडण्याची वेळ आली आहे. पण अचानक आभाळ भरून येत असल्याने बळीराजाच्या काळजाचा ठोका चुकत आहे. परिसरात दोन-तीन दिवसांपासून अशीच काहीशी परिस्थिती निर्माण …
Read More »स्वामी मळ्यातील प्रभाग २८ मधील मराठी शाळेच्या दोन खोल्या बांधकामाचा प्रारंभ
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील प्रभाग क्रमांक २८ मधील स्वामी मळ्यातील मराठी शाळा खोल्यांची दुरावस्था होऊन पावसाळ्यात गळती लागत होती. शिवाय या खोल्यांचा विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला होता. याबाबतची माहिती प्रभागाच्या नगरसेविका शांती सावंत आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक सावंत यांनी खोल्यांच्या दुरुस्तीची मागणी केली होती. त्यानुसार दुरुस्ती न करता …
Read More »निपाणीतील धर्मवीर संभाजीराजेंच्या चबुतराच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष
दोन महिन्यापूर्वी पडझड : दुरुस्तीसह पुतळ्यासाठी पाठपुरावा निपाणी (वार्ता) : निपाणी येथील बस स्थानकाजवळील धर्मवीर संभाजी राजे चौक हा शहरातील प्रमुख चौक आहे. या चौकात धर्मवीर संभाजी राजे यांचा पुतळा बसवण्यासाठी स्मारक बांधण्यात आला होता. पण दोन महिन्यापूर्वी त्याला वाहनाची धडक बसल्याने तो कोसळला आहे. पण दोन महिने उलटूनही …
Read More »नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धतीत सामाजिक जबाबदारीचा समावेश असावा
डॉ. बी. एस. नवी; बागेवाडी महाविद्यालयात राष्ट्रीय पातळीवरील परिषद निपाणी (वार्ता) : जागतिक आर्थिक परिस्थिती, स्टार्टअप संस्कृती, संशोधनाची गरज आणि व्यवस्थापन धोरणांचे विश्लेषण महत्त्वाचे आहे. नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धत तंत्रज्ञानापुरते मर्यादित ठेवू नये. त्यामध्ये मूल्य-आधारित व्यवस्थापन, नीतिमत्ता आणि सामाजिक जबाबदारीचा समावेश असावा, असे बेळगाव येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे …
Read More »साखरवाडीमधील नूतन मारुती मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापनेसह धार्मिक सोहळ्यास प्रारंभ
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील जुन्या पी. बी. रोडवरील साखरवाडी समाजाच्या नूतन श्री मारुती मंदिरात मुर्ति प्रतिष्ठापना सोहळ्यास बुधवारी प्रारंभ झाला आहे. येथील पुरातन श्री मारुती मंदिराच्या इमारतीचे संगमरवरी दगडात नुतनीकरण करण्यात आले आहे. नव्या मंदिरात श्री मारुती मुर्तिची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. बुधवारी (ता.२५) सायंकाळी ४ वाजता …
Read More »लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याने भिकाजी कांबळे यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : सुळगाव येथील गायक भिकाजी कांबळे यांनी संविधान प्रास्ताविकेचे अठरा भाषांत गायन केले आहे. त्यांच्या या गायनाची दखल घेऊन लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या उपक्रमाची नोंद झाली आहे. त्यानिमित्त बोरगाव येथील अरिहंत परिवारातर्फे त्यांचा सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बौद्ध उपासक भिकाजी कांबळे यांनी …
Read More »माणकापुर निसर्गराजा ग्रुपतर्फे विविध क्षेत्रातील गुणवंतांना प्रेरणा पुरस्कारचे वितरण
निपाणी (वार्ता) : माणकापूर येथील निसर्गराजा ग्रुपतर्फे शिवजयंती व जागतिक महिला दिनानिमित्त सलग २१ व्या वर्षी प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा मलकारसिध्द मंदिरात पार पडला. अध्यक्षस्थानी सेवा निवृत्त डीवायएसपी नारायण मोठे-देसाई तर प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते एन. डी. चौगुले, मदन पलंगे, संभाजी साबळे, अभिनेत्री गीतांजली डोंबे,पूनम चौगुले, ॲड. बाबासाहेब निकम, …
Read More »फेब्रुवारीतच उन्हाचा तडाखा तीव्र
दुपारीच बाजारपेठा ओस; थंडपेयांना वाढती मागणी निपाणी (वार्ता) : निपाणी शहरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून, रविवारी कमाल तापमानाने ३० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा चटका जाणवू लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या सुमारास रस्त्यांवरील वर्दळ घटल्याचे चित्र दिसून आले. सकाळी काहीसे आल्हाददायक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta