राजू पोवार; निपाणीत रयत संघटनेची बैठक निपाणी (वार्ता) : कर्नाटकासह सीमाभागातील महाराष्ट्रमधील साखर कारखान्यांनी तीन हजार रुपये पर्यंत जाहीर करून ऊस तोड सुरू केली आहे. हा दर रयत संघटनेसह शेतकऱ्यांना अमान्य आहे. याशिवाय उगाच हंगामातील ५०० रुपये आणि यंदाच्या हंगामात साखर कारखाने आणि सरकारने मिळून ५ हजार ५०० रुपये …
Read More »उद्यान, स्मशानभूमीसाठी नागरिकांचे तहसीलदारांना निवेदन
निपाणी (वार्ता) : बेनाडी मल्लिकार्जुन नगरातील लोकवस्ती वाढली आहे. पण या ठिकाणी स्मशानभूमी, बस स्थानक आणि उद्यान नसल्याने परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे तात्काळ वरील गोष्टींची पूर्तता करावी या मागणीचे निवेदन मल्लिकार्जुन नगरातील नागरिकातर्फे सुनील वराळे आणि गणेश शिरसिंगे यांनी तहसीलदार कार्यालयाला दिले. निवेदनातील माहिती अशी, गेल्या पंचवीस …
Read More »आप्पाचीवाडीजवळ अपघातात चार गंभीर जखमी
कोगनोळी : आप्पाचीवाडीजवळ अंधार लक्ष्मी मंदीर परिसरात मोटर सायकल व कार यांच्यात अपघात झाल्याची घटना सोमवार तारीख 13 रोजी सकाळी 11 च्या सुमारास घडली. यामध्ये मोटर सायकल वरील दोघे तर कार मधील दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, सांगोलाहून आदमापूर येथील बाळूमामा दर्शनासाठी जात …
Read More »बालकाच्या जिवदानासाठी आर्थिक मदतीचे आवाहन
खानापूर : केंचापूर गल्ली, खानापूर येथील शिवांश बिर्जे या मायलोमोनोसाइटिक ल्युकेमिया रोगग्रस्त अवघ्या 8 महिन्यांच्या बालकावरील उपचारासाठी, त्याला जीवदान देण्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. शिवांश बिर्जे हा बालक मायलोमोनोसाइटिक ल्युकेमिया नामक रक्ताच्या कर्करोगाने ग्रस्त आहे. सध्या त्याच्यावर केएलई हॉस्पिटलमध्ये केमोथेरपीचे वेदनादायी उपचार सुरू असले तरी जीवनदान मिळण्यासाठी …
Read More »महाराष्ट्रात जाणारी ऊसाची वाहने अडवली
स्वाभिमानीचा आक्रमक पवित्रा : हालशुगरला दिली खर्डा भाकरी निपाणी (वार्ता) : गतवर्षाच्या हंगामातील उसाला प्रति टन ४०० चारशे रुपये मिळाले पाहिजेत. यंदाच्या हंगामातील उसाला प्रति टन ३५०० रुपये दर द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक बनली आहे. पार्श्वभूमीवर रविवारी (ता.१२) सायंकाळी चिकोडी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रा.एन. आय. …
Read More »बुधवारी पदग्रहण, गुरूवारी कार्यकर्त्यांचा मेळावा
भाजपचे नुतन अध्यक्ष विजयेंद्र यांची माहिती बंगळूर : भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी बुधवारी (ता. १५) पक्ष कार्यालयात पदभार स्वीकारणार असल्याचे सांगितले आहे. जगन्नाथ भवन येथे सकाळी १० वाजता कार्यक्रम होईल. यावेळी पक्षातील ज्येष्ठ नेते उपस्थित रहाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते तुमकूर येथे पत्रकारांशी बोलत होते. मावळते …
Read More »एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या
उडुपी येथील घटनेने हळहळ बंगळूर : संपूर्ण राज्यात दिवाळीचा सण सुरू असतानाच दूरच्या उडुपीमध्ये एक अमानुष कृत्य घडले आहे. मास्क घातलेल्या मारेकर्याने अचानक घरात घुसून एकाच कुटुंबातील चार जणांना चाकूने वार करून ठार केले आणि वृद्ध महिलेला गंभीर जखमी करून घटनास्थळावरून पळ काढला. उडुपीमधील हम्पनकट्टेजवळील नेजारीच्या तृप्ती लेआउटमध्ये रविवारी …
Read More »दिवाळीनिमित्त संत बाबा महाराज चव्हाण, दर्ग्यास अभिषेक
निपाणी (वार्ता) : येथील श्री संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित महान अवलिया हजरत पिराने पिर दस्तगीर साहेब दर्गा आणि संत बाबा महाराज यांच्या समाधी स्थळी मानक-यांच्या उपस्थितीत दीपावली निमित्त अभंगस्नान घालून अभिषेक घालण्यात आला. पहाटे चव्हाण वाड्यातील बाबा महाराज यांच्या पुतळ्याला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर दर्गाह येथे हजरत पिराने …
Read More »लक्ष्मी पूजनानिमित्त झेंडू, ऊस, केळी खरेदीसाठी निपाणीत गर्दी
झेंडू फुलाला दराची झळाळी निपाणी (वार्ता) : दसरा आणि दिवाळीला झेंडू, शेवंतीच्या फुलांना विशेष महत्त्व आहे. लक्ष्मी पूजनानिमित्त शहरातील सर्वच रस्त्यावर दिवाळी लक्ष्मीपूजन पार्श्वभूमीवर रविवारी (ता. १२) पिवळ्या, केशरी, झेंडूसह शेवंतीच्या फुलांच्या राशी पडल्या होत्या. दसऱ्याला दर पडले होते. मात्र दिवाळीमध्ये दरात विक्रमी वाढ झाली झाली. किरकोळ बाजारात ५० …
Read More »शेतीचे सर्व्हे क्रमांक एफआयडी क्रमांकाशी लिंक करून घेण्याचे तहसीलदारांच्या आवाहन
निपाणी (वार्ता) : सन २०२३-२४ या वर्षात निपाणी तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाने सर्व शेतकऱ्यांना पीक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पीक नुकसान भरपाईचा दावा करण्यासाठी शेतकऱ्यांनी एफआयडी नोंदणी आवश्यक आहे. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी सर्व जमिनीचे सर्व्हे क्र. एफआयडी क्रमांकाशी लिंक करून घ्यावेत, असे आवाहन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta