खानापूर : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत आज शनिवार दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी खानापूर तालुक्यातील जांबोटी सीआरसी, बैलूर सीआरसी व कणकुंबी सीआरसीच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण वडगाव (जांबोटी) प्राथमिक शाळेमध्ये करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर म. ए. समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी हे …
Read More »तळेवाडी ग्रामस्थांचे होणार स्थलांतर : जिल्हाधिकाऱ्यांची बैठक
बेळगाव : खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्य कार्यक्षेत्रात राहणाऱ्या तळेवाडी ग्रामस्थांच्या स्थलांतराबाबत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी ग्रामस्थांची बैठक घेतली. भीमगड परिसरात अधिकारी व ग्रामस्थांची बैठक झाली. याप्रसंगी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी अभयारण्य सोडू इच्छिणाऱ्या कुटुंबांचे शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार पुनर्वसन केले जाईल, असे आश्वासन दिले. अभयारण्यात राहणाऱ्या लोकांना रस्ता, पाणी, वीज …
Read More »नागरमुन्नोळीजवळ कार आणि मालवाहू यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू
नागरमुन्नोळी : बेळगाव जिल्ह्यातील नागरमुन्नोळीजवळील बेळकोढ गेटजवळ कार आणि मालवाहू यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. निपाणी-मुधोळ राज्य महामार्गावर हा अपघात झाला असून राकेश वाटकर (23) आणि सौरभ कुलकर्णी (22, रा. बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेत चार जण जखमी झाले असून जखमींना …
Read More »हिरण्यकेशी कारखान्याच्या वतीने गंगापूजन
संकेश्वर : येथील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखाना वतीने हिरण्यकेशी नदीचे गंगापूजन गोटूर बंधाऱ्यावर करण्यात आले. यावेळी सुरेश बेल्लद दांपत्य यांच्या हस्ते गंगापूजन करण्यात आले. कार्यक्रमास संचालक आप्पासाहेब शिरकोळी, बाबासाहेब आरभोळे, प्रभुदेव पाटील, सत्यप्पा ककीनाईक, अजित चाटे, संतोष नागण्णावर, कल्लापा बेटगिरी, विरेंद्र कत्ती, सुभाष नाशिपुढी, जगदीश येणगीमठ, विश्वनाथ बेल्लद, महातेश …
Read More »कुप्पटगिरी- खानापूर रस्त्यावरील पूलाची श्रमदानातून डागडुजी
खानापूर : कुप्पटगिरी- खानापूर रस्त्यावरील नाल्यावर असलेल्या दगडी पूलाची ग्रामस्थांनी श्रमदानातून आज डागडूजी केली. सदर पूलाला भगदाड पडले होते व वाहतुक करणे धोक्याचे ठरत होते. कुप्पटगिरी रस्त्यावरील हा पूल उंचीला कमी असल्याने दर वर्षी पावसाळ्यात नाल्याचे पाणी पुलावरून वाहत जाते व त्याकाळात पूलावरून रहदारी बंद होते. तशात हा पूल …
Read More »भारतीय नागरिकांनी दक्ष राहावे : प्रा. डॉ. अच्युत माने
दिग्विजय युथ क्लबतर्फे क्रांती दिन निपाणी (वार्ता) : शेजारील देशांमध्ये अराजकता निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत स्वातंत्र्याचे मोल करणे आवश्यक आहे. जात,पात पंत, भाषा, धर्मभेदाला बाजूला ठेवून प्रत्येक भारतीय नागरिकांनी कर्तव्यदक्ष राहिले पाहिजे. क्रांतिकारकांनी आपल्या लढ्याद्वारे देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. ती टिकवून ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असे मत …
Read More »आधुनिक भारतासाठी तरुण सशक्त आवश्यक
पोलीस उपनिरीक्षिका उमादेवी; प्रहार क्लबतर्फे व्याख्यान निपाणी (वार्ता) : तरुण वर्गामध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक तरुण व्याधीग्रस्त बनत आहे. त्यामुळे आधुनिक भारत निर्माण करायचा असेल तर तरुण वर्ग सशक्त व बलवान असणे आवश्यक आहे. त्याशिवाय भारत महासत्ता बनू शकत नाही, असे मत शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षिका …
Read More »हुतात्मा स्मारक सुशोभीकरणाच्या प्रतीक्षेतच
खुल्या भवनाची मागणी; उद्यान, सभागृहाचे स्वप्न अधुरे निपाणी (वार्ता) : इंग्रजांना भारतातून हुसकावून लावण्यासाठी १९४२ साली क्रांती लढा झाला. त्यामध्ये निपाणी आणि परिसरातील क्रांतिकारकही सहभागी झाले होते. या लढ्यावेळी झालेल्या गोळीबारात अनेक जण जखमी झाले तर शंकर पांगीरे हे तरुणपणी हुतात्मा झाले. त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळण्यासाठी येथील जळगाव नाक्यावरील …
Read More »संकेश्वर नगरपालिका अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी!
संकेश्वर : संकेश्वर नगरपालिकेसाठी नुकताच अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी सरकारने आरक्षण जाहीर केले असून नगराध्यक्षपद हे जनरल महिला तर उपनगराध्यक्ष मागासवर्गीय अ गटासाठी आरक्षण जाहीर झाले आहे यामुळे इच्छुकांचे लक्ष अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणूक तारखेकडे लागले असून तद्नंतर कोण बनेगा नगराध्यक्ष याची खमंग चर्चा नागरिकात रंगली आहे. नगरपालिकेत भाजपची सत्ता असून …
Read More »डीएमएस पदवीपूर्व महाविद्यालय नंदगड येथे पीयुसी प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव संचलित डीएमएस पदवीपूर्व कॉलेज नंदगडमध्ये पीयुसी प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात बारावी विद्यार्थिनींच्या ईशस्तवन आणि स्वागत गीताने झाली. यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन आणि महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले फोटो पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta