Sunday , July 26 2026
Breaking News

शहरातील खड्डे बुजवण्यासाठी निपाणी नगरपालिका आयुक्तांना निवेदन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : महिनाभर झालेल्या पावसामुळे शहर आणि उपनगरातील रस्त्यावर अनेक लहान मोठे खड्डे पडले आहेत. आता गणेशोत्सव केवळ पंधरा दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे उत्सवापूर्वीच नगरपालिकेने शहर आणि उपनारातील खड्डे मुजवून सहकार्य करावे, या मागणीचे निवेदन शासन नियुक्त नगरसेवकांनी नगरपालिका आयुक्त दीपक हारदी यांना मंगळवारी (ता.२०) दिले.
निवेदनातील माहिती अशी, दरवर्षी लहान मोठ्या गणेशमूर्ती मंडळ अथवा घरी नेत असताना खड्ड्यामुळे भाविकांना तारेवरची कसरत करावी लागते. शिवाय अनेक खड्ड्यांमध्ये पाणी साठवून राहिल्याने खड्ड्याचा अंदाज येणे कठीण होते. त्यामुळे अपघात असे हे मूर्तीला इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे यंदा तरी गणेशोत्सवापूर्वीच खड्ड्यामध्ये मुरूम टाकून भाविकांची सोय करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. आयुक्त हरदी यांनी निवेदन स्वीकारून खड्डे बुजवण्याची ग्वाही दिली. यावेळी शासन नियुक्त नगरसेवक अरूण आवळेकर, रविंद्र श्रीखंडे, ॲड. संजय चव्हाण, फारुक गवंडी, विनोद बल्लारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *