Friday , December 19 2025
Breaking News

कर्नाटक

तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील तारेचे कुंपण रहदारीला अडचण

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरात नेहमीच रहदारीची समस्या चर्चेत असते. अशीच चर्चा खानापूर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर रहदारीची समस्या होत असल्याची चर्चा सर्व थरातुन होत आहे. खानापूर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील असलेल्या जागेवर चहाच्या टपरी चालु होत्या. त्या बंद करून त्या जागेवर तहसील कार्यालयाकडून तारेचे कुंपण घातले असल्याने तहसील कार्यालयात …

Read More »

खानापूर तालुका समिती शिष्टमंडळाच्यावतीने महिला व बालकल्याण विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना निवेदन सादर

  खानापूर : राज्यात अंगणवाडी सेविकांची नेमणूक करण्यात येत आहे. यात अंगणवाडी सेविका उमेदवारास प्रथम भाषा कन्नडची अट घातली आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यातील मराठी भाषिक गावात कन्नड भाषिक अंगणवाडी सेविकांची नेमणूक होणार आहे. त्यामुळे मराठी मातृभाषेच्या उमेदवारांवर अन्याय होऊन अंगणवाडीतील लहान बालकांना कानडी शिक्षण घेण्याची वेळ येणार आहे. यासाठी खानापूर …

Read More »

उडुपी महाविद्यालयातील व्हिडीओ चित्रीकरण प्रकरणाची सीआयडी चौकशी करणार

  बंगळुरू : उडुपी येथील एका खाजगी महाविद्यालयाच्या शौचालयामधील व्हिडिओ चित्रीकरणाचे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी याबाबत ट्विट केले आहे. ते म्हणाले की, हे प्रकरण संवेदनशील असल्याने पुढील तपासासाठी सीआयडीकडे सोपवण्यात आले आहे. उडुपी जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि महिला बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले …

Read More »

ऊसावर ‘लोकरी’चा प्रादुर्भाव

  टंचाईसह ऊसावर कीड ; दुहेरी संकटामुळे शेतकरी हवालदिल निपाणी (वार्ता) : तालुक्यात ऊस पिकावर मोठ्या प्रमाणावर लोकरीमावा रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. एकीकडे, पावसाअभावी ऊसाचे पीक वाळून गेले असताना आता लोकरी माव्याचे संकट आल्याचे ऊस उत्पादक दुहेरी संकटात सापडले आहेत. गेल्या आठवड्यात तालुक्यात ढगाळ …

Read More »

संभाजीराजे चौक बनला खासगी पार्किंग अड्डा

  गर्दीच्या चौकातच वाहनांचे पार्किंग ; पोलीस प्रशासनाची बघ्याची भूमिका निपाणी (वार्ता) : शहरातील मुख्य असणाऱ्या धर्मवीर संभाजीराजे चौकात अनेक चारचाकी वाहनधारक थेट गाड्या पार्किंग करत आहेत. वारंवार वाहतूक कोंडी होणाऱ्या या चौकात आता वाहनांच्या पार्किंगमुळे कोंडीत भरच पडली आहे. अशावेळी याठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी उभे असणारे पोलीस तसेच होमगार्ड मात्र …

Read More »

कत्तलखान्याला घेऊन जाणाऱ्या १२ म्हशींची हरसनवाडीजवळ सुटका

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्या मार्गे गोव्याकडे कत्तलखान्याला घेऊन जाणाऱ्या जनावरांची सुटका करणे, जनावरांचे मांस घेऊन जाणाऱ्या वाहनांना अडवून पोलिसाच्या ताब्यात देणे हे खानापूर हिंदुत्ववादी संघटना नेहमीच करतात. अशीच घटना सोमवारी खानापूरातुन चोर्ला मार्गे गोव्याला कंटेनरमधून १२ म्हशी कत्तलखान्याला घेऊन जाताना खानापूर जांबोटी मार्गावरील हरसनवाडी जवळ पकडून त्यांची सुटका …

Read More »

लोंढा येथे आर्थिक व्यवहारातून दोघांवर ब्लेडने हल्ला

  खानापूर : खानापूर तालुक्यातील लोंढा गावात क्रिकेट सट्ट्याच्या पैशाच्या कारणावरून दोघांवर ब्लेडने वार करून गंभीर जखमी करण्यात आले असून या हल्ल्यात लोंढा गावातील रहिवासी अल्ताफ नाईक व इरफान मेहबूब देशपायीक हे गंभीर जखमी झाले असून बेळगाव येथील आसिफ जमादार आणि उमर शेख या दोघा हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. …

Read More »

कृषीमंत्र्यांवर लाच घेतल्याचा आरोप; सहायक कृषी अधिकाऱ्यांची राज्यपालांकडे तक्रार

  बेंगळुरू : कृषी मंत्री चालुवरायस्वामी यांच्यावर लाचखोरीचा आरोप करत ७ सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांनी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. कृषी मंत्री चालुवरायस्वामी यांच्यावर कृषी अधिकाऱ्यांनी 6 ते 8 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप असून लाचखोरीला आळा घातला नाही तर विष प्राशन करून आत्महत्या करू, असे या अधिकाऱ्यांनी …

Read More »

दि. खानापूर तालुका प्रायमरी टीचर्स को-ऑप. क्रेडिट सोसायटीची निवडणूक बिनविरोध

  शिक्षकांतून समाधान खानापूर : नेहमीच चर्चेत असलेल्या खानापूर येथील दि. खानापुर तालुका प्रायमरी टीचर्स को-ऑप. सोसायटीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सभासदांच्या मागणीनुसार ठराव करण्यात आला होता. परंतु ही प्रक्रिया मर्यादित वेळेच्या नंतर झाल्यामुळे ३० उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी १५ उमेदवारांची निवड ही एका ज्येष्ठ सभासदाच्या मतदानाने पार पडण्यात आली. सर्व …

Read More »

मराठी शाळा टिकवायची जबाबदारी प्रत्येकाचीच : आबासाहेब दळवी

  बेळगाव : मराठी माध्यमांच्या शाळा टिकवून ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक गावातील नागरिकांनी घेतली पाहिजे तसेच प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यांना मराठी माध्यमातून शिकविण्यास प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन खानापूर तालुका समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे शनिवारी मनतूर्गा, असोगा व रुमेवाडी गावातील सरकारी मराठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक …

Read More »