निपाणी : येथे महाराष्ट्र शासनातर्फे सीमाभागातील बेरोजगार तरूणांसाठी शिवजयंतीचे औचित्य साधून रोजगार महामेळाव्याचे आयोजन करण्यात यावे अशी विनंती करणारे पत्र माजी खासदार संजय मंडलिक यांनी नुकतेच उद्योगमंत्री उदय सामंत यांना पाठवले आहे. याबाबत महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी यांचे शिष्टमंडळ अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंडलिक यांना मुरगुड येथे …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा युवा आघाडी मेळाव्याला जाहीर पाठिंबा
खानापूर : युवा दिनी आयोजित युवा मेळाव्याला खानापूर तालुका म. ए. समितीने महात्मा फुले रोडवरील मराठा सांस्कृतिक भवन, बेळगांव येथे आयोजित युवा आघाडी मेळाव्याला जाहीर पाठिंबा दर्शविला असून तालुक्यातील सर्व युवावर्गाने आणि मराठी भाषिकांनी सदर मेळाव्याला वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव …
Read More »संभाजीनगर शाळेतील चित्रकला स्पर्धेत ३७८ विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
निपाणी (वार्ता) : येथील संभाजीरातील मराठी मुलांच्या शाळेत सावित्री फुले जयंतीनिमित्त वीरभद्र ऑरगॅनिक अँड सॅंडलवुड अग्रिकल्चर सोसायटी यांच्यातर्फे विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सी. एम. सुगते होते. प्रारंभी एचडीएमसी उपाध्यक्षा वंदना वंजारे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन तर ए. एस. तावदारे, के.डी. खाडे, प्रवीण कोळी, महेश पाटील …
Read More »अंमलझरी येथील आरोग्य शिबिरात ९७ रुग्णांची मोफत तपासणी
निपाणी (वार्ता) : येथील मास्क ग्रुप संचलित डॉ. सौ. वैशाली व डॉ. विलास पारेख महावीर आरोग्य सेवा संघाचा सेवार्थ दवाखाना आणि प्रेमा शंकर जडी यांचे स्मरणार्थ विश्वस्थ श बसवराज जडी यांच्या नेतृत्त्वाखाली अंमलझरी येथे ‘डॉ. आपल्या दारी’ या संकल्पनेनुसार फिरता दवाखाना मोफत रुग्णसेवा शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये …
Read More »खानापूर-लोंढा महामार्गावर अपघात : एक ठार, एक गंभीर जखमी
बेळगाव : खानापूर-लोंढा महामार्गावर जोमतळे गावानजीक, दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी वेगाने रस्त्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली. त्यामुळे दुचाकी चालक युवक ठार झाला असून दुचाकीच्या पाठीमागे बसलेला युवक गंभीर जखमी झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नंदीहळ्ळी येथील एका मिलिटरी ट्रेनिंग अकॅडमीमध्ये मिलिटरी ट्रेनिंगचे शिक्षण घेत असलेले खानापूर …
Read More »हुतात्मा दिन गांभीयनि पाळण्याचा खानापूर म. ए. समितीचा निर्धार!
‘मध्यवर्ती’ च्या उपक्रमांत सक्रिय सहभागाचे आवाहन खानापूर : हुतात्मा दिनी १७ जानेवारी खानापुरातील हुतात्मा स्मारकात सीमालढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करुन दुपारी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित धरणे आंदोलनात बहुसंख्येने सहभागी होण्याचा निर्धार खानापूर तालुका म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आला. अध्यक्ष गोपाळ देसाई यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. ९) शिवस्मारकात ही बैठक …
Read More »चांद शिरदवाड पंचकल्याण महामहोत्सवात सुविधांना प्राधान्य
खासदार प्रियंका जारकीहोळी ; बोरगाव भेटी दरम्यान दिली ग्वाही निपाणी (वार्ता) : चांद शिरदवाड येथील श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर येथे नूतन श्री 1008 भगवान सुपार्श्वनाथ जीनभिंब पंचकल्याणक प्रतिष्ठा महा महोत्सव व विश्वशांती महायज्ञ होणार आहे. या महामहोत्सवात गावात कोणतीच अडचण होणार नाही, याची दक्षता घेऊन सहकाररत्न उत्तम …
Read More »करंबळ परिसरात दहशत माजविणाऱ्या टस्करला वनविभागाकडून जेरबंद
खानापूर : खानापूर तालुक्यातील करंबळ गावात गेल्या अनेक दिवसांपासून दहशत माजवणाऱ्या “त्या” टस्कराला अखेर वनविभागाने जेरबंद केले. खानापूर तालुक्याच्या वनपरिक्षेत्रात वाढलेला वन्य प्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी शिमोगा येथील तज्ञ हत्तींचे पथक खानापुरात दाखल झाले असता लागलीच वनविभागाने मोहीम हाती घेतली आणि हत्तीला पकडण्यात यश मिळवले. खानापूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून …
Read More »हुळंद प्रकरणातील तीन अधिकारी निलंबित
खानापूर : खानापूर तालुक्यातील हुळंद गावातील 508 एकर जमिनीच्या प्रकरणात गंभीर भ्रष्टाचाराचे प्रकार उघडकीस आल्याने तीन प्रमुख अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. किरणकुमार (एडीएलआर इनचार्ज), पत्थार (सर्वेयर सुपरवायझर इनचार्ज), आणि मुतगी (सर्वेयर) या अधिकाऱ्यांना त्यांनी चुकीचे कागद केल्याच्या आरोपाखाली निलंबनाला सामोरे जावे लागले आहे. हुळंद गावातील सर्वेक्षण क्रमांक …
Read More »पॉवर ट्रेलरमध्ये सापडून शेतकऱ्याचा मृत्यू
खानापूर : आपल्या शेतात पावर ट्रेलरद्वारे काम करत असताना पॉवर ट्रेलर खाली सापडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी झाल्याची घटना आज गुरुवार दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी, सायंकाळी पाचच्या खानापूर तालुक्यातील चापगाव नजीक घडली. सदर दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव अशोक पुंडलिक पाटील (वय 60 वर्ष) आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली सविस्तर माहिती …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta