कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर टोलनाक्याजवळील मत्तिवडे फाट्यावर मोटरसायकल अपघातात एक जण ठार तर एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना सोमवार तारीख 13 रोजी सकाळी नऊ वाजता घडली. प्रताप बाळू पाटील (वय 27) राहणार पेंढाखळे तालुका शाहूवाडी असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव असून प्रसाद नाईकवाडे हा युवक …
Read More »पांगीरे (ए) येथील तंबाखूला अक्षय तृतीये दिवशी १७१ रुपये प्रतिकिलो दर
निपाणी (वार्ता) : वाढत्या महागाईमुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्या तुलनेत हमीभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या तंबाखूला अत्यल्प दर मिळत आहे. याशिवाय तंबाखूला बिनभरोशाचा दर मिळतो आहे. परिणामी तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन जयसिंगपूर येथील तंबाखू व्यापारी सुभाषचंद्र नथामल रुणवाल यांचे बिचायतीदार शांतीलाल …
Read More »बोरगावच्या शर्यतीत इचलकरंजीची बैलगाडी प्रथम
कोडी सिद्धेश्वर यात्रेनिमित्त आयोजन; विविध धार्मिक कार्यक्रमाची सांगता निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील कोडीसिद्धेश्वर यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडी शर्यतीत इचलकरंजीच्या प्रवीण डांगरे यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावून २१ हजार रुपयांचे बक्षीस मिळविले. या शर्यतीत दानोळीच्या बंडा शिंदे यांच्या बैलगाडीने द्वितीय क्रमांकाचे ११ हजार रूपये तर इचलकरंजीच्या रवी आरसगोंडा यांच्या बैलगाडीने …
Read More »बेळगाव लोकसभा मतदारसंघात 71.38 टक्के तर चिक्कोडीत 78.51 टक्के मतदान
बेळगाव : लोकशाहीचा सण असलेली निवडणूक शांततेत पार पडली असून चिक्कोडी लोकसभा मतदारसंघ 78.51 टक्के तर बेळगाव लोकसभा मतदारसंघ 71.38 टक्के तसेच बेळगाव जिल्ह्यातील खानापूर विधानसभा मतदारसंघात 73.87 टक्के आणि कॅनरा लोकसभा मतदारसंघातील कित्तूर विधानसभा मतदारसंघात 73.87 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. एकूण गतवेळच्या तुलनेत …
Read More »बेळगावात २४.०२ तर चिक्कोडीत २७.२३ टक्के मतदान
बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत २४.०२ टक्के तर चिक्कोडीत २७.२३ टक्के मतदान झाले आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील बेळगाव शहर परिसरात विविध ठिकाणी मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी मतदानाला सुरुवात केली आहे. मतदारांनी मतदानासाठी सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला आहे. वाढत्या उन्हामुळे वयोवृद्ध तसेच महिलांना मतदान केंद्राकडे जाण्यास त्रास …
Read More »प्रियांका जारकीहोळी यांना मताधिक्य मिळेल
जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांचा विश्वास निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली आहे.चिकोडी लोकसभा मतदारसंघात ५ लाख ६८ हजार महिलांना ९ महिन्यांपासून दर महिन्याला २००० रुपये दिले जात आहेत. १ लाख ५० हजार कुटुंबांचे वीज बिल माफ झाले आहे. ७ लाखांवर कुटुंबांना मोफत …
Read More »शिवसेनेचा काँग्रेसला पाठिंबा : बाबासाहेब खांबे यांची माहिती
निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी प्रमाणेच सीमा भागामध्ये निपाणी शिवसेना सीमाप्रश्नाची बांधीलकी जपत काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका सतीश जारकीहोळी यांना बिनशर्त पाठींबा देत असल्याची माहिती बेळगाव जिल्हा शिवसेनाप्रमुख बाबासाहेब खांबे यांनी दिली. खांबे म्हणाले, शिवसेना वरिष्ठांच्या आदेशानुसार निपाणी शिवसेना काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना पाठिंबा देत आहे. निपाणी सीमाभागामध्ये …
Read More »आश्रय नगर, शिवाजीनगरात काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा
निपाणी (वार्ता) : येथील आश्रय नगर, शिवाजीनगरात चिकोडी लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकिहोळी यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा पार पडल्या. यावेळी म्हैसूरचे आमदार रविशंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शीख समुदायतील ६० हुन अधिक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी मंत्री विरकुमार पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे …
Read More »लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी भाजपाला रोखा
ॲड. अविनाश कट्टी; ऑल इंडिया रिपब्लिकन पक्षाची बैठक निपाणी (वार्ता) : देशात भाजपा सत्तेवर आल्यास भारतीय घटना बदलण्याची शक्यता आहे. असे झाल्यास मागासवर्गीय, अल्पसंख्यांक आणि ओबीसीवर अन्याय होणार आहे. शिवाय भारतीय लोकशाही आणि घटना धोक्यात येणार आहे. त्यासाठी मतदारांनी जागरूकपणे मतदान करून भाजपला रोखले पाहिजे, असे आवाहन ऑल इंडिया …
Read More »कोगनोळीजवळ अपघातात एक ठार, एक जखमी
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर मोटरसायकल व बस अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार तारीख 3 रोजी सायंकाळी नऊच्या सुमारास घडली. संजय शंकर पाटील (वय 43) रा. आत्ताळ ता. गडहिंग्लज असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बाळासाहेब केशव पाटील (वय 66) …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta