Sunday , December 14 2025
Breaking News

कर्नाटक

या वर्षापासून पूर्व प्राथमिक शाळांत राष्ट्रीय शिक्षण धोरण

शिक्षण मंत्री नागेश यांची माहिती बंगळूर : कर्नाटक चालू शैक्षणिक वर्षात पूर्व प्राथमिक स्तरासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) लागू करेल. शालेय शिक्षणात एनईपी लागू करण्याबाबत राज्य सरकारने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला २६ पोझिशन पेपर सादर केले आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी रविवारी त्यांच्या मतदारसंघात गृहनिर्माण मंत्री …

Read More »

संकेश्वरात पर्यावरण दिन वृक्षारोपणाने साजरा…

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर फ्रेंडस फौंडेशनच्यावतीने पर्यावरण दिनानिमित्त गौतम शाळा आवारात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला. भिमनगर येथील गौतम प्राथमिक शाळा आवारात फ्रेंडस फौंडेशनच्यावतीने पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वृक्षारोपण कार्यक्रमाला संकेश्वर पालिकेचे उपनगराध्यक्ष अजित करजगी यांनी सहाय्य सहकार्य केले. वृक्षारोपण कार्यक्रमात भिमनगर येथील नागरिकांनी …

Read More »

शववाहिनी नादुरुस्त…

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेची शववाहिनी नादुरुस्त झाल्याने खांद्येकऱ्यांचा शोध घेतला जात आहे. संकेश्वर हिरण्यकेशी नदी काठावर हिन्दु स्मशानभूमी, लिंगायत रुद्र भूमी असल्याने शव वाहून नेण्याचे कार्य खांद्येकऱ्यांना करावे लागत आहे. संकेश्वरच्या नवीन वसाहतपासून स्मशान भूमी लांब पल्ल्याच्या अंतरावर असल्याने शव वाहून नेण्याचे कार्य कसरतीचे ठरतांना दिसत आहे.कांही लोक …

Read More »

सौंदलगा येथे पर्यावरण दिनानिमित्ताने वृक्षारोपण

सौंदलगा : पर्यावरण दिनानिमित्त पतंजली योग समिती व सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान, वीरभद्र ऑरगॅनिक ॲन्ड सँडलवुड सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने आमराई कृषी पर्यटन केंद्रावर चंदनाचे झाड लावून वृक्षारोपण केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कृष्णा शितोळे यांनी सर्वांचे स्वागत करून पर्यावरणाचे महत्त्व सांगितले. या दृष्टिकोनातूनच आम्ही आज चंदनाचे झाड लावून वृक्षारोपण करणार आहोत. आजपर्यंत …

Read More »

शिवरायांची तत्वे युवकांना प्रेरणादायी

बाबासाहेब खांबे : शिवसेनेतर्फे शिवराज्यभिषेक दिन निपाणी (वार्ता) : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडविण्यासाठी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी आपल्या काळात सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन राज्य केले होते. त्यांच्या अनेक मार्गदर्शक तत्वांचा आजही वापर केला जात आहे. त्यामुळे हीच तत्वे आज युवकांना प्रेरणादायी ठरत आहेत, असे मत शिवसेना जिल्हाप्रमुख …

Read More »

रायचूरात दूषित पाण्यामुळे तिघांचा मृत्यू; कुटुंबांना 5 लाख भरपाई : मुख्यमंत्री

बेंगळुरू : रायचूरमध्ये दूषित पाण्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना सरकारने गांभीर्याने घेतली आहे. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे अशी माहिती बसवराज बोम्मई यांनी दिली. बंगळुरू येथील आरटी नगर येथील त्यांच्या निवासस्थानी सोमवारी प्रसार माध्यमांशी बोलताना बसवराज बोम्मई यांनी ही माहिती देऊन सांगितले …

Read More »

रोपे लावून ती जगविण्यासाठी प्रयत्न करणार : ए. एच. मोतीवाला

पर्यावरण दिनी सत्कार निपाणी (वार्ता) : प्लास्टिकचा अतिवापर आणि बेसुमार वृक्षतोडीमुळे निसर्गाचे अस्तित्व संपुष्टात येत आहे. परिणामी शुद्ध हवा मिळणे कठीण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन वृक्षारोपण ही काळजी गरज आहे. त्यामुळे येत्या काळात झाडे लावून ती जगविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला यांनी व्यक्त केले. …

Read More »

गंगवाळी वनविभागात जागतिक पर्यावरण दिन साजरा

खानापूर (प्रतिनिधी) : पृथ्वीमातेचे आपापल्या विध्वंसक कृत्यांमुळे शोषण होत आहे. आणि आपली पर्यावरण प्रणाली लोप पावत आहे. यासाठी पुन्हा पर्यावरण प्रणाली संतुलनात आणण्यासाठी बरीच कारणे आवश्यक आहेत. म्हणून निरोगी आणि टिकाऊ वातावरण केवळ आपल्यासाठी नव्हे तर येणाऱ्या पिढ्यांसाठी आहे. आपण नेहमी जबाबदार वर्तन दाखवुन हवा आणि पाणी तसेच वन्यजीवांचे संरक्षण …

Read More »

खानापूर तालुका समितीच्या अध्यक्षपदी गोपाळराव देसाई यांची निवड

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नूतन अध्यक्षपदी गोपाळराव देसाई यांची एकमताने निवड झाली. यावेळी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व कार्यकारिणीचे सदस्य, समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. समितीचे ज्येष्ठ नेते सूर्याजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड झाली. सुरेश देसाई यांनी गोपाळ देसाई यांचे नाव अध्यक्ष पदासाठी सुचवले त्याला अनुमोदन …

Read More »

प्रत्येकाने पर्यावरणाचे संरक्षण करणे आवश्यक : डॉ. अच्युत माने

आंदोलन नगरात वृक्षारोपण : दौलतराव पाटील फाउंडेशनचा उपक्रम निपाणी : वातावरणातील बदल आणि प्लॅस्टिकचा वापर यामुळे दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. त्याचा जीवसृष्टीवर आघात होत असून प्रत्येकाने पर्यावरणाचे संरक्षण करणे आवश्यक आहे. त्यासाठी वृक्षारोपण हाती घेणे गरजेचे आहे, असे मत प्रा. डॉ. अच्युत माने यांनी व्यक्त केले. जागतिक पर्यावरण …

Read More »