दड्डी (वार्ताहर) : सलामवाडी (ता. हुक्केरी) येथील रहिवासी श्री. श्रावण रामू असवले (ए.एस.आय., मुंबई सेंट्रल जेल) यांचे सुपुत्र डॉ. हर्ष सुनीता श्रावण असवले यांनी वैद्यकीय क्षेत्रातील एम.बी.बी.एस. ही पदवी यशस्वीरित्या संपादन करून आपल्या कुटुंबासह गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल दड्डी परिसरातून त्यांचे सर्वत्र कौतुक होत …
Read More »मराठी शाळांतील कन्नड सक्तीविरोधात खानापूर तालुका समितीच्या वतीने सोमवारी क्षेत्र शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देणार
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे सोमवार दिनांक १५ जून २०२६ रोजी सकाळी ठीक १०:३० वाजता शिवस्मारक येथे २२ जून रोजी कन्नडसक्ती विरोधात आयोजित केलेल्या आंदोलनाबाबत जनजागृती करण्यासाठी पत्रके वाटायची आहेत तसेच माडीगुंजी येथील शाळेत होऊ घातलेल्या कर्नाटक पब्लिक स्कूलमधील कानडीकरणाविषयी क्षेत्र शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन द्यायचे ठरले आहे. तरी …
Read More »म्युनिसिपल हायस्कूल मैदान बनले वाहन पार्किंगचा अड्डा
खेळाडूसह नागरिकांची गैरसोय ; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा निपाणी (वार्ता) : शहर व नगरपालिकेच्या इतिहासात म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानाला महत्त्वाचे स्थान आहे. १८५४ मध्ये निपाणी नगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर या मैदानाचा वापर राजकीय सभा सार्वजनिक कार्यक्रम, विविध खेळ व सांस्कृतिक केंद्रबिंदू म्हणून या मैदानाला आजही तितकेच महत्त्व असताना सध्या या …
Read More »निपाणीतील पाणी प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे
दीर्घकालीन जलनियोजन आवश्यक; माजी सभापती प्रा. राजन चिकोडे यांची मागणी निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि उपनगरातील नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा कसा करता येईल, तसेच भविष्यातील गरजा लक्षात घेऊन आवश्यक पाणीसाठा कसा निर्माण करता येईल, यासाठी जलव्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञांना आमंत्रित करून व्यापक विचारमंथन करण्याची गरज आहे, असे आवाहन …
Read More »पाणीपुरवठा योजनेचे काम केल्याने नगरपालिकेसमोरील नियोजित मोर्चा स्थगित
निपाणी (वार्ता) : निपाणी शहरातील मुगळे गल्ली, तवटे गल्ली आणि शानेदिवाण गल्ली पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी माजी सभापती जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली नागरिकातर्फे नगरपालिकेला निवेदन देण्यात आले होते. तात्काळ दखल न घेतल्यास नगरपालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. आयुक्त गणपती पाटील व पाणीपुरवठा विभागाचे अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती करून …
Read More »निपाणीतील शेट्टी सराफ बंधूंनी बनविला बदामी बनशंकरी देवस्थानसाठी १५० किलोचा चांदीचा रथ
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील अप्पय्या शिवरुद्रप्पा शेट्टी सराफ दुकानातून बदामी येथील बनशंकरी देवस्थानासाठी तब्बल १५० वजनाचा रथ बनवण्यात आला होता. शनिवारी (ता.१३) सकाळी देवस्थान कमिटी पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी समाधी मठातील प्राणलिंग स्वामींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी प्राणलिंग स्वामी आणि महिलांच्या हस्ते रथाची पूजा करण्यात आली. त्यानंतर …
Read More »पाऊस वारा येताच बत्तीगुल
पावसाळापूर्व कामावर प्रश्नचिन्ह; दररोज तीन तासापेक्षा अधिक वेळ वीज गायब निपाणी (वार्ता) : हेस्कॉमच्या कारभाराचा फटका एप्रिल मे महिन्यात शहरासह ग्रामीण भागातील ग्राहकांना बसला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला मॉन्सूनपूर्व थोडा पाऊस झाला. मात्र त्यानंतर तापमान अधिक वाढत असून उकाडादेखील वाढला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. …
Read More »चार महिन्यांपासून वेतन रखडल्याने अंगणवाडी सेविका आर्थिक संकटात
बेंगळुरू : बालकांच्या सर्वांगीण विकासाचा पाया घालणाऱ्या अंगणवाड्या या प्राथमिक शिक्षण व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक मानल्या जातात. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात अंगणवाडीतूनच होत असल्याने त्यांच्या जडणघडणीत अंगणवाडी सेविकांची भूमिका अत्यंत मोलाची ठरते. मात्र, समाजाच्या या महत्त्वाच्या जबाबदारीचे वहन करणाऱ्या अंगणवाडी सेविकांनाच सध्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, …
Read More »गृहलक्ष्मी योजनेवर सरकारचा ‘बायोमेट्रिक’ फास; मृत व अपात्र लाभार्थ्यांचा शोध सुरू
बेंगळुरू : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी पाच हमी योजनांपैकी एक असलेल्या गृहलक्ष्मी योजनेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने आता बायोमेट्रिक पडताळणीचे हत्यार उपसले आहे. योजनेचा लाभ खऱ्या आणि पात्र महिलांपर्यंतच पोहोचावा, यासाठी महिला व बालविकास विभागाने राज्यभर विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत दरमहा आर्थिक सहाय्य मिळणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये मृत …
Read More »अर्धवट कामासह विकास कामांच्या मागणीचे राजेंद्र वडर यांचे मंत्री जारकीहोळी यांना निवेदन
निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारच्या नूतन मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून फेरनिवड झाल्यानंतर सतीश जारकीहोळी यांची भोज जिल्हा पंचायतचे माजी सदस्य व कर्नाटक राज्य ओसीसीआयचे संचालक राजेंद्र वडर पवार यांनी भेट घेतली. यावेळी निपाणी तालुक्यातील विकासकामे, प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबाबतचे निवेदन वडर यांनी जारकीहोळी यांना दिले. यमकनमर्डी येथील मंत्री …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta