Monday , December 15 2025
Breaking News

कर्नाटक

हिडकल डॅममध्ये युवकाचा चाकूने भोसकून निर्घृण खून

हुक्केरी : हुक्केरी तालुक्यातील हिडकल डॅम गावात अज्ञात मारेकर्‍यांनी एका युवकाचा चाकूने वार करून निर्घृण खून करून मृतदेह फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. हुक्केरी तालुक्यातील हिडकल डॅम गावात राहणार्‍या परशुराम हलकर्णी नावाच्या 32 वर्षीय युवकाचा खून झाला आहे. गावातील अंजनेय मंदिराजवळ काही हल्लेखोरांनी चाकूने वार करून हत्या करून फरार …

Read More »

ईदलहोंड मराठी शाळेचे मुख्याध्यापक पाटील यांचा सेवानिवृत्तनिमित्त सत्कार

  खानापूर (प्रतिनिधी) : ईदलहोंड (ता. खानापूर) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक अशोक रामचंद्र पाटील हे 29 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्ती सत्कार सोहळा नुकताच पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुक्याचे माजी आमदार श्री. दिगंबरराव यशवंतराव पाटील होते. यावेळी व्यासपीठावर एसडीएमसी अध्यक्ष तानाजी पाखरे, उपाध्यक्षा …

Read More »

गर्लगुंजीत मराठी मुलांच्या कोसळलेल्या शाळा इमारतीची जिल्हा न्यायाधीशांकडून पाहणी

  खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) येथील ८५ वर्षा पूर्वी बांधण्यात आलेल्या मराठी मुलांच्या शाळेच्या इमारतीच्या तीन वर्गखोल्या नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे जमीनदोस्त झाल्या. ही बातमी कळताच बेळगाव जिल्हा न्यायाधीश मुरली मोहन रेड्डी, बीईओ लक्षणराव यकुंडी, खानापूर तालुका न्यायाधीश सूर्यनारायण, खानापूर तालुका वकिल संघटना अध्यक्ष ऍड. आय. आर. घाडी, …

Read More »

प्राध्यापक डॉ. एन. डी. पाटील यांची जयंती उत्साहात साजरी

  सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल या शाखेमध्ये प्राध्यापक डॉ. एन. डी. पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली एन. डी. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन माजी मुख्याध्यापक श्री. एस. डी. पाटील यांच्या हस्ते झाले विद्यालयातील विद्यार्थिनींनी ईशस्तवन गायले. विद्यालयातील सहाय्यक शिक्षक श्री. एस. व्ही. यादव …

Read More »

पायाभूत सुविधांच्या कामांसाठी ५०० कोटी तातडीने मंजूर

मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद, मदत कार्यासाठी सक्त सूचना बंगळूर : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी पायाभूत सुविधा पुनर्संचयित करण्यासाठी ५०० कोटी रुपये मंजूरीचे आदेश जारी केले. मुख्यमंत्र्यांनी पाऊस आणि पूर परिस्थितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली आणि परिस्थिती जाणून घेतली. पायाभूत सुविधा जलद गतीने पुनर्संचयित करणे आवश्यक आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांना त्यांनी …

Read More »

कोगनोळी येथे विद्युत स्पर्शाने तीन शेळींचा मृत्यू

कोगनोळी : विद्युत पुरवठा करणाऱ्या खांबावरून तार तुटून खाली पडली होती. या पडलेल्या तारेला तीन शेळींचा स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार तारीख 15 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून अधिक माहिती अशी की, येथील हंचिनाळ रोडवर असणाऱ्या पीरमाळ येथे विद्युत पुरवठा करणाऱ्या खांबावरून तार तुटून खाली पडली होती. …

Read More »

कोगनोळी फाट्यावर अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी फाट्यावर बसच्या धडकेत पदचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार तारीख 15 रोजी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. भानुदास श्रीपती विटे (वय 55) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, भानुदास विटे हे करनूर येथून कोगनोळी …

Read More »

आमदार लक्ष्मी हेब्बाळकर श्रींच्या भेटीला..

संकेश्वर (महंमद मोमीन) : बेळगांव ग्रामीण मतक्षेत्राच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज निडसोसी श्री दुरदुंडीश्वर सिध्द संस्थान मठाला भेट देऊन देवदर्शनासह मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींची भेट घेऊन श्रींच्या आरोग्याची विचारपूस केली. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर स्वामीजींबरोबर बोलताना म्हणाल्या, स्वामीजी तुमच्या इनोव्हाला अपघात झाल्याचे समजताच आपणाला धक्काच बसला. तुम्ही अपघातात सुखरुप …

Read More »

संकेश्वरातील नेहरु रस्त्याचे रुंदीकरण कधी….?

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर नेहरु रस्ता रुंदीकरणाचे कार्य हाती घेण्याची आवश्यकता असल्याचे युवानेते बसनगौडा पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते म्हणाले संकेश्वरच्या जुन्या गावात नेहरु रस्ता, सुभाष रस्ता ही बाजारपेठ समजली जायची. संकेश्वर गावाचा विस्तार वाढत गेला तशी बाजारपेठ जुन्या पी. बी. रोड, कमतनूर वेस ते लक्ष्मी बेकरी …

Read More »

खानापूर तालुक्यात धुवाधार पाऊस, कबनाळीत घराची भिंत कोसळून लाखाचे नुकसान

खानापूर : खानापूर तालुका हा अति पाऊसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. त्यातच अति जंगलाने वेढलेला तालुका आहे. अशा खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या आठवड्यापासुन धुवाधार पाऊस पडत आहे. त्यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील निलावडे ग्राम पंचायत हद्दीतील कबनाळी गावात जुन्या व मातीच्या घराची भिंत कोसळून राजू महाजिक या गरीब शेतकऱ्यांचे लाखोचे …

Read More »