Sunday , September 20 2026
Breaking News

कर्नाटक

कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियान

  नंदगड : कन्नड फलक सक्तीविरोधात २२ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोर्चाच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने बुधवारी नंदगड येथे जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यावेळी बाजारपेठेसह विविध गल्ल्या आणि परिसरातील अन्य ठिकाणी पत्रके वाटून नागरिकांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य …

Read More »

जवाहर तलाव परिसरातील मोकळी जागा महिला, बाल विकास विभागाला न देण्यासाठी पालिकेला निवेदन

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील जवाहर तलाव हे निपाणीच्या नागरिकासाठी निर्मिती केली आहे. या तलावाद्वारे अनेक वर्षांपासून निपाणीच्या नागरिकांची तहान भागवत आहे. नागरिकांना चांगले पाणी मिळावे यासाठी तलावा शेजारी एक मोकळी जागा आहे. भविष्यात या जागेचा वापर केवळ तलावाच्या कामासाठीच केला जाऊ शकतो. शेजारी असलेली ही १ एकर २० …

Read More »

चडचण तालुक्यातील दोन ठिकाणी भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू; दहा जण जखमी

  विजयपूर : जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील लोणी क्रॉसजवळ सरकारी बस आणि टिपर (कँटर) यांच्यात झालेल्या भीषण रस्ते अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे दहा जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टिपरचा टायर फुटल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ते समोरून येणाऱ्या सरकारी बसवर जाऊन आदळले. या भीषण …

Read More »

खानापूर समितीची जांबोटी भागात कन्नडसक्ती विरोधी मोर्चाची जनजागृती

  खानापूर : येत्या २२ जून रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर कन्नडसक्ती विरोधी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, यासाठी आज मंगळवार दिनांक १६ जून रोजी जांबोटी बाजारपेठमध्ये मोर्चाच्या जनजागृतीसाठी जागृती पत्रकांचे वाटप करण्यात आले. हजारोंच्या संख्येने २२ जूनच्या कन्नडसक्ती विरोधी आंदोलनात भाग घेऊन हा मोर्चा यशस्वी …

Read More »

विद्यार्थ्यांना एआयचे बळ; राज्यातील ५० सरकारी महाविद्यालयांत सुरू होणार अत्याधुनिक एआय लॅब

  बेळगाव : शिक्षण क्षेत्रात वेगाने होत असलेल्या तांत्रिक परिवर्तनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन राज्यातील ५० सरकारी महाविद्यालयांमध्ये अत्याधुनिक एआय लॅब सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या डिजिटल युगात उद्योग, आरोग्य, बँकिंग, …

Read More »

बूट-सॉक्सऐवजी विद्यार्थ्यांना मिळणार चप्पल? शिक्षण विभागाचा नवा विचार

  बेंगळुरू : सरकारी आणि अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत बूट व सॉक्स वाटप करण्याच्या योजनेत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. प्रतिकूल हवामान, विद्यार्थ्यांचे आरोग्य तसेच वापरातील व्यवहार्य अडचणी लक्षात घेऊन बूट-सॉक्सऐवजी चांगल्या दर्जाच्या चप्पलांचे वितरण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात …

Read More »

बोरगाव विद्यासागर शिक्षण संस्थेत इंग्लिश मीडियम शाळेत नर्सरी क्लास प्रारंभ

  निपाणी (वार्ता) : आधुनिक आणि मोबाईलच्या गतिमान युगात इंग्रजी भाषेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. ही काळाची पावले ओळखून बोरगांव येथील श्री विद्यासागर शिक्षण संस्था संचलित इंग्लिश मीडियम शाळेत नूतन ‘इंग्रजी नर्सरी क्लास’ सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे, असे मत संस्थेचे संस्थापक …

Read More »

नूतन मराठी विद्यालयात शैक्षणिक साहित्याचे वितरण

  निपाणी(वार्ता) : निपाणी येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या नूतन मराठी विद्यालय, प्राथमिक व माध्यमिक विभागा मधील विद्यार्थ्यां नासामाजिक कार्यकर्ते सुरेश घाटगे यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. एस. पचंडी तर प्रमुख पाहुणे म्हणून यरनाळ मधील सामाजिक कार्यकर्ते सुरेश घाटगे हे होते. नामदेव चौगुले, राजेंद्र घाटगे, गुलाबराव …

Read More »

हमी योजना सुरूच राहणार; अफवांवर विश्वास ठेवू नका : मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार

  बेंगळुरू : राज्य सरकारच्या सर्व हमी योजना शंभर टक्के सुरू राहणार असून कोणत्याही लाभार्थ्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिले आहे. राज्यातील काँग्रेस सरकारच्या महत्त्वाकांक्षी गृहलक्ष्मी आणि गृहज्योती या हमी योजनांना स्थगिती देण्यात आल्याच्या चर्चा तसेच सोशल मीडियावर पसरवल्या जात असलेल्या अफवांना …

Read More »

म्हैसूरमधील प्रसिद्ध रेस्टो पबला भीषण आग; दोन ठार

  अभिनेता प्रीतमसह पाच जण गंभीर जखमी बंगळूर : म्हैसूर शहराच्या बाहेरील आर.टी.नगर परिसरातील दट्टागल्लीजवळ असलेल्या प्रसिद्ध ‘फॉक्स डेन लिकर गॅरेज’ या रेस्टो पबमध्ये सोमवारी झालेल्या भीषण गॅस सिलिंडर स्फोटात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पबचे मालक आणि कन्नड चित्रपट अभिनेते प्रीतम यांच्यासह सात जण गंभीर जखमी झाले. जखमींवर …

Read More »