Sunday , July 26 2026
Breaking News

संकेश्वरात मुलांचा गुढी पाडवा उत्साहात….

Spread the love


संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरात सकाळी मराठी घरांमध्ये घराच्या गच्चीवर, घराबाहेर उंचच-उंच गुढी उभारून गुढी पाडवा सण उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यामध्ये संकेश्वरातील छोटे मुले-मुली देखील कांही मागे पडली नाहीत. त्यांनी देखील आपल्या परीने गुढी उभारून गुढी पाडव्याचा आनंद द्विगुणित केला. येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर जवळ किरण खटावकर यांच्या निवासस्थानी छोट्या मुलांची गुढी उभारण्यासाठी लगबग चाललेली दिसली. कु.श्रीहरी, के. खटावकर यांनी छोटे बांबू आणून त्याच्या टोकाला तांब्याचा कलश ठेऊन त्यावर कडुलिंबाची पाने फुलांच्या तोरण बांधून गुढी उभारून पूजा केली. श्रीहरी यांनी गुढी पाडवा कशासाठी साजरा केला जातो यांची माहिती दिली. छोट्यांच्या गुढीपाडवा उत्सवात केशवराज, कार्तिक, तन्वी, कृपा, श्रीजा सहभागी झाले होते.
संकेश्वरात कोरोना महामारीच्या दोन वर्षानंतर लोकांत यंदा गुढी पाडव्याचा मोठा उत्साह दिसून आला. मराठी माणसांच्या घरांवर गुढी उभारणेचा कार्यक्रम परंपरागत पद्धतीने भक्तीमय आणि उत्साही वातावरणात पार पाडण्यात आला. सकाळपासूनच संकेश्वरकरांनी साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्तावर नवीन वस्तू खरेदीसाठी बाजारात गर्दी केलेली पहावयास मिळाली. आज फुलांना बाजारात मोठी मागणी दिसली. जादातर लोकांचा कल सोने-चांदीच्या अलंकार ऐवजी आपल्या खिशाला परवडेल अशाच वस्तू खरेदी करण्याकडे दिसला.लोकांची पहिली पसंत नवीन भांडी, नवीन कपडे, नवीन मिक्सर इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याची दिसली. त्यामुळे सदर दुकानांवर लोकांची मोठी गर्दी दिसून आली. शासकीय कर्मचारी लोकांच्या कुटुंबातील सदस्याचा कल एलसीडी टीव्ही, फ्रीज सोन्या चांदीचे अलंकार खरेदी करण्याकडे दिसला. सोने-चांदीचा भाव वाढल्याने सराफी दुकानांची उलाढाल जेमतेम दिसली.

शुभेच्छांचा वर्षाव

आज दिवसभर मोबाईलवर शुभेच्छांचा वर्षाव होतांना दिसला. मराठी, कन्नड हिंदी आणि इंग्रजी भाषेतून शुभेच्छा आदानप्रदान केल्या जात होत्या. मोबाईलवरील स्टेटस गुढी पाडव्याची गोडी वाढविणारे दिसले. हिंदु पंचांगानुसार आज वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे नवीन वर्षाच्या शुभेच्छाही सर्वांनी एकमेकांना प्रदान केल्या.

About Belgaum Varta

Check Also

सलामवाडीतून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे भक्तिभावाने प्रस्थान

Spread the love  दड्डी : हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी येथून श्री भावेश्वरी दिंडीचे पंढरपूरकडे आषाढी वारीनिमित्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *