Sunday , September 20 2026
Breaking News

हंचीनाळ क्रॉस ते बिरदेव मंदिर रस्त्यावर चिखल, खड्डे अन् जीवघेणा प्रवास

Spread the love

निपाणी (वार्ता) : हंचीनाळ क्रॉस ते बेनाडी मधील माळभागावर असलेल्या बिरदेव मंदिर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरणाचे काम रखडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी खडी पूर्णपणे उखडली गेली आहे. दुचाकी व चारचाकी वाहनधारक, शालेय विद्यार्थी, शेतकऱ्यांना या चिखलमय रस्त्यातून धोका पत्करून प्रवास करावा लागत आहे.
पावसाळ्यात तर या खड्यांमध्ये पाण्याचे मोठे डबके साचत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढलेआहे. अनेक लहान-मोठे अपघात घडूनही संबंधित प्रशासनाने अद्यापकोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
संबंधित विभागाकडून केवळ आश्वासनांपलीकडे काहीही मिळालेले नाही. ‘प्रत्यक्षात काम कधी सुरू होणार,’ असा प्रश्न आता नागरिकांकडून विचारला जात असून प्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती आणि डांबरीकरण हाती घ्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
प्रशासनाने या समस्येकडे त्वरित लक्ष देऊन देऊन रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू करावे, अन्यथा लोकशाही मार्गान तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *