Sunday , July 26 2026
Breaking News

बेनाडी ते पंढरपूर दिंडीचे प्रस्थान यंदा वारकऱ्यांचा २०० भाविकांचा सहभाग

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्याची बेनाडी ते पंढरपूर पायी दिंडी रवाना झाली. येथील हनुमान मंदिरामध्ये सकाळी श्रींच्या पादुकांना शरद जोशी यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर भजन सेवा झाली. विधीपूर्वक विना पूजन, श्रींची पालखी पूजन झाल्यानंतर अभंग, भक्तीगीत, भावगीत, गवळण सादर करीत या दिंडीचे प्रस्थान झाले.
येथील माजी ग्रामपंचायत सदस्य शंकर पोवाडे यांच्या हस्ते विना पूजन, श्रींची पालखी पूजन झाल. ग्रामदैवत काडसिद्धेश्वर मंदिरापासून श्रींच्या पालखीची नगरप्रदक्षणा प्रारंभ होऊन, गावच्या चक्री लाईनमार्गे विठ्ठल मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, बसवेश्वर मंदिर, गावच्या मुख्य रस्त्यावरून, सार्वजनिक मठ, गावच्या पश्चिम वेशितील महादेव मंदिर, चौंडेश्वरी मंदिर मार्गे ही पायी दिंडी पंढरपूर कडे रवाना झाली. विणा धारी, तुळशी वृंदावन डोक्यावरती घेऊन नगर प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आली. दिंडी सोहळ्यासाठी आकर्षक असा एक लाखाहून अधिक खर्चाच्या रथाची देणगी दिल्याबद्दल जयश्री तुकाराम वंजारे यांचा दिंडी चालक व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दिंडी सोहळ्यामध्ये बेनाडी, बोळेवाडी, कुरली, हुन्नरगी यमगरणी, बुदिहाळ, चिखली, हिटणी, भडगाव येथील एकूण २००भाविक सहभागी झाले आहेत. ही दिंडी गुरुवारी (ता.२३) पंढरपूरला पोहोचणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *