Sunday , July 26 2026
Breaking News

कर्नाटक

राज्याचा बारावीचा निकाल विक्रमी ८१.१५ टक्के

  राज्यात दक्षिण कन्नड प्रथम तर गदग अंतिम स्थानावर; बेळगाव २७ व्या, चिक्कोडी १५ व्या स्थानावर बंगळूर : मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षा-१ चा निकाल जाहीर झाला असून, यंदाचा निकाल विक्रमी ८१.१५ टक्के लागला आहे. परीक्षेत नेहमीप्रमाणे यंदाही मुलांपेक्षा मुलीनीच बाजी मारली आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागाचा निकाल …

Read More »

मणतुर्गे येथील ग्रामदैवत रवळनाथ मंदिराचा जीर्णोद्धार कार्यक्रमाचा पायाभरणी समारंभ संपन्न

  बेळगाव : मणतुर्गे तालुका खानापूर येथे ग्रामदैवत श्री रवळनाथ मंदिराचा जीर्णोद्धार गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मंगळवार दिनांक ९ एप्रिल २०२४ रोजी दुपारी एक वाजता श्री. चंद्रकांत बाजीराव पाटील व सौ. कांता चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते पायाभरणी समारंभ पौरोहीत दिपक चिटणीस यांच्या मंत्रपठणाने संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे वतनदार श्री. राजाराम रवळू …

Read More »

कोगनोळी टोलनाक्यावर 8 लाख रुपयांची रोखड जप्त

  कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरील कोगनोळी टोलनाक्यावर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या सीमा तपासणी नाक्यावर 8 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना देण्यासाठी भेटवस्तू, रोकड आदीसह अन्य वस्तूंची वाहतूक रोखण्यासाठी कर्नाटक प्रशासनाने तपासणी नाका उभा केला आहे. …

Read More »

शहीद जवान सागर बन्ने यांच्या स्मारकाचे शुक्रवारी उद्घाटन

  निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील जवान सागर आप्पासाहेब बन्ने हे पंजाब (भटिंडा) येथे शहीद झाले. त्याला शुक्रवारी (ता.१२) एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त आप्पासाहेब बन्ने कुटुंबीयातर्फे येथील बिरदेव मंदिर परिसरात त्यांचे स्मारक उभे केले आहे. या स्मारकाचे लोकार्पण शुक्रवारी (ता.१२) होत आहे. शहीद जवान सागर बन्ने एक मेंढपाळ …

Read More »

डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचा उद्या चापगाव, बेकवाड, हलसी भागात प्रचार दौरा!

  खानापूर : उत्तर कन्नड लोकसभा मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचा उद्या बुधवार दि. 10 रोजी चापगावसह विविध भागात प्रचार दौरा व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी कार्यक्रम होणार आहे. त्यानिमित्ताने सकाळी 10.30 वाजता चापगाव या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भेटी, त्यानंतर सकाळी 11 वाजता बेकवाड, दुपारी 12.30 वाजता हलशी दुपारी 1.30 …

Read More »

‘अरिहंत’मुळे सांगलीच्या अर्थकारणाला गती : खासदार संजयकाका पाटील

  सांगलीत अरिहंत शाखेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : सहकार क्षेत्रातून सर्वसामान्यासह व्यापारी वर्गांची आर्थिक अडचण दूर करण्याच्या उद्देशाने सहकाररत्न रावसाहेब पाटील हे गेल्या अनेक दशकापासून प्रयत्नशील आहोत. या संस्थेने कर्नाटकासह महाराष्ट्रतही शाखा सुरू केल्या आहेत. अरिहंत सारख्या सहकारी संस्थांची या ठिकाणी नितांत गरज आहे. सांगलीच्या शाखा उद्घाटनामुळे अर्थकारणाला नवी दिशा …

Read More »

काँग्रेसचे कार्य जनता विसरणार नाही : माजी आमदार काकासाहेब पाटील

  निपाणी (वार्ता) : काँग्रेस हा सर्व सामान्यांचा व वचनाला जागणारा पक्ष आहे.या पक्षाने दिलेली पाच योजना पूर्णपणे राबवून दिलेले वचन पाळले आहे. त्यामुळे कर्नाटकातील जनता काँग्रेसला विसरणार नाही, असा विश्वास माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी व्यक्त केला. बोरगाव येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्त्यांच्या …

Read More »

दर वाढूनही सराफपेठेत गर्दीचा महापूर!

  गतवर्षीच्या तुलनेत २० हजाराची वाढ निपाणी (वार्ता) : दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक नागरिक सोन्या चांदीच्या वस्तूसह संसार उपयोगी साहित्याची खरेदी करतात. गतवर्षीच्या दराच्या तुलनेत यावर्षी सोने प्रति तोळा २० हजार रुपये वाढूनही खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. त्यामुळे सराफ पेठेत चैतन्याची गुढी उभारली गेली. याशिवाय इतर वस्तूंची खरेदी करण्यात …

Read More »

दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारची याचिका : सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस

  नवी दिल्ली : कर्नाटक सरकारने दुष्काळ निवारणासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावून दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रातील भाजप सरकार दुष्काळग्रस्त कर्नाटकला दिलासा देत नाही; कोणतीही मदत मिळत नसल्याचा आरोप करत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने आपला लढा सर्वोच्च न्यायालयात नेला. केंद्र …

Read More »

होलकेरेजवळ बस पलटी झाल्याने चार ठार, ३८ जखमी

  बंगळूर : बंगळुरहून गोकर्णकडे भरधाव वेगात जाणारी एक खासगी बस आज पहाटे होलकेरे शहरात पलटी होऊन चार प्रवासी जागीच ठार तर ३८ जण जखमी झाले. अपघातातील मृतांपैकी दोघांची ओळख पटली आहे. शिमोगा जिल्ह्यातील सागर येथील गणपती (वय ४०) आणि उत्तर कन्नड जिल्ह्यातील होन्नावर येथील जगदीश यांचा मृत्यू झाला आहे. …

Read More »