संकेश्वर (प्रतिनिधी) : योग-प्राणायम करा, निरोगी राहा, असे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अमर नलवडे यांनी सांगितले. ते संकेश्वर साई भवन येथे ओम श्री शंकराचार्य योग प्रशिक्षण केंद्रातर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांचे उदघाटन करुन बोलत होते. सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ओम श्री शंकराचार्य योग प्रशिक्षण केंद्राचे योगशिक्षक बसवराज नागराळे यांनी भूषविले होते. …
Read More »संकेश्वरची अन्यायकारक पाणीपट्टी बंद करा : मुस्तफा मकानदार
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेला लोकांची चिंता आहे की नाही. गेल्या दोन वर्षांपासून संकेश्वरातील लोक कोरोना महामारीने कंगल झाले आहेत. बऱ्याच युवकांना नोकरी गमवावी लागली आहे. व्यापार-व्यवसाय घाट्यात चालवला आहे. त्यामुळे गोरगरिब, कष्टकरी सर्वसामान्य लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. अशा स्थित पालिकेची आव्वाची-सव्वा पाणीपट्टी लोक भरणार कोठून हा प्रश्न निर्माण …
Read More »संकेश्वरात रंगोत्सव रविवारी
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरात धुलीवंदन- रंगपंचमी एकाच दिवशी येत्या रविवार दि. २० मार्च २०२२ रोजी साजरी करण्याचा निर्णय आज पोलीस ठाण्यावर झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. सभेत माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी म्हणाले, धुलीवंदन असो रंगपंचमी ज्या-त्या दिवशी साजरे केल्यास सणांचे महत्व टिकून राहणार आहे. अधे-मधे सण समारंभ साजरी करण्याची …
Read More »ममदापूरमध्ये रंगला माऊली आश्वाचा रिंगण सोहळा!
मान्यवरांची उपस्थिती : आठवडाभराच्या विविध धार्मिक कार्यक्रमांची सांगता निपाणी : टाळ-मृदंगांचा गजर, विठू माऊलीचा जयघोष आणि निपाणी परिसरातील वारकऱ्यांच्या उपस्थितीत ममदापूर (के. एल.) येथे मंगळवारी (ता.१५) माऊली अश्वाचा रिंगण सोहळा पार पडला. त्यानंतर महाप्रसादाचा वाटप आणि आठवडाभर सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. प्रारंभी युवानेते उत्तम पाटील आणि ममदापूर …
Read More »तुम्हा सर्वांचं प्रेम-आशीर्वाद माझ्यावर सदाकाल राहुदे : मंत्री उमेश कत्ती
संकेश्वर (महंमद मोमीन) : तुम्हा सर्वांचं प्रेम-आशीर्वाद माझ्यावर सदाकाल राहुदे, हीच माझी शक्ती असल्याचे राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी सांगितले. आज हुक्केरी विश्वनाथ सभाभवन येथे आयोजित आपल्या वाढदिवस कार्यक्रमात ते बोलत होते. हुक्केरी हिरेमठचे परमपूज्य श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, श्री मल्लिकार्जुन स्वामीजी, तालुक्यातील अकरा श्रींच्या …
Read More »इनोव्हा अपघातातील डॉ. मुरगुडे पती-पत्नी कन्येवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार
संकेश्वर (प्रतिनिधी) : नरसिंगपूरजवळ रविवारी झालेल्या इनोव्हा-कंटेनर अपघातातील गंभीर जखमी संकेश्वरचे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सचिन मुरगुडे यांचे उपचारादरम्यान रात्री १०.४५ वाजता निधन झाले. अपघातात डॉ. सचिन मुरगुडे यांच्या पत्नी डॉ. श्वेता सचिन मुरगुडे जागीच ठार झाल्या तर कन्या शिया सचिन मुरगुडे उपचारादरम्यान मरण पावल्या. अपघातात एकाच कुटुंबातील तिघेजण मरण पावल्याने …
Read More »नरसिंगपूरनजिक इनोव्हाची पाठीमागून कंटेनरला धडक; आई-मुलगी जागीच ठार
डाॅ. सचिन मुरगुडेंची स्थिती चिंताजनक संकेश्वर (महमद मोमीन) : यमकनमर्डी पोलिस ठाणा हद्दीतील नरसिंगपूर बेनकनहोळी राष्ट्रीय महामार्गावर सायंकाळी ४.३० वाजता रस्त्या शेजारी थांबलेल्या कंटेनर ट्रकला पाठीमागून इनोव्हा कारने जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात संकेश्वर डॉ. मुरगुडे कुटुंबातील माय-लेक जागीच ठार झाल्या आहेत. अपघातात संकेश्वरचे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सचिन मुरगुडे गंभीररित्या …
Read More »मंत्री उमेश कत्ती यांना दिर्घायुष्य लाभो : श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी
संकेश्वर (प्रतिनिधी) : हुक्केरी मतक्षेत्राचे आमदार, राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांना दिर्घायुष्य लाभो, त्यांच्या हातून हुक्केरी मतक्षेत्राचा सर्वांगिण विकास होवो असे निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी सांगितले. मंत्री उमेश कत्ती यांचा वाढदिवस सोहळ्यानिमित्त आज मंत्रीमहोदयांच्या बेल्लद बागेवाडी येथील निवासस्थानी निडसोसी मठाचे परमपूज्य. पंचम श्री …
Read More »कर्नाटक सीमेवरील चेकपोस्ट हटवा..
संकेश्वर (प्रतिनिधी) : कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील हिटणी येथील पोलिस चेकपोस्ट हटविण्याचे मागणी आज कोल्हापूर जिल्हा भाजपा युवा मोर्चा, संकेश्वर श्रीरामसेना हिन्दुस्तान यांच्यावतीने उपतहसीलदार आर. एस. बडचेकर यांना निवेदन सादर करुन करण्यात आली आहे. कर्नाटकातील संकेश्वर येथून अवघ्या दोन कि.मी. अंतरावर महाराष्ट्राची हद्द सुरू होते. संकेश्वर-गडहिंग्लजला लोकांचे रोजचे येणे-जाणे सुरु असते. हिटणी …
Read More »अखंड भारत भाजपमय होईल : शिवाजी पाटील
संकेश्वर (प्रतिनिधी) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे लक्ष अखंड भारतात भाजपाची सत्ता स्थापन करुन देशाचा सर्वांगीण विकास साधणे आहे. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत चार राज्यांत भाजपाने मोठे यश संपादन केले आहे. येत्या कांही वर्षांत अखंड भारतात भाजपाची सत्ता स्थापन करण्याचे काम मोदीजी निश्चितपणे करतील असे भाजपाचे पश्चिम …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta