Friday , December 19 2025
Breaking News

कर्नाटक

वर्क फ्रॉम होम, नॉट रिचेबल चालणार नाही

  मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांना इशारा; जनतेच्या समस्या प्रमाणिकपणे सोडविण्याच्या सूचना बंगळूर : जिल्हा आणि तालुका केंद्रातील अधिकाऱ्यांनी घरून काम करू नये, असे सांगून, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अधिकाऱ्यांना कार्यालयात बसून काम करावे, अशा स्पष्ट सूचना दिल्या. आज विधानसौध कॉन्फरन्स हॉलमध्ये झालेल्या जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. …

Read More »

पीओपी गणेशमूर्ती बनविणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा

  मंत्री ईश्वर खांड्रे; अधिकाऱ्यांच्या बैठकीत सविस्तर चर्चा बंगळूर : पीओपी मूर्ती जलस्रोतांसाठी धोकादायक असल्याने अशा मूर्तींची निर्मिती, वाहतूक, विक्री आणि विल्हेवाट पूर्णपणे रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश वन, जीवशास्त्र आणि पर्यावरण मंत्री ईश्वर खांड्रे यांनी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणपती उत्सव …

Read More »

जिल्हा बँकेत मार्फत मिळणाऱ्या पिक कर्जाचा लाभ घ्यावा

  चंद्रकांत तारळे; निपाणी पीकेपीएसची वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांची प्रगती साधण्यासाठी निपाणी प्राथमिक कृषी पत्तीन संघाची स्थापना झाली आहे. त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्ज देऊन त्यांची प्रगती साधली जात आहे. आता संघामध्ये अनेक बदल झाले असून विविध प्रकारचे व्यवहार करता येणार आहेत. जिल्हा बँकेत मार्फत मिळणाऱ्या कर्जाचा सभासदांनी …

Read More »

विद्यार्थ्यांनी बनविल्या मातीच्या गणेश मूर्ती

  नूतन मराठी विद्यालयाचा उपक्रम; इको फ्रेंडली गणेशाचा दिला संदेश निपाणी (वार्ता) : दिवसेंदिवस बिघडत असलेल्या निसर्गाच्या संतुलनामुळे पर्यावरणाविषयी जागृत होणे गरजेचे आहे. केवळ सहा दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सवामध्ये घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या त्यामुळे पर्यावरणाच्या प्रदूषणासह जलचर प्राण्यांना धोका पोहोचत आहे. त्यामुळे यंदाचा …

Read More »

काँग्रेसच्या योजनामुळे भाजपाला भीती

  लक्ष्मणराव चिंगळे ; भाजपने बंद केलेल्या योजना काँग्रेसने सुरू केल्या निपाणी (वार्ता) : काँग्रेस सरकारच्या विरोधात निपाणीच्या लोकप्रतिनिधींनी नागण्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काढलेला मोर्चा हा केविलवाना आहे. भाजपच्या काळात बंद पडलेल्या अनेक शासकीय योजना काँग्रेस सरकार सत्तेवर येतात सुरू केले आहेत. त्यामुळे मतदार भाजपला सोडून काँग्रेसकडे जाण्याची भीती भाजपला वाटत …

Read More »

आडी मल्लय्या डोंगरावरील शिवलिंगावर उद्यापासून किरणोत्सवास प्रारंभ

  अभ्यासक बाबासाहेब मगदूम यांची माहिती निपाणी (वार्ता) : आडी (ता. निपाणी) येथील श्री. मल्लया डोंगरावरील प्राचीनशिवलिंगावर बुधवारपासून (ता.१३) सूर्योदयानंतर काही वेळातच किरणोत्सवास प्रारंभ होणार आहे. हा वेदांत आणि विज्ञानाची सांगड घालणारा किरणोत्सव सोहळा गुरुवारपर्यंत (ता.२१) चालणार आहे. त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन किरणोत्सवाचे अभ्यासक बाबासाहेब मगदूम यांनी केले …

Read More »

‘जनता दला’चे नाव बदलून ‘कमल दल’ करा

  काँग्रेसचे विडंबन; धजदची धर्मनिरपेक्षता संपवली बंगळूर : पक्षाऐवजी धर्मनिरपेक्षता विसर्जित! जनता दलाचे नाव बदलून ‘कमल दल’ असे सांगून भाजपसोबत युतीचा प्रस्ताव देणाऱ्या धजदवर काँग्रेसने जोरदार टीका केली. कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीने सोमवारी याबाबत ट्विट केले की, निवडणूक हरल्यानंतर पक्ष विसर्जित करण्याऐवजी त्यांनी धर्मनिरपेक्षता विसर्जित केली. त्यामुळे जनता दल या …

Read More »

माझे प्रेतही भाजपात जाणार नाही : मुख्यमंत्री सिध्दरामय्या

  दुष्काळी तालुक्यांची लवकरच घोषणा बंगळूर : माझे प्रेतही भाजपमध्ये सामील होणार नाही, असे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी आज स्पष्ट केले. सोमवारी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, माझी संपूर्ण राजकीय कारकीर्द जातीयवादी शक्तींच्या विरोधात गेली आहे आणि त्यामुळे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचे विधान मजेदार आहे. सिद्धरामय्या …

Read More »

हालशुगरच्या संचालिका गीता पाटील यांचा महादेव मंदिरात सत्कार

  निपाणी (वार्ता) : येथील नगरसेविका गीता सुनील पाटील यांची श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाले आहे. त्यानिमित्त निलांबिका महिला मंडळ आणि जपान मंडळातर्फे श्रावण सोमवारचे औचित्य साधून बसव मल्लिकार्जुन स्वामींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बसव मल्लिकार्जुन स्वामीजी यांनी, अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात सुनील पाटील व …

Read More »

खानापूरसह बेळगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; रयत संघटनेची मागणी

  हालगी मोर्चाद्वारे तहसीलदारांना निवेदन खानापूर : कर्नाटक राज्य रयत संघटना आणि खानापूर तालुका शेतकरी हसीरू सेना यांच्याकडून तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना खानापूर तालुका दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करावा व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी हलगी मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. तहसीलदारांच्या अनुपस्थितीत उपतहसीलदार कल्लाप्पा कोलकार यांनी निवेदन स्वीकारले. कर्नाटक सरकारने खानापूर …

Read More »