Monday , September 21 2026
Breaking News

सार्वजनिक वाचनालयातर्फे 27 रोजी चर्चासत्र, पुस्तक प्रदर्शन

Spread the love

 

बेळगाव : सार्वजनिक वाचनालय बेळगाव या संस्थेतर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शुक्रवार दि. 27 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजता भाषेबद्दलच्या चर्चासत्रासह पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने आयोजित उपरोक्त चर्चासत्र व पुस्तक प्रदर्शन गणपत गल्ली, बेळगाव येथील वाचनालयाच्या सभागृहामध्ये होणार आहे.

प्रदर्शनात गोवा बुक फेस्टिवलमध्ये खरेदी केलेल्या 200 हून अधिक पुस्तके मांडली जाणार आहेत. तरी भाषा व मराठी पुस्तक प्रेमींनी या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नेताजी जाधव व कार्यवाह लता पाटील यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *