खानापूर : शाळा व महाविद्यालयांना नुकतीच सुरुवात झाली आहे मात्र खानापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये अपुऱ्या बसवेमुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे बस सेवा सुरळीत करावी यासाठी परिवहन मंडळाला निवेदन देण्यात आले असून बस सेवा तातडीने सुरळीत न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा कार्यकर्त्यांतर्फे …
Read More »मोदगे येथे सर्पमित्राने दिले सापाचा जीवदान
दड्डी : मोदगे येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये साप आढळल्याने काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सर्पमित्र धनंजय पाटील यांच्या तत्परतेमुळे सापाला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे पकडून जंगल परिसरात सोडण्यात आले. मोदगे येथील आन्नाप्पा पाटील यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये काम सुरू असताना अचानक साप दिसून आला. साप पाहताच …
Read More »श्रीमंताऐवजी सर्वसामान्यांना घरकुले द्या; बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे
शासकीय विश्रामधामात बैठक निपाणी (वार्ता) : प्रधानमंत्री आवास योजनेतून पट्टणकुडी हद्दीत दाईंगडे मळा येथे बांधण्यात आलेल्या जी प्लस-२ घरांचे वाटप गरजू सर्वसामान्य लाभार्थ्यांना व्हावे, यासाठी आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे यादी सदोष करावी अशी मागणी केली होती. दि. २० मे रोजी विद्यमान आमदार व माजी खासदारांनी लाभार्थ्यांची यादी सदोष न बनविता …
Read More »गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधात निपाणीत कारवाई
पोलिसांकडून बुलेटसह तलवारी जप्त निपाणी (वार्ता) : शहरात कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने, निपाणी पोलिसांनी बुधवारी (ता.१०) सकाळी विशेष मोहीम राबवून विविध भागांमध्ये राहणाऱ्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींच्या घरांवर छापे मारण्यात आलंय. या कारवाई दरम्यान तलवार आणि एक नोंदणी नसलेली बुलेट बाईक जप्त करण्यात आली असून संबंधित व्यक्तींवर …
Read More »हब्बनहट्टी बॉक्साईट वाहतुकीवर प्रश्नचिन्ह; ओव्हरलोड गाड्या, परवानग्या आणि प्रशासनाच्या भूमिकेवर संशय
खानापूर : हब्बनहट्टी परिसरातून सुरू असलेल्या कथित बॉक्साईट वाहतुकीमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत असून ओव्हरलोड वाहनांमुळे रस्त्यांच्या टिकाऊपणावर धोका निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. सुमारे ५० टनांहून अधिक मालवाहतूक करणाऱ्या १६ चाकी ट्रकांची नियमित ये-जा होत असल्याने आधीच खराब अवस्थेत असलेल्या रस्त्यांची आणखी दुरवस्था होण्याची भीती नागरिक …
Read More »नागरीकांमध्ये बंधुभाव निर्माण करण्याची कार्यकर्त्यांची जबाबदारी
ए. जी. कांबळे; मानव बंधुत्व वेदीकेची तालुकास्तरीय बैठक निपाणी (वार्ता) : आदर्श कार्यकर्ता हा शिस्तप्रिय,अभ्यासू, समाजाभिमुख, संवेदनशील आणि निस्वार्थी असला पाहिजे. समाजातील समस्या समजून घेत त्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणे, महापुरुषांच्या विचारांचा प्रसार करणे आणि नागरीकांमध्ये बंधुभाव निर्माण करणे ही कार्यकर्त्यांची प्रमुख जबाबदारी असल्याचे मत प्रशिक्षक ए. जी. कांबळे यांनी …
Read More »निपाणी नगरपालिकेतील भ्रष्टाचारी कर्मचाऱ्याच्या बदलीसाठी आयुक्तांनी पाठवले जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
निपाणी (वार्ता) : निपाणी नगरपालिकेतील एजंटराजसह विविध प्रकारचे दाखले, उतारे देण्यासाठी होणाऱ्या पैशांच्या मागणीवरून संतापलेल्या नागरिकांनी गेल्या आठवड्यात थेट नगरपालिकेवर मोर्चा काढला होता. यावेळी येथील कर्मचारी राहुल कदम याच्या बदलीचा आग्रह नागरिकांनी धरला. यासाठी सोमवारपर्यंत डेडलाईन देण्यात आली होती. त्यानुसार नागरिकांनी नगरपालिकेत जाऊन अधिकाऱ्यांना कारवाईबद्दल विचारणा केली. त्यावेळी निपाणी …
Read More »यांत्रिक युगातही ग्रामीण भागात अजूनही सर्जा- राजाच्या जोडीने पेरणीची कामे
निपाणी (वार्ता) : मनुष्यबळाची कमतरता, शेतातील कामे वेळेत उरकण्यासाठी यंत्रांची मागणी वाढत आहे. यांत्रिकीकरण युगातही सर्जा-राजाची खिलार जोडीचे महत्त्व आजही निपाणी ग्रामीण भागात टिकून आहे. गावोगावी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच अनमोल अशी पशुसंपदा शिल्लक आहे. खर्च परवडेना तरीही हौसेखातर तर काही ठिकाणी ग्रामीणमध्ये भागातील शेतीसाठी आजही पेरणी व …
Read More »हब्बनहट्टीतील कथित बॉक्साईट उत्खननावर प्रश्नचिन्ह; विविध विभागांच्या भूमिकेवर खानापूर तालुका काँग्रेसची टीका
खानापूर : हब्बनहट्टी परिसरातील लॅटराईट उत्खननाच्या परवानगीच्या आडून कथितपणे बॉक्साईटची वाहतूक व उत्खनन होत असल्याचा आरोप करत खानापूर ब्लॉक काँग्रेसने माईन्स अँड जिऑलॉजी विभाग, पोलीस प्रशासन, वन विभाग आणि आरटीओ यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ब्लॉक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात, लॅटराईट उत्खननासाठी परवानगी देण्यात आलेल्या ठिकाणी …
Read More »आंबोळी गावातील जळालेल्या ट्रान्सफॉर्मरकडे हेस्कॉमचे दुर्लक्ष; शेतकऱ्याचे मोठे नुकसान
खानापूर : तालुक्यातील आंबोळी गावात वीज कोसळून ट्रान्सफॉर्मर जळून गेल्याची घटना सुमारे महिनाभरापूर्वी घडली असून, याबाबत वारंवार सूचना देऊनही संबंधित हेस्कॉम अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ग्रामस्थांच्या माहितीनुसार, अचानक वीज कोसळल्यामुळे गावातील ट्रान्सफॉर्मर जळाला होता. या घटनेची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta