Wednesday , March 4 2026
Breaking News

कर्नाटक

विश्व विख्यात म्हैसूर दसऱ्याची आज जंबो सवारीने होणार सांगता

  देश – विदेशातील पर्यटकांची गर्दी; मिरवणुकीची जय्यत तयारी बंगळूर : राज्याचा प्रमुख सण असलेल्या दसरा महोत्सवातील सर्वात महत्वाचे आकर्षण असलेल्या जंबोसावरी मिरवणुकीसाठी पॅलेस सिटी पूर्णपणे सज्ज झाली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या दुपारी १ ते १.१८ दरम्यान, शुभ धनुर लग्नादरम्यान राजवाड्याच्या उत्तर (बलराम) दारावर नंदीध्वजाची पूजा करून मिरवणुकीचे उद्घाटन करतील. ते …

Read More »

वंटमुरी घाटात झालेल्या अपघातात चापगाव येथील युवकाचा दुर्दैवी मृत्यू

  खानापूर : खानापूर तालुक्यातील चापगाव येथील एक दुचाकीस्वार नवरात्रीला आपल्या गावी येऊन परत इचलकरंजीला आपल्या कामावर हजर होण्यासाठी जात असताना आज बुधवार दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे 5:30 वाजेच्या सुमारास वंटमुरी घाटात त्याच्या दुचाकीचा अपघात होऊन, त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, …

Read More »

राज्यात पुरामुळे ८.६० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान – बैरेगौडा

  बंगळूर : काही जिल्ह्यांमध्ये, विशेषतः उत्तर कर्नाटक प्रदेशात, मुसळधार पाऊस आणि पुरामुळे आतापर्यंत ८.६० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, असे महसूल मंत्री कृष्णा बैरेगौडा यांनी सांगितले. भीमा नदीला आलेल्या पुराचे आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीचे स्वतंत्र सर्वेक्षण केले जाईल, असे मंत्र्यांनी सांगितले. भीमा नदीत दररोज २.८ लाख क्युसेक इतके …

Read More »

मुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण; तातडीच्या उपाययोजनांचे दिले निर्देश

  बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी गुलबर्गा, बिदर, यादगिरी आणि विजयपुर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण केले. मंत्री एम. बी. पाटील, कृष्णा बैरेगौडा आणि प्रियांक खर्गे यांच्यासमवेत, मुख्यमंत्र्यांनी गुलबर्ग्यामध्ये झालेल्या अभूतपूर्व पावसामुळे आणि महाराष्ट्रातील उजनी तसेच नीरा जलाशयांमधून जास्त पाणी सोडल्यामुळे भीमा नदी खोऱ्यातील पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. …

Read More »

खानापूर उप तहसीलदार कल्लाप्पा कोलकार यांचे निधन

  खानापूर : खानापूर तहसीलदार कार्यालयातील प्रामाणिक आणि मनमिळाऊ अधिकारी उप तहसीलदार कल्लाप्पा कोलकार (वय ५०) यांचे मंगळवार, दि. ३० रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मूळचे बेळगाव तालुक्यातील कडोली येथील रहिवासी असलेले कल्लाप्पा कोलकार हे गेली आठ ते दहा वर्षे खानापूर तहसीलदार कार्यालयात उप तहसीलदार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात …

Read More »

नवरात्रोत्सवानिमित्त निपाणीत विविध मंडळातर्फे गरबा दांडियाचा जल्लोष

  निपाणी (वार्ता) : नवरात्रोत्सवानिमित्त निपाणी शहरात दांडिया-गरब्याचा जल्लोष रंगात सुरू आहे. तरुणाई उत्साहाने सहभागी होताना दिसून येत आहे. शहरातील प्रमुख मंडळे व क्लबतर्फे आकर्षक मंडप, रोषणाई व सजावट करून दांडिया, गरब्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. रात्रीच्या सुमारास शहरातील विविध भागात गरबा, दांडियाची रंगत वाढत आहे. या विविध समाजातील तरुणाई …

Read More »

सततच्या पावसाने झेंडूचा झाला खराटा

  फुल उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात निपाणी (वार्ता) : यावर्षीच्या सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यातून फुलशेती करणारे शेतकरीही सुटलेले नाहीत. चांगला नफा मिळवून देणाऱ्या शेवंती, गुलाब, झेंडूच्या झाडांचा दसऱ्यापूर्वीच खराटा झाला आहे. दसरा, दिवाळीमध्ये शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवून देणारा झेंडू अतिवृष्टीने आडवा झाला आहे. त्यामुळे …

Read More »

निपाणीतील कामगार निरीक्षक १० हजाराची लाच स्वीकारताना गजाआड

  निपाणी (वार्ता) : निपाणी कामगार निरीक्षक कार्यालयावर लोकायुक्त विभागाने कारवाई करून १० हजाराची लाच घेताना निपाणीतील कामगार कार्यालय निरीक्षक नागेश कळसण्णावर यांना रंगेहाथ पकडले. त्यांना लोकायुक्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक करून त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी केली आहे. लोकायुक्त अधिकाऱ्यानी दिलेली माहिती अशी, बोरगांव येथील पानमसाला कारखान्याचे मालक राजू पाच्छापुरे यांच्या …

Read More »

सरकारी नोकरीसाठी वयात ३ वर्षांची सूट

  बंगळुर : राज्य सरकारने नोकरी शोधणाऱ्यांना दसऱ्याची बंपर भेट दिली आहे. सोमवारी नागरी सेवा पदांवर थेट भरतीसाठी वयोमर्यादा तीन वर्षांनी शिथिल करणारा एक महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. राज्य सरकारने आज एक अधिकृत आदेश जारी केला आहे ज्यामध्ये राज्य सरकारच्या विविध विभागांद्वारे घेण्यात येणाऱ्या थेट भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व …

Read More »

बंगळूरात १० कोटींचे ड्रग्ज जप्त

  अभियंता, विदेशी, विद्यार्थ्यांसह ७ जणांना अटक बंगळूर : सीसीबी पोलिसांनी सात ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे, ज्यात दोन विदेशी, एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि एक डेंटल विद्यार्थी यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून ९.९३ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात यश आले आहे. अटक केलेल्यांकडून ३ किलो ८५८ ग्रॅम एमडीएमए क्रिस्टल, ४१ ग्रॅम …

Read More »