Sunday , April 13 2025
Breaking News

निपाणी

कोगनोळी बिरदेव यात्रेची पालखी मिरवणुकीने सांगता

  पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रम : विविध शर्यती संपन्न कोगनोळी : बिरोबाच्या नावानं चांगभलं, खारीक, खोबरे, भंडाराच्या उधळणीत कोगनोळी तालुका निपाणी येथील ग्रामदैवत श्री बिरदेव यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पालखी मिरवणुकीने संपन्न झाली. शनिवार तारीख 4 रोजी माजी मंत्री वीरकुमार पाटील व सी. के. पाटील यांचे मानाचे …

Read More »

महाराष्ट्रात ऊस घेऊन जाणारे 2 ट्रॅक्टर दिले पेटवून

  निपाणी : महाराष्ट्रातील हुपरी येथील जवाहर साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरना आग लागल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यातील कारदगा गावात घडली. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील जवाहर साखर कारखान्याकडे उसाची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टरना आग लागल्याची घटना काल रात्री घडली. महाराष्ट्रात माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील …

Read More »

महामार्गासह सेवा रस्ता हरवला झुडपात

  वाहनधारकांसह नागरिकांतून संताप : सरपटणाऱ्या प्राण्यांचा त्रास निपाणी (वार्ता) : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम १५ वर्षांपूर्वी होऊन वाहतूक सुरळीत झाली. त्यानंतर गतवर्षापर्यंत पूंज – लॉईड कंपनीने मार्गाच्या देखभालीसह रस्त्याकडेला झाडे लावणे व सुशोभीकरणाचे काम केले. त्यानंतर या कंपनीच्या देखभालीचीची मुदत संपली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गासह सेवारस्ते झुडपात …

Read More »

निपाणीत उद्या मोफत नेत्र तपासणी शिबिर

  निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील के. एल. ई संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि निपाणी रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमान शुक्रवारी (ता.९) सकाळी १० ते १ वाजेपर्यंत मोफत नेत्र तपासणी, मोफत कॉम्प्युटरद्वारे चष्म्याचे नंबर काढणे व मोफत मोतिबिंदू ऑपरेशन तपासणी शिबिर होणार आहे. अंदोलन नगरमधील डॉ. एम. जे. कशाळीकर रोटरी …

Read More »

म. ए. समितीचे माजी सचिव प्रा. चंद्रहास धुमाळ यांचे निधन

  निपाणी (वार्ता) : येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी सचिव प्रा. चंद्रहास एकनाथ धुमाळ (वय ७४) यांचे बुधवारी (ता.८) निधन झाले. प्रा. धुमाळ यांनी १९६७ पासून महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये बेळगाव जिल्ह्याचे सचिव म्हणून काम पाहिले. गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयात ३२ वर्ष प्राध्यापक म्हणून …

Read More »

निपाणी फुटबॉल स्पर्धेत एसटीएम ग्रुप विजेता

  महादेव गल्ली एसपी ग्रुप उपविजेता : निपाणी फुटबॉल अकॅडमीतर्फे स्पर्धा निपाणी (वार्ता) : येथील समर्थ मंडळ व्यायाम शाळेच्या मैदानावर निपाणी फुटबॉल अकॅडमीतर्फे आयोजित राजमनी ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेत अंतिम सामन्यात महादेव गल्लीमधील एसपी ग्रुप संघाला १:० गोलने पराभव करून साई शंकर नगर मधील दिवंगत विश्वासराव शिंदे तरुण मंडळ एसटीएम ग्रुपने …

Read More »

दिवाळीत गावी जा, पण ‘एक अर्ज पोलीस ठाण्याला’ द्या; पोलिसांचा अभिनव उपक्रम

  सुरक्षिततेसाठी उपाययोजनांच्या सूचना निपाणी (वार्ता) : शहरात गेल्या काही महिन्यापासून चोऱ्या, घरफोड्या व वाहन चोरीमध्ये वाढ झाली आहे. दिवाळीची सुट्टी असल्याने लक्ष्मीपूजनानंतर बहुतांश नागरिक चार-आठ दिवसांसाठी आपापल्या गावी किंवा सहलीनिमित्त परगावी जातात. त्यामुळे गावी जाणाऱ्यांनी घरातील मौल्यवान वस्तूंच्या अथवा वाहनांच्या सुरक्षिततेची उपाययोजनांच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. यंदा शहर पोलिसांनी …

Read More »

निपाणीचे पहिले आयपीएस अधिकारी संजय माने यांचे निधन

  निपाणी (वार्ता) : प्रगतीनगर येथील रहिवासी पहिले निवृत्त आयपीएस अधिकारी संजय वसंतराव माने (वय ६१) यांचे सोमवारी (ता.६) रात्री हृदयविकाराने निधन झाले. सध्या ते इंदौर (मध्यप्रदेश) येथे वास्तव्यास होते. विशेष म्हणजे त्यांना दोन वेळा राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले होते. बुधवारी (ता.८) सकाळी त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणल्यानंतर बसवानगर …

Read More »

द्वेषपूर्ण वक्तव्य प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज

  अटक करण्याची मागणी निपाणी (वार्ता) : सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरिया, कोरोना, एड्स, कुष्ठरोग रोगांशी करून तो नष्ट करण्याची भाषा करणारे तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, तमिळनाडूचे द्रमुकचे खासदार ए. राजा, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, तसेच फेसबूकवरून उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्याचे समर्थन करणारे पत्रकार निखिल …

Read More »

‘मी हिंदू धर्मरक्षक’ अभियानात तरुणांने सहभागी व्हावे

  बंडा साळुंखे ; पडलीहाळमध्ये अभियान प्रारंभ निपाणी (वार्ता) : निपाणी परिसरात श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे प्राणलिंग स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मी हिंदू धर्मरक्षक’ हे अभियान सुरू केले आहे. या अभियानाची आवश्यकता कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यालाही आहे. त्यामध्ये परिसरातील हिंदू तरुण-तरुणीने तन-मन-धनाच्या माध्यमातून सहभागी व्हावे, असे आवाहन कोल्हापूर येथील हिंदू नेते बंडा …

Read More »