निपाणी (वार्ता) : चाँद-शिरदवाड येथील माजी ग्रामपंचायत सदस्य दिवंगत बाबालाल कनवाडे यांच्या स्नुषा शहनाज आलम कनवाड यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावरून पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती झाले आहे. त्यानिमित्त सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते त्यांच्या उल्लेखनीय कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला. याशिवाय पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. उत्तम आण्णा पाटील म्हणाले, …
Read More »बंगळूर येथील आयआयआयटी निवड झाल्याबद्दल साईराज पाटील यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : स्तवनिधी येथील ए. एस. पाटील हायस्कूलचे शिक्षक जे. एस. पाटील यांचे चिरंजीव साईराज पाटील यांची बंगलोर येथे आय. आय. आय. टी. पदी निवड झाल्याबद्दल दोन्ही शाळे तर्फे मुख्याध्यापक एस. एस. तेरदाळ व मुख्याध्यापक बी. बी. दादण्णावर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी साईराज यांनी विद्यार्थ्यांशी …
Read More »महात्मा बसवेश्वर संस्थेच्या कुर्ली शाखेत गुणवंतांचा सत्कार समारंभ
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील महात्मा बसवेश्वर संस्थेच्या कुर्ली शाखेत गुणवंतांचा सत्कार समारंभ पार पडला. अध्यक्षस्थानी महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेच्या कुर्ली शाखा अध्यक्ष रवींद्र चौगुले होते. शैक्षणिक व राष्ट्रीय सेवा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंतांचा संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. शिवाजी विद्यापीठातून भौतिकशास्त्र विषयात पीएचडी पदवी प्राप्त …
Read More »तारांगण-ज्ञानवर्धिनीतर्फे करंबळ येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
खानापूर : महिलांच्या विकासासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या तारांगण, ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान खानापूर व करंबळ गावचे ग्रामस्थ यांच्यावतीने सोमवार दिनांक 20 जुलै 2026 रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा करंबळ या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. ग्रामीण भागातील …
Read More »चिखली येथील कुमार विद्यामंदिर आपुलकी सेवाभावी संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
निपाणी (वार्ता) : शिक्षण हीच समाजपरिवर्तनाची खरी ताकद असून गरजू, होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक ते बळ मिळावे या उद्देशाने कागल येथील तुषार भास्कर संस्थापित आपुलकी सेवाभावी संस्थेतर्फे चिखली येथील कुमार विद्यामंदिर मधील २० विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, वह्या व विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. संस्थापक तुषार …
Read More »हलशी– हलशीवाडी रस्त्याची तीन महिन्यांतच दुरवस्था; ग्रामस्थांचा रास्ता रोकोचा इशारा
खानापूर : लक्ष्मी यात्रेनिमित्त मोठ्या गाजावाजात करण्यात आलेल्या हलशी ते हलशीवाडी या रस्त्याची ठिकठिकाणी अवघ्या तीन महिन्यांतच दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शिवाजी हायस्कूल ते हलशीवाडी पर्यंतच्या रस्त्यावरील खडी मोठ्या प्रमाणात उखडून निघाली असून अनेक ठिकाणी खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे रस्त्याच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न …
Read More »बोरगावच्या ‘अरिहंत’च्या डिजिटल बँकिंगमुळे महत्त्वाचे पाऊल
अध्यक्ष अभिनंदन पाटील : संस्थेच्या क्युआर कोडचे अनावरण निपाणी (वार्ता) : सध्याच्या युगात आधुनिक तंत्रज्ञान ही काळाची गरज बनली आहे. संस्थेसाठी महत्त्वाच्या असलेल्या क्युआर कोड व मोबाईल बँकिंग अॅपचे अनावरण करून आपण डिजिटल बँकिंगच्या नव्या युगात एक महत्त्वाचे पाऊल टाकत आहोत. या सुविधेमुळे सभासद आणि ग्राहकांना घरबसल्या सुरक्षित, जलद …
Read More »हालशुगरमधील साखर चोरीची चौकशी न झाल्यास मंडल पोलीस निरीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखान्यात झालेल्या साखर चोरीच्या घटनेमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, या प्रकरणी पोलिसांना तपास करण्यासाठी उच्च न्यायालयाने निर्देश असूनही पोलीस तपासात हलगर्जीपणा करत आहेत. त्याविरोधात ७ ऑगस्ट पर्यंत तपास न झाल्यास ८ ऑगस्टपासून मंडळ पोलीस निरीक्षक कार्यालयासमोर …
Read More »कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तारावर मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची खर्गेंसोबत महत्त्वाची चर्चा; नव्या चेहऱ्यांना संधीची शक्यता
बंगळूर : राज्याचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी शनिवारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वपूर्ण चर्चा केली. गेल्या तीन दिवसांपासून खर्गे हे बंगळुरात वास्तव्यास आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि केपीसीसी …
Read More »माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या पत्नी चेन्नम्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
बेंगळुरू : माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या पत्नी चेन्नम्मा देवेगौडा यांचे शनिवारी बेंगळुरूतील रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. चेन्नम्मा या काही दिवसांपासून श्वसनाच्या त्रासाने आजारी होत्या. प्रकृती खालावल्याने त्यांना बुधवारी सायंकाळी बेंगळुरूतील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात (ICU) त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta