Friday , December 19 2025
Breaking News

कर्नाटक

राष्ट्रीय महामार्गावरील बीडी कारखान्यामध्ये सव्वा लाखाची चोरी

  निपाणी (वार्ता) : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या निपाणीजवळील प्रसिद्ध ३ छाप बिडी कारखान्याचे कार्यालय फोडून चोरट्यांनी १ लाख २५ हजाराची रोकड, डीव्हीआर सेट मोबाईल असा मुद्देमाल लंपास केला. निपाणी शहराच्या लगत असलेल्या महामार्गाच्या पूर्वेला ३० छाप बिडी कारखाना व कार्यालय आहे. गुरुवारी (ता.३०) दिवसभर सायंकाळी सहा वाजता कार्यालय …

Read More »

खानापूर समितीकडून जांबोटी येथे महामेळाव्याची जनजागृती!

  खानापूर : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने व्हॅक्सिन डेपो बेळगांव येथे सोमवार दिनांक ४ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ठीक ११ वाजता भव्य सीमा महामेळाव्याचे आयोजन केले आहे. सन २००६ पासून आजपर्यंत कर्नाटक शासनाने हिवाळी अधिवेशन बेळगांवमध्ये भरवून मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. या अधिवेशनाला विरोध म्हणून मराठी माणसाचा …

Read More »

मालमत्तेचा तपशील सादर न केलेल्या आमदारांची यादी जाहीर

  ७२ आमदारांचा समावेश; लोकायुक्तांचा इशारा बंगळूर : लोकायुक्तांकडे मालमत्तेचा तपशील सादर करण्याची अंतिम मुदत उलटून गेली असली तरी, काही मंत्र्यांसह एकूण ७२ आमदारांनी आतापर्यंत त्यांच्या मालमत्तेचा तपशील सादर केलेला नाही. लोकायुक्त कार्यालयाने मालमत्ता तपशील सादर न केलेल्या आमदारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत सरकारचे काही मंत्री असून, ५१ …

Read More »

तीन वर्षात २५० हून अधिक बालकांची विक्री

  तपासात माहिती समोर; सीसीबी पोलिसांकडून कसून चौकशी बंगळूर : बालक विक्री नेटवर्कच्या अटक केलेल्या आरोपींनी आतापर्यंत २५० हून अधिक मुलांची विक्री केल्याची धक्कादायक बाब सीसीबी पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. बालक विक्री नेटवर्कच्या आरोपींनी कर्नाटकात ५० ते ६० मुलांची विक्री केली, तर उर्वरित मुले तामिळनाडूला विकण्यात आली. चाचणीत त्यांनी …

Read More »

मैत्रिने तयार झालेले निर्भेळ-निर्भीड व विश्वासाचे नाते हेच मानवी जीवनाचे खरे औषध

  गुंजी : विद्यार्थ्याकडून मिळालेले प्रेम आणि त्यांनी केलेला आदर सत्कार हा आयुष्यातील एक अविस्मरणीय आणि अनमोल असा ठेवा आहे. आपले विद्यार्थी जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालेले पाहताना अभिमानाने उर भरून येतो‌‌. विद्यार्थ्यांना पालकांबरोबर शिक्षकांच्याही शुभेच्छा नेहमीच पाठीशी असतात, हे लक्षात ठेवून सत्याच्या मार्गावरून ध्येयाचा वेध घेत पुढे जावे‌. सत्कार्याने …

Read More »

निपाणीसह परिसरात कनकदास जयंती साजरी

  निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात गुरुवारी (ता.३०) जयंती उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी येथील नगरपालिका, तहसीलदार कार्यालय आणि निपाणी आगारात कनकदास जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम झाले. येथील आगारात आगार प्रमुख संगाप्पा यांच्या प्रमुख उपस्थिती कनकदास यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. एस. यु. चौडकी यांनी कनकदास यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. …

Read More »

अनोळखी व्यक्तींची माहिती द्या

  उपनिरीक्षक डी. बी. कोतवाल; निपाणी बस स्थानकात खाद्यपदार्थ विक्रेत्यामध्ये जनजागृती निपाणी (वार्ता) : गेल्या काही दिवसापासून बस स्थानक आवारात चोरट्यांचा धुमाकुळ सुरू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. महाराष्ट्र राज्यातून निपाणी आगारात चोरट्यांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे अनोळखी आणि संशयित रित्या बस स्थानक परिसरात फिरणाऱ्या नागरिकाबाबत …

Read More »

चल यार, धक्का दे!

  निपाणी आगारातील परिस्थिती; अनेक बसना स्टार्टरचा अभाव निपाणी (वार्ता) : हुबळी विभागामध्ये आगाराच्या उत्पन्नाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर असलेल्या निपाणी येथील आगारातील अनेक बसना स्टार्टर्स नसल्याने धक्का मारून सुरू करावा लागत आहेत. त्यामुळे बस चालक, वाहक आणि प्रवाशातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे भंगार अवस्थेतील बस बंद करण्याची मागणी …

Read More »

डी. के. शिवकुमारना तात्पुरता दिलासा

  सीबीआय तपासाला आव्हान देणारी याचिका मागे घेण्याची परवानगी बंगळूर : उच्च न्यायालयाने उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना त्यांच्यावरील बेकायदेशीर मालमत्ता प्रकरणाच्या सीबीआय तपासाला आव्हान देणारी याचिका मागे घेण्याची परवानगी दिली आहे. कारण राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत सीबीआय चौकशीस दिलेली परवानगी मागे घेतली होती. न्यायालयाच्या या आदेशामुळे शिवकुमार यांना कायदेशीर …

Read More »

केंद्राच्या आधी कर्नाटकाने सुरू केले स्टार्टअप धोरण

  मुख्यमंत्री सिध्दरामय्यांचा दावा; “बंगळूर टेक समिट”चे उद्घाटन बंगळूर : केंद्र सरकारच्या आधी २०१५ मध्ये काँग्रेस सरकारने कर्नाटकमध्ये स्टार्टअप धोरण सुरू केले होते, असा दावा मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी आज येथे केला. कर्नाटक सरकारने स्टार्टअप धोरण सुरु करून एक दूरदर्शी पाऊल उचलले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज शहरातील …

Read More »