Monday , December 8 2025
Breaking News

संकेश्वर

संकेश्वरमधील उपाध्ये चाळीत दिवसभर पेटते पथदिवे….

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरमधील उपाध्ये चाळीतील नागरिकांना आज दिवसाढवळ्या पेटते पथदिवे पहावयास मिळाले. उपाध्ये चाळीत दिवसभर, त्यातच भर उन्हात देखील पथदिव्यांचा प्रकाश पडलेला दिसला. सुर्याच्या प्रखर प्रकाशात पथदिव्यांचा मिनमिनता प्रकाश झाकोळलेला दिसला. हुक्केरी विद्युत संघाच्या लापरवाहीमुळे की पालिकेच्या दुर्लक्षामुळे कोण जाणे पथदिवे मात्र दिवसभर पेटतेच दिसले. विजेची पाण्याची बचत करण्याची …

Read More »

गडहिंग्लज खुल्या रोलर स्केटिंग स्पर्धेत संकेश्वरचा प्रितम निलाज प्रथम

संकेश्वर (प्रतिनिधी) : गडहिंग्लज येथे नुकत्याच पार पडलेल्या खुल्या रोलर स्केटिंग स्पर्धेत संकेश्वर रोलर स्केटिंग अकॅडमीचा स्केटिंगपटू प्रितम कल्याणकुमार निलाज यांनी इनलाईन ५०० मी. स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षिस पटकावले. दुसऱ्या क्रमांकाची मानकरी अन्वी गुरव तर तिसरा क्रमांक आरोही शिलेदार, राही निलाज हिने पटकाविला. क्वाड स्केटिंग ५०० मी. स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे …

Read More »

ईटींकडून नगरसेवकांची दिशाभूल : डाॅ. जयप्रकाश करजगी

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेचे मुख्याधिकारी जगदीश ईटी हे २४×७ पाणीपुरवठा योजनेची चुकीची माहिती देऊन नगरसेवकांची दिशाभूल करीत असल्याचे नगरसेवक डॉ. जयप्रकाश करजगी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, मुख्याधिकारी जगदीश ईटी यांनी सर्व २८ सदस्यांनी वर्षाकाठी दोन हजार रुपये पाणीपट्टीचा ठराव मांडला होता.त्या ठरावाला ईटी यांनी केराची टोपली …

Read More »

चुका सुधारण्यासाठी देवालय : श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी

संकेश्वर (प्रतिनिधी) : मनुष्याला आपल्या चुका सुधारून नव्याने जगण्याची उम्मीद देवालयातून मिळते. त्यामुळे माणसाच्या चुकांच्या माफीसाठी देवालय निर्माणचे कार्य केले जात असल्याचे निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी सांगितले. स्वामीजी संकेश्वर संगोळ्ळी रायण्णा नगर येथील श्री गुप्तादेवी नूतन मंदिर उदघाटन, वास्तूशांती आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमात बोलत होते. श्रींच्या हस्ते गुप्पतादेवी, …

Read More »

संकेश्वरातील बुलंद आवाजाला स्मशान शांत‌‌ता; धडाडीचे नगरसेवक संजय नष्टी यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेचे धडाडीचे नगरसेवक, संकेश्वर घटक काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष, संकेश्वर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय दुंडपण्णा नष्टी (वय ५४) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. संजय नष्टी हे लोकांच्या हाकेला धावून जाणारे नेते होते. पालिकेचा बुलंद आवाज म्हणून संजय नष्टी यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने संकेश्वरचा बुलंद …

Read More »

लोकांना कायद्याची माहिती असायला हवी : न्यायाधीश बी. एस. पोळ

              संकेश्वर (प्रतिनिधी) : लोकांना कायद्याची माहिती असायला हवी असल्याचे संकेश्वर सिव्हिल न्यायालयाचे न्यायाधीश बी.एस. पोळ यांनी सांगितले. ते संकेश्वर श्री साईभवन येथे आयोजित कायदा माहिती आणि मदत कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. न्यायाधीशांच्या हस्ते वृक्षरोपाला जलार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तालुका …

Read More »

संकेश्वरचे धडाडीचे नगरसेवक संजय नष्टी यांचे निधन

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेचे धडाडीचे नगरसेवक, संकेश्वर घटक काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष, संकेश्वर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय दुंडपण्णा नष्टी (वय ५४) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. संजय नष्टी हे लोकांच्या हाकेला धावून जाणारे नेते होते. पालिकेचा बुलंद आवाज म्हणून संजय नष्टी यांची ओळख होती. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून ते …

Read More »

संकेश्वरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ज्वालेला भक्तीपूर्वक अभिवादन

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धारकऱ्यांनी सांगली येथून आणलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ज्वालेचे संकेश्वरात भक्तीपूर्वक अभिवादन करण्यात आले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदू धर्मासाठी केलेले बलिदान तरुणांना समजावे, या हेतूने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने बलिदान मास आचरणात आणण्यात आला. बलिदान मासची सांगता फाल्गुन अमावस्येला (मृत्युंजय …

Read More »

देवीच्या जयजयकारात श्री गुप्तादेवी मूर्ती मिरवणूक

संकेश्वर (प्रतिनिधी) : संगोळी रायण्णा नगर येथील श्री गुप्तादेवी नूतन मंदिर वास्तू शांती आणि मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम उद्या मंगळवार दि. २९ रोजी सकाळी ९ वाजता निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात होत आहे. आज मार्केट यार्ड श्री गजानन मंदिर ते श्री गुप्तादेवी मंदिर पर्यंत श्री गुप्तादेवी मूर्तीची सवाद्य …

Read More »

शेतीवाडीच्या रस्त्याने शेतकरी सुखावला : निखिल कत्ती

संकेश्वर (प्रतिनिधी) : राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांनी हुक्केरी मतक्षेत्रातील सर्वाधिक शेतवाडी रस्ता निर्माणचे काम केल्यामुळे शेतकरी सुखावल्याचे हिरण्यकेशी साखर कारखाना अध्यक्ष निखिल कत्ती यांनी सांगितले. ते गवनाळ-कमतनूर शेतवाडीच्या रस्ता कामांचा शुभारंभ करुन बोलत होते. ते पुढे म्हणाले, गवनाळ-कमतनूर शेतवाडीच्या रस्ता निर्माण कामामुळे येथील शेतकऱ्यांची …

Read More »