Monday , September 21 2026
Breaking News

कर्नाटक

सदलग्यात विद्युत कंपनीच्या खाजगीकरणाविरोधात शेतकऱ्यांचा पाठिंबा

  सदलगा : सदलगा येथे आज येथील समस्त शेतकऱ्यांनी एकत्रितपणे कर्नाटक राज्य विद्युत कंपनीचे खाजगीकरण करुन टाटा पॉवर सारख्या खाजगी कंपनीना विद्युत पुरवठा करण्याची परवानगी देऊन खाजगीकरण करण्याचा सरकारने घाट घातला असून त्याला २३ जून पूर्वी आक्षेप असल्यास नोंदवावा लागणार, अशा प्रकारे खाजगीकरण करुन समस्त शेतकऱ्यांची, नोकरवर्गाची, व्यावसायिकांची  गैरसोय करत आर्थिक …

Read More »

“माझ्या पराभवामागे संगनमत होते का?” – माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकरांचा थेट सवाल

  बेंगळुरू / खानापूर : कर्नाटक विधानपरिषद निवडणुकीतील कथित क्रॉस व्होटिंगच्या चर्चेला आता नवे वळण मिळाले असून, खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “माझ्या २०२३ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवामागे संगनमत होते का? मला राजकीय बळीचा बकरा बनवण्यात आले का?” असा थेट …

Read More »

बसच्या तिकीट दरवाढीवर संतुलित निर्णय घेऊ

  मुख्यमंत्री शिवकुमार, बस भाडेवाढीचे दिले संकेत बंगळूर : राज्य परिवहन महामंडळ (केएसआरटीसी) आर्थिकदृष्ट्या सक्षम राहिले पाहिजे, तसेच सर्वसामान्य प्रवाशांचाही हितसंबंध अबाधित राहिला पाहिजे. या दोन्ही बाबी लक्षात घेऊन बसभाडेवाढीच्या प्रस्तावावर निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्पष्ट केले. विधानसौध येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, खासगी …

Read More »

गृहलक्ष्मी, गृहज्योती वीज योजनेची घरोघरी पडताळणी

  लाभार्थ्यांकडून स्वघोषणापत्र घेणार बंगळूर : गृहलक्ष्मी आणि गृहज्योती (गृहमोफत वीज) योजनांमधील अपात्र लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी कर्नाटक सरकारने मोठी मोहीम हाती घेतली आहे. या योजनांच्या लाभार्थ्यांची घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात येणार असून, त्यांच्याकडून स्वाक्षरीसह स्वघोषणापत्रही घेतले जाणार आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या हमी योजनांच्या आढावा बैठकीत हा …

Read More »

अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला चालना

मिनाक्षी पाटील; बोरगाव येथे स्वयंपाक गॅसचे वितरण निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील सहकारत्न उत्तम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मार्च महिन्यात गॅसची कमतरता असल्याने मंजूर झालेल्या गॅस लाभार्थ्यांना वितरित करता आल्या नव्हत्या. आता गॅस उपलब्ध झाल्यानंतर उत्तम पाटील यांच्या वाढदिवसाचा सामाजिक उपक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी आज …

Read More »

खानापूर येथे म. ए. समितीविरोधात प्रशासनाला निवेदन

  खानापूर : २२ जून रोजी म. ए. समितीने आयोजित केलेल्या आंदोलनाला प्रशासनाने परवानगी देऊ नये, या मागणीसाठी स्थानिक संघटनांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले आहे. कर्नाटक रक्षण वेदिकेच्या खानापूर तालुका घटकाच्या वतीने तहसीलदारांची भेट घेऊन हे निवेदन सुपूर्द करण्यात आले. २२ जून रोजी होणाऱ्या आंदोलनामुळे सीमाभागातील कायदा व …

Read More »

पावसाळ्यापूर्वी होणार मांगुर फाट्यावरील पिल्लर उभारणी

  पश्चिमेकडून वाहतूकीचा मार्ग मोकळा : वेदगंगा नदीकाठ राहणार सुरक्षित निपाणी (वार्ता) : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. मांगुर फाट्यानजीक वेदगंगा नदीवरील पुल हा सीमाभागातील शेतकऱ्यांसह नागरिकांच्या चिवट लढ्यामुळे भरावा ऐवजी पिलरचा होत आहे. सध्या हे काम युद्धपातळीवर सुरू असून पावसाची साथ मिळाल्यास येत्या पावसाळ्यापूर्वी पश्चिमेकडील बाजूची …

Read More »

अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक योगा दिन उत्साहात साजरा

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील कोडणी रस्त्यावरील अंकुरम इंग्लिश मीडियम शाळेतील पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांचा जागतिक योग दिन शनिवारी (ता.२०) पार पाडला. यावेळी संस्थेचे संचालक नारायण चौगुले, संचालिका नम्रता चौगुले, सेक्रेटरी डॉ. अमर चौगुले, प्राचार्या चेतना चौगुले त्यांची प्रमुख उपस्थिती होती. नारायण चौगुले यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व …

Read More »

बोरगाववाडी- कसनाळ रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहनधारकासह, विद्यार्थी, शेतकऱ्यातून संताप

  निपाणी (वार्ता) : कोट्यावधी रुपये खर्चून पाच वर्षांपूर्वी खडीकरण, डांबरीकरणसह मजबुती झालेल्या बोरगाववाडी- कसनाळ रस्ता उध्वस्त होऊन खड्ड्यात गेला आहे. विस्कटलेल्या खडीमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि वाहनधारकातून संताप व्यक्त केला जात आहे शेतकऱ्यांना प्रमुख असलेल्या या रस्त्याचे डांबरीकरण खडीकरण व मजबुतीकरण साठी साडेतीन किलोमीटरच्या …

Read More »

पिण्यासह शेती पाण्यासाठी नदीत पाणी सोडा

  कर्नाटक राज्य रयत संघटनेची मागणी : तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन निपाणी (वार्ता) : जून महिना संपत आला तरीही पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी अडचणी सापडले आहेत. सोयाबीनचे इतर पिके वाळत असून नदीपासून पाणी योजना राबवलेल्या गावातही पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने वेदगंगा आणि दूधगंगा नदीत पाणी सोडून …

Read More »