Friday , April 17 2026
Breaking News

साखरवाडीमधील नूतन मारुती मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापनेसह धार्मिक सोहळ्यास प्रारंभ

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील जुन्या पी. बी. रोडवरील साखरवाडी समाजाच्या नूतन श्री मारुती मंदिरात मुर्ति प्रतिष्ठापना सोहळ्यास बुधवारी प्रारंभ झाला आहे.
येथील पुरातन श्री मारुती मंदिराच्या इमारतीचे संगमरवरी दगडात नुतनीकरण करण्यात आले आहे. नव्या मंदिरात श्री मारुती मुर्तिची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. बुधवारी (ता.२५) सायंकाळी ४ वाजता श्रीधर कुलकर्णी, प्रविण कुलकर्णी, महेश यरनाळकर, जगदीश यरनाळकर यांच्या पौरोहित्याखालीमाजी नगराध्यक्ष आणि ट्रस्टी चंद्रकांत जासूद, मनिषा जासूद, प्रथमेश जासूद यांच्या हस्ते होम हवन विधी पार पडला.
यावेळी गणेश पूजन, पुण्यहन वाचन, मातृकापूजन, देवकास्थापना, यज्ञ विधी, मारुतीस अभिषेक, उत्थापन कार्यक्रम झाला. गुरुवारी (ता.२६) सकाळी होम हवन, मुर्ति प्रतिष्ठापना होणार आहे.
यावेळी सुजय पाटील, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, अतुल चावरेकर, विजय -हाटवळ, अरुण आवळेकर, संदीप येरुडकर, गोपाळ नाईक, शिरीष कमते, विकास कदम, अनिल -हाटवळ, सुरेश बोरगांवे, दिपक वळीवडे, विशाल राऊत, विकास गायकवाड, नितीन चावरेकर, संजय सुर्यवंशी, सुरेश बाबर, सागर कुंभार, करण साळुंखे, रोहित पठाडे, रोहित जाधव, श्रावण वाडकर, किशोर जाधव, विकास गायकवाड, ओंकार लोहार, अक्षय खोत यांच्यासह साखरवाडी समाजाचे नागरिक व भाविक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सांगली जवळील मांगले संघ ‘अरिहंत’ चषकाचा मानकरी

Spread the love  कोल्हापूरचा संघ उपविजेता; नारायणवाडी, हिंडलगा विभागून तृतीय क्रमांक निपाणी (वार्ता) : बोरगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *