Sunday , September 20 2026
Breaking News

कर्नाटक

तलावातील पाणी पातळी खालावल्याने पाणी काटकसरीने वापरण्याचे नगरपालिकेचे आवाहन

  निपाणी (वार्ता) : वेदगंगा नदी आणि येथील जवाहर तलावातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी झाली. अद्याप मोठा पाऊस न झाल्याने शिरगुप्पी ओढ्यातील जल स्तोत्र सुरू झालेले नाही. परिणामी तलावातील पाणी गढूळ गाळयुक्त बनले आहे. त्यामुळे पाणी शुद्ध करण्यासाठी अधिक वेळ लागत असून सर्व प्रभागात एकाच वेळी पाणी देणे कठीण झाले …

Read More »

चापगाव जल जीवन मिशन कामांबाबत ग्रामस्थांचा आक्षेप; चौकशीची मागणी

  खानापूर : चापगाव ग्रामपंचायत हद्दीतील जल जीवन मिशन (JJM) अंतर्गत राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामांमध्ये अनेक त्रुटी आणि अपूर्णता असल्याचा आरोप करत माजी पंचायत अध्यक्ष रमेश मल्हारी धबाले व ग्रामस्थांनी तालुका पंचायतच्या कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे. सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेल्या या योजनेवर मोठ्या …

Read More »

अंमली पदार्थामुळे कुटुंबासह समाज उध्वस्त पोलीस उपाधीक्षक गोपालकृष्ण गौडर

  अंमली पदार्थ विरोधी जनजागृती निपाणी (वार्ता) : अंमली पदार्थांचे व्यसन केवळ एका व्यक्तीलाच नव्हे तर कुटुंब आणि समाजालाही उद्ध्वस्त करते.अमली पदार्थ आणि धूम्रपानामुळे बुद्धीही नष्ट होऊ शकते. क्षणिक सुखासाठी मौल्यवान जीवचा बळी देऊ नका. तरुण पिढी ही देशाची संपत्ती असून अंमली पदार्थांचे गुलाम होऊ नका. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊन …

Read More »

क्रॉस व्होटिंग करणाऱ्या भाजप आमदारांवर कारवाईची टांगती तलवार; निलंबन किंवा हकालपट्टीची शक्यता

  बंगळूर : विधान परिषद निवडणुकीत झालेल्या कथित क्रॉस व्होटिंग प्रकरणी कर्नाटक भाजपमध्ये शिस्तभंगाच्या कारवाईचे संकेत मिळाले आहेत. प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी मंगळवारी दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेऊन संबंधित आमदारांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. दिल्लीतील भाजप मुख्यालयात झालेल्या बैठकीत …

Read More »

मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या मेव्हण्याच्या घरावर ईडीची धाड

  बेळगाव : सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांचे मेव्हणे तथा बेळगावचे अतिरिक्त अबकारी आयुक्त वाय. मंजुनाथ यांच्या मालमत्तांवर ईडीने बुधवारी सकाळी मोठी कारवाई करत एकाच वेळी सहा ठिकाणी छापे टाकले. बेळगाव, बंगळुरू, म्हैसूर आणि हासन जिल्ह्यातील आरसीकेरे येथील विविध ठिकाणी ईडीच्या पथकांनी धाडसत्र राबवून कागदपत्रांची तपासणी केली. मंजुनाथ यांच्याशी …

Read More »

शिवाजीनगर अपघातातील जखमी सेवानिवृत्त पोस्टमास्तर मारुती दळवी यांचे निधन; मणतुर्गा येथे आज अंत्यसंस्कार

  खानापूर : खानापूर शहरातील शिवाजीनगर परिसरात दोन दुचाकींच्या झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेले सेवानिवृत्त पोस्टमास्तर मारुती नारायण दळवी (वय ६८) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज, मंगळवार (दि. २३ जून २०२६) रोजी रात्री ८ वाजता मूळ गावी मणतुर्गा (ता. खानापूर) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी …

Read More »

बोरगाव मधील सार्वजनिक स्मशानभूमी परिसर हिरवीगार

  पट्टन पंचायतीसह पर्यावरण प्रेमींचे प्रयत्न निपाणी (वार्ता) : बोरगाव शहरात पर्यावरण याचा सुंदर समतोल साधण्याच्या महत्त्वाचे पाऊल उचललेले जात आहे. येथील स्मशान भूमीत पर्यावरण समतोलाच्या दृष्टीने विविध प्रकारची झाडे लावून हिरवाईला नवसंजीवनी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कडक उन्हात ही या स्मशानभूमीत हिरवाईची झालर दिसून येत आहे. यापूर्वी सार्वजनिक स्मशानभूमी …

Read More »

निपाणी परिसरात बैलजोड्या बनवण्याची लगबग

  माती मिळवण्यासाठी धावाधाव; शेतकऱ्यांमध्ये सणाची तयारी सुरू निपाणी (वार्ता) : बेंदूर सण केवळ आठवड्यावर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर निपाणीसह परिसरातील कुंभारवाड्यात यंदाच्या कर्नाटकी बेंदूर सणाचे ‘वेध’ लागले आहेत. शेतीमध्ये वर्षभर साथ देणाऱ्या सर्जा-राजाच्या कृतज्ञतेचा हा सण परिसरात साजरा होतो. त्या पार्श्वभूमीवर कुंभारवाड्यात चिखलापासून बैलजोड्या बनविण्याची लगबग दिसून येत आहे …

Read More »

पेरण्या रखडल्याने कृषी सेवा केंद्रे ओस

  पाऊस अद्यापही गायब; लाखो रुपयांची उलाढाल ठप्प निपाणी (वार्ता) : मशागतीची कामे आटोपून चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या बळिराजाची चिंता अधिक वाढली आहे. सुरवातीला दोन-तीन वेळा झालेल्या पावसानंतर तालुक्यातील सुमारे १५ ते २० टक्के शेतकऱ्यांनी खते आणि बियाण्यांची खरेदी करून ठेवली खरी, मात्र त्यानंतर पावसाने अचानक दडी मारल्याने संपूर्ण पेरणीचे …

Read More »

अश्लील व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांच्या विरोधात केंद्रीय व राज्यस्तरीय यंत्रणा गांभीर्याने कार्यरत

  बेंगळुरू : अश्लील व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांच्या विरोधात केंद्रीय व राज्यस्तरीय यंत्रणा गांभीर्याने कार्यरत असून संबंधितांवर सरकारतर्फे फिर्याद दाखल करण्यात येणार आहे. यानुसार जिल्ह्यातील दीडशे जण पोलिसांच्या रडारवर असून टप्प्याटप्प्याने त्यांच्यावर कारवाई होणार आहे. अल्पवयीनांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या विरोधात सायबर क्राईम विभागाने मोहीम उघडली आहे केंद्र सरकारने …

Read More »