Sunday , December 14 2025
Breaking News

कर्नाटक

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी शिवकुमार यांना दिल्ली न्यायालयाचे समन्स

शिवकुमारांच्या अडचणीत वाढ, निवडणुक लढविण्यातही अडचणी शक्य बंगळूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि इतरांवरील आरोपपत्राची दखल घेत दिल्ली न्यायालयाने मंगळवारी २०१८ मध्ये त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात समन्स बजावले. विशेष न्यायाधीश विकास धुल्ल यांनी शिवकुमार याना १ जुलै रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले. शिवकुमार आणि इतरांविरुद्ध ईडीने …

Read More »

जुना गोटूर बंधारला दे-धक्का….

पाच महिन्यानंतर कारवाई संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर हिरण्यकेशी नदीवरील जुना गोटूर बंधार हटविणेची मागणी भारतीय किसान संघाने गेल्या पाच महिन्यांपासून चालविली होती. त्याची दखल घेत हुक्केरी मतक्षेत्राचे आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी गोटूर बंधार हटविणेसाठी विशेष निधी मंजूर करुन देण्याबरोबर गोटूर बंधार हटाविणेचे …

Read More »

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देणार : राजू पोवार

निपाणीत रयत संघटनेचा रास्ता रोको निपाणी (विनायक पाटील) : शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढणारे नेते अथवा कार्यकर्त्यावर अन्याय झाल्यास रयत शेतकरी संघटना कधीही शांत बसणार नाही. प्रसंगी रस्त्यावर उतरून जाब विचारला जाईल, असा इशारा चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी दिला. शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय नेते राकेश टिकैत यांच्यावर ३०० …

Read More »

मराठी भाषिकांनी समितीच्या झेंड्याखाली एकत्र येणे गरजेचे : ज्येष्ठ सीमासत्याग्रही नारायण लाड

खानापूर : सीमालढा अंतिम टप्प्यात असताना तालुक्यातील जनतेने एकजुटी दाखवून दिली पाहिजे. त्यासाठी सर्व मराठी भाषिक जनतेने समितीच्या झेंड्याखाली एकत्र येणे गरजेचे आहे. तसेच खानापूर समितीने एक सक्षम अध्यक्ष निवडावा ज्याला सीमाप्रश्नाचा सखोल अभ्यास असला पाहिजे. न्यायालयीन कामकाजाचा अभ्यास आहे. मराठी भाषिकांच्या समस्या परखडपणे मांडणारा त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील नेत्यांच्या संपर्कातला संघटक …

Read More »

खानापूर तालुक्यातील दुर्गम गावांना रस्ते करून द्या : धनश्री सरदेसाई-जांबोटकर

खानापूर : खानापूर तालुक्यातील घनदाट जंगलातील गावांना रस्ता तयार करण्याचे आवाहन भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य धनश्री सरदेसाई-जांबोटकर यांनी जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना केले. खानापूर तालुक्यातील दुर्गम गावांना चांगले रस्ते नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच ग्रामस्थांना प्रवास करण्यास त्रास होत आहे. खानापूर-गोवा रस्त्यापासून चापगाव 5 किमी., पाली 4 किमी, जांबोटी-गोवा मुख्य …

Read More »

निर्मला सीतारामन, जग्गेश यांचे उमेदवारी अर्ज दाखल

बेंगळुरू : राज्यसभेच्या दुसर्‍या टर्मसाठी राज्यसभेची निवडणूक लढवत असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अभिनेते जग्गेश यांनी आज कर्नाटकातून उमेदवारी अर्ज दाखल केला. विधानसभेच्या सचिव विशालाक्षी यांच्याकडे केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी निर्मला सीतारामन यांच्या समवेत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा आणि …

Read More »

नेरलीत निलेश जाधव गटाचे बसगौडा पाटील विजयी

संकेश्वर (प्रतिनिधी) : नेरली तालुका हुकेरी येथील प्राथमिक कृषी सहकारी संघाच्या बिगर कर्जदार गटातील दिवंगत संचालक सुधीर पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणुक घेण्यात आली. निवडणुकीत भाजपचे प्रशांत भिमगोंडा पाटील यांना 127 मते तर निलेश जाधव गटाचे बसगौडा वीरगौडा पाटील यांना 207 मते मिळाली. निवडणूक अधिकारी श्री. सागर यांनी …

Read More »

शिक्षणाचा बाजार झालायं : निजाम आवटे

संकेश्वर (महंमद मोमीन) : विद्यार्थ्यांना शिकविणे आम्ही धर्म समजून विद्यादानाचे कार्य केले. आज शिक्षणाचा बाजार मांडला गेल्याची खंत सेवानिवृत्त शिक्षक निजाम काशीम आवटे यांनी व्यक्त केली. संकेश्वर रुक्मिणी गार्डन येथे आयोजित १९८६-१९८७ दहावी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्यात ते बोलत होते. प्रारंभी शिक्षिका सौ. शशीकला मोरे यांनी सरस्वती गीत सादर केले. प्रास्ताविक …

Read More »

आदर्श शिक्षिका पुरस्काराने वैशाली देशमाने सन्मानित

निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र राज्य युवा पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकार, डाॅक्टर, उद्योजक, शिक्षक, समाजीक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन नष्टे लाॅन कोल्हापूर येथे गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात वैशाली देशमाने यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. वैशाली देशमाने या शिक्षिका सध्या गोमटेश इंग्लिश मिडीयम स्कूल निपाणी येथे …

Read More »

साखरवाडीतील नागरिकांच्यावतीने विविध समस्यांबाबत नगराध्यक्षांना निवेदन

निपाणी (वार्ता) : साखरवाडी परिसरात विविध समस्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने या परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्या भागातील समस्या त्वरित सोडवाव्यात या मागणीचे निवेदन नागरिकांच्या वतीने साखरवाडीतील नागरिकांनी नगराध्यक्ष जयवंत भाटले यांना सोमवारी(ता.३०) दुपारी देण्यात आले. निवेदनातील माहिती अशी, साखरवाडीतील …

Read More »